AI शिकाल तर स्पर्धेत टिकाल, नोकरी मिळवाल-जाणून घ्या नवीन महत्वाचे AI चे कोर्सेस!

AI Courses CDAC Jobs

‘ज्याची कॉम्प्युटरवर कमांड, त्यालाच जगभर डिमांड’ हे ब्रीद घेऊन न्या विद्याध्यर्थ्यांनी संगणक क्षेत्रात करिअर केले, त्यांना किमान २५ वर्षे मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही. मात्र आता काळाने कूस बदलल्याने ‘एआय शिकाल तरच स्पर्धेत टिकाल’, असे नवे बीद तयार झाले आहे. एआय या विषयातील देशातील पहिला पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सी-डॅक संस्थेने AI Courses CDAC Jobs (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कॉम्प्युटिंग) सुरू केला असून नोकरीची ९० विशेष टक्के गॅरेटी तर पगाराचे दरमहा पैकेज ७ ते १७ लाख रुपये इतके असेल.सध्या जे विद्यार्थी बारावीत आहेत, त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉईंट आहे. त्यांच्यासह पाचवीच्या विद्याथ्यांना भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करिअर करण्याची इसठा आहे. बाजारात सहा महिन्यांपासूनचे अभ्यासक्रम आहेत. तसेच बीएस्सी, बोबोए, बीई आणि बीटेक या अभ्यासक्रमातही ज्याचे ) एआयमध्ये स्पेशलायझेशन आहे, त्यांना प्रचंड मागणी आहे. मग संगणक शास्त्र (आयटी) रोबोटिक्स क्षेत्रात करिअर करावे की नाही, असे प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. त्यांच्यासाठी तज्ज्ञ्ज एकच उत्तर देतात, ‘आधी एआय साक्षर व्हा, मगच करिअर निवडा’.

AI Recruitment 2025 Jobs

प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग माहिती करून घ्या तज्ज्ञ म्हणतात की, पूर्वी संगणकाची भाषा शिकले तर त्याला त्या क्षेत्रात करिअर करता येणे सोपे जात असे. आता एआय तंत्रज्ञानाची भाषा आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. यात चॅट जीपीटी हाताळावे कसे हे शिकवले जाते. त्याचे शेकडो अभ्यासक्रम भारतात आहेत. मात्र तुम्हाला नेमके काय करायचे आहे, हे आधी ठरवा. मग त्यात एआयचा उपयोग शिकवता येतो. भारतात याचे कोचिंग क्लास अजून सुरू झाले नाहीत. मात्र कोर्सेरा सारख्या पोर्टलवर ते शिकता येतात.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एआयसोबत बोलायला शिका…
तज्ज्ञांनी सांगितले की, आपल्या मोबाईलवर, लॅपटॉप किंवा संगणकात एआय टूल दिले आहे. त्याचा वापर करायला शिका. त्याच्याशी आपण कसे बोलावे याचीही एक पद्धत आहे. तुम्ही काय प्रश्न विचारता त्यावर ते उत्तर देते. त्यामुळे आपण एआयकडे काय मागतो आहोत हे समजले पाहिजे. यासाठी सुरुवातीला छोटासा अभ्यासक्रम करण्यास हरकत नाही. अभ्यास ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यावरून प्राथमिक अंदाज येईल. सी-डॅकने (CDAC Latest New AI Cources) सुरू केला पहिला एआय अभ्यासक्रम सी-डॅक अर्थात सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कॉम्प्युटिंग (प्रगत संगणन संस्था) ही इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची प्रमुख संस्था असून १९८८ मध्ये संस्थेची स्थापना झाली. संस्थेचे संस्थापक संचालक संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी येथे परम महासंगणक तयार केल्याने जगभरात या संस्थेचे नाव प्रसिद्ध आहे. त्याचे मुख्यालय पुणे शहरातील पाषाण भागात आहे. एआयमधील पहिला अभ्यासक्रम या सरकारी संस्थेने देशात सुरू केला असून तो आठ महिने कालावधीचा असून ऑनलाईन आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर हा अभ्यासक्रम करू शकतो.

पॅकेज दरमहा ७ ते १७ लाख 
सी-डॅकने ८ महिन्यांचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. ९० टक्के विद्यार्थ्यांना नोकरीची हमी दिली आहे. पगार ७ ते १७ लाख रुपये महिना मिळू शकेल, असेही अभ्यासक्रम पुस्तिकेत नमूद केले आहेत. तसेच या संस्थेने आयआयटी खरगपूर, आयआयटी मद्रास, आयआयटी पलक्कड, आयआयटी गोवा सोबत संलग्न असा आणखी एक नवा एआय अभ्यासक्रम सुरू केला आहे.

काही लोकप्रिय करिअर पुढीलप्रमाणे at AI Courses CDAC Jobs

  • डीप लर्निंग इंजिनिअर हे इंजिनिअर डीप लर्निंग अल्गोरिदम विकसित आणि प्रयोग करतात.
  • डेटा विश्लेषक : हे डीप लर्निंग मॉडेलसाठी डेटा तयार आणि विश्लेषण करतात. मशिन लर्निंग इंजिनिअर हे इंजिनिअर मशिन लर्निंग आणि डीप लर्निंग मॉडेल विकसित आणि प्रयोग करतात.
  • हे क्षेत्र अत्याधुनिक असल्याने पारंपरिक शिक्षण संस्थेत पूर्णवेळ दीर्घ मुदतीचे अभ्यासक्रम अजून तरी उपलब्ध नाहीत.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड