आश्रम शाळेत क्रीडा शिक्षकांची भरपूर पदे रिक्त! – Ashram Shala Krida Shikshak Bharti

Ashram Shala Sports Teacher Recruitment

आता भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली; परंतु मित्रांनो , अजूनही विविध गावात असलेल्या आश्रमशाळांमध्ये क्रीडा शिक्षकच नाहीत. हि सध्याची सद्य परिस्थिती आहे. क्रीडा शिक्षकांची अनेक पदे  रिक्त असून अनेक होतकरू खेद शिक्षकांच्या प्रतीक्षेत आहे.  देशासाठी आदिवासी खेळाडूंनी अनेक पदके मिळविली आहेत. आदिवासी क्षेत्रातच कसदार खेळाडू तयार होत असल्याने अशा खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना संधी देणे अपेक्षित आहे. शाळां, आश्रमशाळांमध्ये खेळाडू घडत असतात. परंतु आजही अनेक आश्रमशाळांमध्ये क्रीडा शिक्षकच नसल्याने खेळाडू तयार होतील कसे? त्या मुले हि सर्व पदे त्वरित भरण्यात यावी अशी मागणी होत आहे. 

Ashram Shala Krida Shikshak Bharti

पुरातन काळापासूनच क्रीडा क्षेत्राला महत्त्व आहे. अनेक खेळांचा उगम भारतातच झालेला आहे. खेळाच्या माध्यमातून जागतिक विकास साधता यावा व मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावे म्हणून इ.स. १८९६ सालापासून जगामध्ये ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात झाली. पारतंत्र्य काळापासूनच भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेत अनेक पदके पटकावली आहेत. देशातून असे खेळाडू घडत राहावे व देशाला वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेत पदक मिळवून देत राहावे यासाठी भारतीय खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी भारतात हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन २९ ऑगस्ट हा दिवस क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्रातही शालेय विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य असे क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले तर हे देशाला विविध क्रीडा स्पर्धेत नक्कीच नावलौकिक मिळवून देतील. त्यामुळे महाविद्यालयाप्रमाणेच प्रत्येक आश्रमशाळेमध्ये क्रीडा शिक्षकांची नियुक्ती अनिवार्य करणे गरजेचे आहे. २९ ऑगस्ट मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस म्हणून क्रीडादिन साजरा होत असताना पहिल्या ऑलिम्पिक संघाचे नेतृत्व हे जयपालसिंग मुंडा या आदिवासी हॉकीपटूने केले होते त्याच आदिवासी असणाऱ्या अनेक खेळाडूंना मात्र क्रीडा क्षेत्रापासून वंचित ठेवले जात आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड