आजपासून बदलले Income Tax चे नियम

IT Return New Rules

Friends Pleas see the below New rules of Income Tax : आज एक महत्वाचे बातमी म्हणजे मित्रानो, एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष २०२०-२१ सुरु होत असून कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला रोखण्यासाठी सरकारने आधीच्या २०१८-१९ साठी आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढवली आहे. बजेट २०२० मध्ये आयकरच्या नियमांमध्ये काही बदल केले गेले असून ते आज १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल…

नवीन टॅक्स स्लॅब :- बजेट २०२० मध्ये घोषित केलेले नवीन टॅक्स स्लॅब लागू होणार असून जुना टॅक्स स्लॅबदेखील चालू राहणार आहे. करदात्यांकडे दोन पर्याय असतील त्यातील एक पर्याय निवडावा लागेल. बजेटमध्ये घोषणा केलेल्या नवीन टॅक्स रेटसनुसार, २.५० रुपये पर्यंत वर्षाला इन्कमवर शून्य टॅक्स लागेल. तर २.५ लाख रुपयापासून ते ५ लाख रु. इन्कमवर ५ टक्के, ५ लाख ते ७.५ लाख रु. इन्कमवर १० टक्के आणि ७.५ लाख ते १० लाख रु. इन्कमवर १५ टक्के, १० लाख ते १२.५ लाख रु. इन्कमवर २० टक्के आणि १५ लाख इन्कमवर २५ टक्के आणि १५ लाख पेक्षा जास्त इन्कमवर ३० टक्के टॅक्स लागेल. नवीन लोअर टॅक्सच्या दरात सर्व कपात सोडाव्या लागतील. कलम ८० सी अंतर्गत मिळणारी सवलत जसे की घरभाडे भत्ता, रजा प्रवास भत्ता आणि गृहकर्जांवर दिले जाणारे व्याज इ.

स्टार्टअपला दिलासा :- बजेटमध्ये स्टार्टअपच्या ESOP वरील टॅक्स नियम सोपे झाले आहेत. आता ESOP वर ५ वर्षानंतर टॅक्स देयता येईल. आतापर्यंत स्टार्टअप ESOP बाबत अनेक अडचणी आहेत केवळ २०० प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअपनाच ESOP योजनेचा लाभ मिळतो.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

करपात्र असेल ईपीएफ, एनपीएस मधील ७.५ लाख पेक्षा जास्त गुंतवणूक :- जर एनपीएस, वेतन निधी आणि EPF मध्ये कर्मचाऱ्याचे योगदान जास्त असेल तर आता कर्मचाऱ्यांसाठी टॅक्स करपात्र असेल. इन्कमटॅक्स नियमात हा बदल जुन्या आणि नवीन कर व्यवस्था दोन्हीसाठी लागू होणार आहे.

लाभांश वितरण कर :- बजेट २०२० मध्ये कंपन्यांनी व म्युच्युअल फंडाने भरलेल्या डिव्हिडंडवर डीडीटी रद्द केला गेला असून आता कर डिव्हिडंट प्राप्तकर्त्यांना भरावा लागेल. जर तुम्हाला म्युच्युअल फंडकडून डिव्हिडंट मिळाला तर त्याला तुमची मिळकत समजली जाईल आणि तुम्हाला तुमच्या टॅक्स स्लॅब दरावर कर भरावा लागेल.

गृहकर्जाच्या व्याजावर पुढच्या वर्षी मार्चपर्यंत मिळत राहणार टॅक्स बेनिफिट :- सरकारने गृहकर्जाच्या व्याजावर टॅक्स बेनिफिटची मुदत वाढवली असून आता ३१ मार्च २०२१ पर्यंत याचा लाभ घेऊ शकता. गृहकर्ज व्याजावर ३.५ लाख रुपये पर्यंत कर सवलत मिळते. सरकारच्या या पावलांमुळे घर खरेदी करणाऱ्यांना पहिल्यांदाच फायदा होणार आहे. जर ३१ मार्च २०२१ च्या आधी ४५ लाख रुपयेपर्यंत घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले असेल तर त्या डिडक्शनचा फायदा घेतला जाऊ शकतो.

 

सौर्स : पोलिसनामा

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड