पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती करणार! महाराष्ट्र महिला पोलीस भरती प्रक्रिया – Mahila Police Bharti 2025
Mahila Police Bharti 2025
दिवाळीचा सण पार पडल्यानंतर काल महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) प्रचाराचा शुभारंभ कोल्हापूरमधून (Kolhapur) करण्यात आला. कोल्हापूरमधून प्रचाराचा शुभारंभ करण्याची परंपरा ही शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ती परंपरा कायम ठेवत कोल्हापूरमधून प्रचाराचा नारळ फोडला. कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार हातकलंगलेमधील अशोकराव माने आणि शिरोळमधील अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्यासाठी भव्य सभा पार पडल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार के पी पाटील यांच्यासाठी आदमापुरत सभा झाली. या अंतर्गत विविध घोषणांमध्ये महिला पोलीस भरती संदर्भात सुद्धा घोषणा झाल्यात.
यावेळी ठाकरे यांनी बोलताना फुटलेली शिवसेना, गेल्या पाच वर्षातील राजकीय घटनांचा आढावा घेतानाच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर काय करणार? याची सुद्धा माहिती दिली. यावेळी पाच महत्त्वाच्या घोषणा उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आल्या. यामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला पोलिसांची भरती हा सुद्धा प्रामुख्याने मुद्दा होता. ठाकरे म्हणाले की, पोलिस ठाण्यात गेल्यानंतर महिलांना कुठे तक्रार करायची, हे अनेकदा लक्षात येत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात मविआची सत्ता आल्यास महिला पोलिसांची भरती केली जाईल. पोलीस ते वरिष्ठ पदांवर महिला अधिकारी असलेली पोलीस ठाणे सुरु करण्यात येईल. राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाही 2100 रुपये, पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती. तसेच, राज्यातील तरुणांना 25 लाख रोजगार देणार.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तसेच नवीन माहिती नुसार सरकार यावर प्रामुख्याने महाराष्ट्र सरकारने पोलिस दलात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पुढील काही वर्षांत पोलिस दलात 25,000 महिलांची भरती केली जाणार आहे. यामुळे महिला सक्षमीकरणास चालना मिळणार असून, सुरक्षा क्षेत्रातही महिलांचा महत्त्वाचा सहभाग वाढेल. महिलांच्या उपस्थितीमुळे पोलिस सेवांमध्ये एक नवीन दृष्टीकोन येईल, ज्यातून महिलांशी संबंधित गुन्ह्यांची तक्रार व सोडवणूक अधिक संवेदनशीलतेने होऊ शकेल. महिलांची भरती केल्यामुळे पोलिस दल विविधता आणण्यास यशस्वी होईल. या उपक्रमामुळे महिलांना रोजगाराच्या संधी वाढतील तसेच महिलांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण निर्माण होईल. महिलांचा सहभाग असल्याने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने समाजात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे समाजातील महिलांची सुरक्षा वाढेल आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांवर अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवता येईल. या निर्णयाचे स्वागत सर्व स्तरावर होत आहे, कारण यातून महिलांचे योगदान आणि त्यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ होणार आहे.