तुम्ही स्वयम वर नोंदणी केली का? केंद्र सरकारच्या ‘स्वयम’ पोर्टलकडे विद्यार्थ्यांचा कल!! – Central Government’s ‘SWAYAM’ Portal Latest update
Students' Inclination Towards the Central Government's 'SWAYAM' Portal!!
Central Government’s ‘SWAYAM’ Portal Latest update – मित्रांनो, केंद्र सरकारच्या ‘स्वयम’ पोर्टलवर विद्यार्थी नोंदणी करीत असले तरी, त्यापैकी केवळ चार टक्के विद्यार्थ्यांनीच अभ्यासक्रम पूर्ण केला असल्याचे संसदीय समितीच्या अहवालातून समोर आले आहे. तसे हे पोर्टल म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचे व्यासपीठ आहे. या द्वारे विद्यार्थी नवीन नवीन कोर्सेस आणो स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करू शकतो. या संदर्भात समितीने काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या असून, विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करावा यासाठी संबंधित खात्याने अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे. विशेषत: समाजातील वंचित घटकांतील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी करून त्यांचा सकस सहभाग वाढवण्यासह त्यांच्या प्रगतीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकार द्वारे २०१७ मध्ये केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘स्वयम’ पोर्टलवर विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, या पोर्टलच्या कार्यक्षमतेबाबत काही गंभीर तक्रारी आहेत. कालबाह्य अभ्यासक्रम, अध्यापनात लवचिकतेचा अभाव आणि निकृष्ट पायाभूत सुविधा यांसारख्या अडचणींचा उल्लेख समितीच्या अहवालात करण्यात आला आहे. राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हे निरीक्षण नोंदवले आहे. शिक्षणात डिजिटल माध्यमांचा प्रभाव वाढवायचा असेल, तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका बजावावी, तसेच भरती करणाऱ्या संस्थांना विद्यार्थ्यांशी जोडणारे व्यासपीठ निर्माण करावे, अशी समितीची शिफारस आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तसेच, राज्यसभेत मांडण्यात आलेल्या या अहवालात शिक्षण, महिला आणि बालविकास, तरुणाई व क्रीडा यांसारख्या विविध विषयांचा आढावा घेण्यात आला आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेचा स्तर, अॅक्रेडिटेशन प्रक्रिया, संशोधन आणि परीक्षांमधील सुधारणा, तसेच खासगी व अभिमत उच्च शिक्षण संस्थांमधील शैक्षणिक वातावरण याबाबतही अहवालात उल्लेख करण्यात आला आहे.
या महत्वाच्या ‘स्वयम’ पोर्टलच्या माध्यमातून नववीपासून पदवीपर्यंतच्या विविध अभ्यासक्रमांची संधी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. जवळपास २१०० हून अधिक अभ्यासक्रम या प्लॅटफॉर्मवर आहेत. शिक्षणापासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाची संधी मिळावी, तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. ‘राष्ट्रीय डिजिटल युनिव्हर्सिटी’ (एनडीयू) सर्वसमावेशक, लवचिक आणि परवडणाऱ्या शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे. मात्र, ‘स्वयम’ पोर्टलला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. २०१७ पासून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ चार टक्के विद्यार्थ्यांनीच अभ्यासक्रम पूर्ण केल्याची बाब समितीने अधोरेखित केली आहे.
या पोर्टलवरील काही तक्रारींबाबत समितीने स्पष्टपणे उल्लेख केला आहे. त्यामध्ये कालबाह्य अभ्यासक्रम, अध्यापनातील लवचिकतेचा अभाव आणि निकृष्ट पायाभूत सुविधा या प्रमुख तक्रारींचा समावेश आहे. याशिवाय, शिक्षकांना अपुरे प्रशिक्षण, कमी मोबदला आणि तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचीही माहिती अहवालात नमूद करण्यात आली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे प्रमाण १:१५ असले तरी, ऑनलाइन शिक्षण प्रणालीसाठी हे प्रमाण योग्य नाही, त्यामुळे व्हर्च्युअल क्लासरूममध्ये गर्दी होत असल्याचेही समितीच्या अहवालात म्हटले आहे.
ऑक्सफॅम इंडिया २०२२च्या अहवालानुसार अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील केवळ चार टक्के विद्यार्थ्यांकडे आणि इतर मागास प्रवर्गातील केवळ सात टक्के विद्यार्थ्यांकडे इंटरनेटसह संगणक उपलब्ध आहेत. त्यामुळे ‘एनडीयू’च्या शिक्षणातील समानतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ही गंभीर बाब असून, डिजिटल शिक्षण प्रणालीचा लाभ सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे.