खुशखबर! – रोजगार सक्षम बनविण्यासाठी सरकार तरुणांना देणार ६६ हजार रुपये

PM Internship Yojana

PM Internship Yojana Maharashtra  – तरुणांना रोजगारासाठी पात्र बनविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने गुरुवारी पथदर्शक तत्त्वावर पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू केली. या योजनेत निवड झालेल्या तरुणांना वर्षभर ५ हजार रुपयांचे मासिक अर्थसाह्य दिले जाईल. याशिवाय इंटरर्नशिपमध्ये सहभागी होण्यासाठी एकरकमी ६ हजार रुपये दिले जातील. अशा प्रकारे एकूण ६६ हजार रुपयांची मदत त्यांना मिळेल. चालू वित्त वर्षात १.२५ लाख इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. त्यावर ८०० कोटी रुपये खर्च होतील. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्त वर्ष २०२४-२५ च्या आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात या योजनेची घोषणा केली. यात ५ वर्षांत १ कोटी तरुणांना देशातील सर्वोच्च ५०० कंपन्यांत प्रशिक्षणाची संधी असेल, विविध व्यावसायिक वातावरणात १२ महिने कामाची कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल.

PM Internship Yojana

योजनेसाठी पात्रता काय? (Eligiblity For PM Internship Yojana)

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्रशिक्षणार्थीना मिळणाऱ्या मासिक अर्थसाह्यापैकी ४,५०० रुपये सरकार उमेदवारांच्या खात्यात जमा करेल. ५०० रुपये संबंधित कंपनी सीएसआर कोषातून अदा करील. नोकरी न करणारे तसेच शिक्षण घेत नसलेले २१ ते २४ या वयोगटातील युवक योजनेच्या लाभासाठी पात्र ठरतील. यासाठी शैक्षणिक अट १० वी १२ वी उत्तीर्ण, आयटीआय, पॉलिटेक्निक डिप्लोमा, बीए, बी.एससी, बी.कॉम, बीसीए, बीबीए, बी. फार्मा. आदी पदवीधारक अशी आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड