रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड करा- Raigad DCCB Clerk Admit Card
Raigad DCCB Clerk Admit Card Download
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, अलिबाग यांच्या लिपिक (क्लार्क) हुद्द्याच्या रिक्त पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. हो ऑनलाईन परीक्षा १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी आयोजित केली जाईल. या परीक्षेसाठी अर्ज करणारे उमेदवार ज्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे. त्यांना बँकेच्या संकेतस्थळावरून (https://www.rdccbank.com किवा https://raigaddccbrecruitment.com) १३ जानेवारी २०२५ पासून १७ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीपर्यंत आपले हॉल तिकीट डाउनलोड करणे आवश्यक आहे. उमेदवारांना हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी SMS द्वारे देखील लिंक प्राप्त होईल. परीक्षेपूर्वी १५ आणि १६ जानेवारी रोजी बँकेच्या संकेतस्थळावर प्रात्यक्षिक परीक्षा (Trial Exam) आयोजित केली जाईल. अधिक माहितीसाठी किंवा शंका असल्यास, कृपया ९२२५१७६१०० वर संपर्क साधा किंवा recruitment2024@rdccbank.in वर ई-मेल पाठवा. हॉल तिकिटावर दिलेल्या सूचनांचे पालन करून उमेदवारांनी योग्य वेळी परीक्षा केंद्रावर हजर राहावे.
प्रवेशपत्र डाउनलोड करा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
१) परीक्षार्थीने परीक्षेच्या वेळेपूर्वी नक्की १ तास आधी परीक्षा केंद्रावर हजर राहावे, जे ई-प्रवेशपत्रावर नमूद केले आहे.
२)ई-प्रवेशपत्र/हॉल तिकिटावर नमूद केलेल्या प्रवेश वेळेपासून ४५ मिनिटांनंतर परीक्षार्थीला परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
३) परीक्षा केंद्रावर आसन व्यवस्था केली आहे. परीक्षार्थ्याने आपला आसन क्रमांक पाहून संबंधित परीक्षागृहात जावे व आपले नियोजित आसन घेणे आवश्यक आहे.
४) परीक्षार्थ्याने मूळ शासकीय ओळखपत्र (ड्रायव्हिंग लायसन्स / आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र) यापैकी कोणतेही एक सोबत आणणे आवश्यक आहे.
५) परीक्षेच्या दिवशी परीक्षार्थ्याने ई-प्रवेशपत्र/हॉल तिकिटावर पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत सही करणे आणि परीक्षेनंतर ते पर्यवेक्षकाला सुपूर्द करणे अनिवार्य आहे. परीक्षेची वेळ ई-प्रवेशपत्रावर नमूद केल्याप्रमाणेच असेल. परीक्षेला सुरुवात होताच परीक्षार्थ्याने तत्काळ परीक्षा पोर्टलमध्ये लॉगिन करून परीक्षा सुरू करावी.
६) सिस्टम संबंधित तांत्रिक अडचणीं बद्दल परीक्षार्थ्याने पर्यवेक्षकाला त्वरित कळवावे. पर्यवेक्षक त्या समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन करतील.
७) परीक्षेसाठी लागणारे लॉगिन क्रेडेन्शियल्स परीक्षार्थ्याला पुरविण्यात आलेले आहेत. त्यांचा वापर करून प्रणालीमध्ये लॉगिन करावे.
८) तांत्रिक किंवा इतर अडचणी सोडवण्यासाठी लागणाऱ्या वेळेसाठी परीक्षार्थ्यांनी घाबरू नये. अशा परिस्थितीत त्वरित पर्यवेक्षक किंवा निरीक्षकाशी संपर्क साधावा.
९) परीक्षार्थ्याने फक्त साधा बॉल पॉईंट पेन परीक्षा हॉलमध्ये नेणे आवश्यक आहे. पारदर्शक पाण्याची बाटली अनुमत आहे. परीक्षार्थ्यांना पुस्तकं, मोबाईल, स्मार्ट घड्याळ, इअरबड्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, फॅन्सी पेन, पेपर किंवा अन्य कोणत्याही साहित्यास परीक्षा हॉलमध्ये नेण्यास परवानगी नाही. अशा कोणत्याही साहित्यासोबत आढळल्यास, संबंधित परीक्षार्थ्याला परीक्षेतून तसेच पुण्याच्या सारथी योजनेतील कोणत्याही भविष्यातील लाभांपासून वंचित केले जाईल.
१०) परीक्षेच्या वेळा संपण्यापूर्वी कोणत्याही परीक्षार्थ्यास परीक्षागृहाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
११) परीक्षेची वेळ संपल्यानंतर फक्त अपंग परीक्षार्थ्यांनाच परीक्षागृहात थांबण्याची परवानगी असेल.
१२) परीक्षार्थीने परीक्षाकेंद्रावर आणलेल्या वस्तूंची काळजी स्वतः घ्यावी. वस्तू हरवल्यास कोणतीही अधिकृत जबाबदारी घेतली जाणार नाही.
१३) सर्व परीक्षा हॉल कॅमेरा निरीक्षणाखाली आहेत.