महावितरणची कागदपत्र पडताळणी स्थगित

Mahavitaran Bharti 2020 Postponed

करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने १८ मार्च रोजी नियोजित तारतंत्री व वीजतंत्री या शिकाऊ उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी कार्यक्रम तात्पुरता स्थगित केला आहे. महावितरणचे नाशिक परिमंडळ मुख्य अभियंता ब्रिजपाल सिंह जनवीर यांनी ही माहिती दिली. या बदलाची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहानही महावितरण प्रशासनाने केले आहे.

शासन करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत असून, त्यानुसार महावितरणच्या नाशिक परिमंडळात नाशिक शहर मंडळ व मालेगाव मंडळ या अंतर्गत तारतंत्री व वीजतंत्री या शिकाऊ उमेदवार पदाकरिता १८ मार्च रोजी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार होती. या भरती प्रकियेदरम्यान संभाव्य गर्दी टाळण्यासाठी, तसेच करोना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ही पडताळणी तात्पुरती स्थगित केली असल्याचे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे. महावितरणच्या नाशिक परिमंडळअंतर्गत असलेल्या नाशिक शहर मंडळामध्ये १४९ तथा मालेगाव मंडळमध्ये १२५ तारतंत्री व वीजतंत्री या शिकाऊ पदाची निवड करण्यासाठी एकलहरे, नाशिक, तसेच मालेगाव येथे कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार होती. पडताळणीचा हा नियोजित कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. या भरतीप्रकियेची पुढील प्रक्रिया व कागदपत्रे पडताळणीसंदर्भातील तारीख माध्यमातून स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Chetan Patil says

    माझं शिक्षण हे सुरत ,गुजरात मध्ये झालं आहे आणि कोलेजच शिक्षण पण सुरत, गुजरात मध्ये झालं माझा जन्म अकोला, महाराष्ट्र राज्यात झाला आहे.
    मला महाराष्ट्र राज्यात government job साठी apply करायचं आहे. कृपया तुमच्या मार्गदर्शन ची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड