महत्वाचे! शिक्षक भरतीसाठी मुदतवाढ! पवित्र पोर्टलवर जाहिराती २० फेब्रुवारी पर्यंत राहणार! – Maharashtra Teacher Recruitment Advertisement 2025

Teacher Recruitment Advertisement on Pavitra Portal

शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी. राज्य सरकारने आता या भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे (Maharashtra Teacher Recruitment Advertisement 2025) .  राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत, शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षक पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती आणि अर्ज सादर करण्याची लिंक आम्ही खाली देत आहोत. 

Teacher Recruitment Advertisement on Pavitra Portal

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ ही ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीत ही चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये एकूण २ लाख २९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, आणि त्यापैकी १ लाख ६३ हजार ६१ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे. या चाचणीद्वारे मिळालेल्या गुणांच्या आधारे इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या शिक्षक पदभरतीसाठी निवड प्रक्रिया राबवली जात आहे. राज्यात शिक्षक भरतीच्या (Pavitra portal maharashtra teacher recruitment 2025) दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातच आता शिक्षण आयुक्तालयाने पुन्हा एकदा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी म्हणजेच टेट घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून ही परीक्षा घेतली जाईल. राज्यभरातील शिक्षकांच्या रिक्त जागांसाठीची ( Maharashtra Teacher Recruitment 2025 ) ही भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे राबवली जाईल. त्यासाठी या पोर्टलवर जाहिराती नोंदवण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ही भरती पुढील काही महिन्यांत पूर्ण करून नव्या शैक्षणिक वर्षात शाळांमध्ये नवे शिक्षक उपलब्ध करून देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी टेट पात्रता आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षा परिषदेकडून सरकारला प्रस्ताव सादर झाला आहे.

अर्ज सादर करण्याची लिंक 

पहिल्या टप्प्यात, जानेवारी २०२४ मध्ये प्रकाशित जाहिरातींनुसार २१,६७८ रिक्त पदांवरील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आता, दुसऱ्या टप्प्यातील रिक्त शिक्षक पदांसाठी २० जानेवारी २०२५ रोजी पोर्टलवर व्यवस्थापनांना जाहिरात प्रसिद्ध करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ६१९ संस्थांनी विविध माध्यमांसाठी ६७१ जाहिरातींची नोंदणी केली आहे.

शाळांमधील रिक्त शिक्षक पदे तातडीने भरण्यासाठी संबंधित शैक्षणिक संस्थांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात नोंदविण्याची कार्यवाही करावी. संस्थांनी पोर्टलवर जाऊन पदभरतीसाठी आवश्यक ती माहिती भरावी आणि प्रक्रिया पूर्ण करावी. जाहिरात प्रसिद्ध करताना काही अडचणी आल्यास, संबंधित संस्थांनी ई-मेलद्वारे अधिकृत संपर्क साधावा.

या प्रक्रियेमुळे शिक्षक भरती अधिक पारदर्शक व संगणकीकृत पद्धतीने पार पडणार असून, शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. विविध शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सर्वच व्यवस्थापनांना २० जानेवारीपासून सुविधा दिली आहे. मात्र अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी शैक्षणिक व्यवस्थापन यांच्याकडून शिक्षकांच्या पदभरतीबाबत पवित्र पोर्टलवर अत्यल्प प्रमाणात जाहिराती आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर आता पवित्र पोर्टलवर ( Pavitra portal Login for teacher recruitment ) शिक्षक भरतीसाठीच्या जाहिराती टाकण्याचे आवाहनही शिक्षण आयुक्तालयाने केले आहे. त्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंतची मुदतही देण्यात आली आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड