आता १४१ महसूल सहायकांच्या रिक्तपदांची भरती कधी होणार? – Mahsul Sahayak Bharti 2025
Mahsul Sahayak Bharti 2025
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात तलाठी पदाची नुकतीच भरती प्रक्रिया झाली असून आता यापुढे महसूल विभागातील १४१ सहाय्यकांच्या रिक्त पदांची भरती केव्हा होणार असा प्रश्न विचारला जात आहे. हि रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी शी मागणी होत आहे. पुणे उपविभागात सुमारे ३ हजार सहाय्यकांची पदे रिक्त आहेत. त्यातही सर्वाधिक २ हजार ४७१ रिक्त पदे तलाठ्यांची असल्याने सद्यस्थितीत एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार दिला गेला आहे. प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठी जातो. अनेकदा एखाया गावात तलाठी १५ दिवसातून एकदाच येतात. वामुळे शेतकऱ्यांना चावडीच्या पावऱ्या किमान चार वेळा तरी चढाव्याच लागतात. तलाठ्यांचा भार हा अनेकदा कोतवालावरदेखील पडतो. राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या तलाठ्यांवरील भार कधी कमी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महसूल विभागात रिक्त राहिलेल्या सहायकांच्या जागा तातडीने भरावे अशी मागणी जिल्ह्यातून होत आहे.
राज्यात सर्वाधिक महसूल वसूल करण्यात तलाठी ‘क’ वर्गाचा क्रमांक पहिला आहे. प्रत्येक गावात चावडीवर तलाठी कार्यालय असले तरी तिथे तलाठी असेलच असे नाही. कारण एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. सोलापूर जिल्ह्यातील महसूल विभागामध्ये गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये जवळपास २०० पेक्षा जास्त पदे सरळसेवा च्या माध्यमातून भरली गेली आहेत. उर्वरित पदे हे महसुलच्या विभागातील रिक्त जागेनुसार २०% पदे अनुकंपाच्या माध्यमातून भरली गेली आहेत. वात प्रामुख्याने क्लार्कच्या जागा अद्याप भरल्या जातील. २०२५ च्या नवीन आकृतीबंधानुसार नवीन तलाठी भरती होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यात महसूल विभागाचा महत्त्वाचे कणा समाजले जाणारे तलाठी भरती २०१८-२०१९ मध्ये पार पाडली. त्यानंतर कोरोनामुळे २ वर्षे आणि नंतर लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमुळे तसेच न्यायालयीन प्रकरणामुळे ही भरती रखडली होती २०२३-२०२४ला ही भरती पुन्हा एकदा सुरू झाली. आजपर्यंत सरळ सेवेने २०८ तसे अनुकंपाच्या माध्यमातून जवळपास २८ आणि २०१९-२० च्या विशेष भरती माध्यमातून अनुसूचित जमाती पदभरती किमान ३० पदे भरली गेली आहेत. मात्र नवीन आकृतीबंधा नुसारनवीन तलाठी भरती होण्याची शक्यता आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
वित्त व सामान्य प्रशासन विभागाची परवानगी असेल तर उर्वरित रिक्त जागा लवकर भराव्यात तसेच २०२५ ची नवीन आकृतीबंधानुसार जिल्हानियाह यादी तयार करून उर्वरित जागा यामध्ये सामाविष्ट करून शासनाकडे पाठवली जावी. राज्यातील असंख्य गावांना तलाठी उपलब्ध होऊन तेथील समस्या दूर होतील. सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाचे विविध योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी तलाठी पदे भरली जावीत. अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.