मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाचा लाभ घ्या, १३६८ पदांची भरती! – CMYKPY Jalgaon Bharti 2024

CMYKPY Jalgaon Bharti 2024

Jalgaon Mahanagar Palika

युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १३६८ युवकांना जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनांच्या माध्यमातून प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र बेरोजगार तरुणांनी अर्ज करुन या प्रशिक्षणाचा फायदा करुन घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित व उपमुख्यकार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांनी केले आहे. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसह नुकत्याच सुरू केलेल्या ‘लाडका भाऊ’ योजनेंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून युवकांना सहा महिने मानधन देऊन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत १ हजार ३५४ युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी जि. प.च्या सामान्य प्रशासन विभागाकडून यासाठी तयारी सुरू झाली आहे. शासनाच्या संकेतस्थळावर जिल्ह्यासाठी आलेल्या अर्जदारांना यात संधी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी शासनाकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत, यासाठी जि, प.ला १ हजार ३५४ जागा भरता येणार आहे. यात १८ ते ३५ वयोगटातील विद्यार्थी, विद्यार्थिनींना सहा महिने रोजगार मिळणार आहे. त्यातून त्यांना मानधनदेखील दिले जाणार आहे.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यातील सर्वाधिक नियुक्त्या ग्रामपंचायतींमध्ये मिळणार आहेत. १ हजार ३५४ जागांपैकी प्रत्येक ग्रामपंचायतीला एका विद्यार्थ्यांला प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे. १ हजार १४९ पदे ग्रामपंचायतींत भरली जाणार आहेत. त्यामुळे बेरोजगार युवकांना गावात काम करण्याची संधी मिळणार आहे. शैक्षणिक पात्रता १२ वी पास असलेल्यांना दरमहा ६ हजार, आयटीआय झालेल्या उमेदवाराला कंपनीमध्ये ८ हजार, तर पदवी झालेल्यांना १० हजार रुपये मिळणार आहेत. पदवी व बारावी झालेल्या मुला- मुलींना पंचायत समिती, जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी मिळणार असून, या दोन्ही कार्यालयांत जिल्ह्यात १९५ पदे आहेत. ऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या गावासाठी अथवा पं.स., जि.प.साठी अर्ज केला आहे, त्या कार्यक्षेत्रातील बीडीओ अथवा जि.प. कडून नियुक्त्या दिल्या जाणार आहेत, असे जि. प. प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी १८ ते ३५ वर्ष वय असलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत १२ उत्तीर्ण उमेदवारांना ६ हजार,आयटी आय व पदविका उत्तीर्ण उमेदवारांना ८हजार, पदवीधर व पदवीत्तर उत्तीर्ण उमेदवारांना १० हजार रुपये इतके विद्यावेतन दरमहा देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने इतका राहणार आहे. यासाठी उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुख्यालय, पंचायत समिती, गट शिक्षण अधिकारी कार्यालय, महिला व बालविकास विभाग, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, बांधकाम उपविभाग, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत अशा विविध आस्थापनांसाठी १३६८ युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आतापर्यंत ५६१ उमेदवारांना या अंतर्गत प्रशिक्षणासाठी नियुक्ती देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पर्याय देखील उपलब्द करुन देण्यात आला आहे. जळगाव जिल्हा परिषदेने उपलब्ध करुन दिलेली संधी विचारात घेऊन जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी केले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड