खुशखबर – ‘बहिणीं’ च्या खात्यावर रक्षाबंधनापूर्वी ३ हजार रुपये होणार जमा! – Ladki Bahin Yojna Payment Status
Ladki Bahin Yojna Payment Status
लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना धडकी भरली आहे. कितीही अपप्रचार केला तरी रक्षाबंधनापूर्वी त्यांच्या खात्यावर ३ हजार रुपये टाकणार आहे. ज्या महिलांनी ० बॅलेन्सवर बँक खाते उघडले आहे ते खाते सुरू आहे की नाही चेक करण्यासाठी अशा सर्व महिलांच्या खात्यावर तत्काळ १०० रुपये टाकणार आहे. त्यानंतर दोन महिन्याचे ३,००० रुपये जमा केले जातील. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ही योजना सुरू राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लोड येथे दिली. राज्य महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ सिल्लोड येथे शुक्रवारी करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. कार्यक्रमासाठी जमलेली महिलांची गर्दी बघून मुख्यमंत्री त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे याही यावेळी उपस्थित होत्या.
पुढील सर्व अपडेट्स साठी व्हाट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Ladki Bahi Yojna Payment Status – राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला’ चांगला प्रतिसाद मिळत असून पात्र अर्जदारांच्या निवडक खात्यात पहिल्यांदा एक रुपया जमा करण्याचा निर्णय महिला बालविकास विभागाने घेतला आहे. ही एक तांत्रिक पडताळणी आहे. त्यावरून अफवा, अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन महिला विकासमंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. महिलांच्या खात्यात एक रुपया जमा झाल्याने विरोधक अपप्रचार करू शकतात, हे गृहीत धरून ही खबरदारी घेण्यात आली आहे.
मध्य प्रदेशाच्या धर्तीवर राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आहे. राज्यातील दोन कोटी ४५ लाख महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. सध्या एक कोटी ८० लाख महिलांनी अर्ज भरलेले आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. प्राप्त अर्जांची सध्या छाननी सुरू आहे. यातील पात्र महिलांना तांत्रिक पडताळणीसाठी बँक खात्यात एक रुपया जमा केला जाणार आहे. रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदर पात्र महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत. त्यापूर्वी ही पडताळणी होणार आहे. महिलांच्या खात्यात एक रुपया जमा झाल्याने सरकारच्या विरोधात अपप्रचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्री तटकरे यांनी हे निवेदन जाहीर केले आहे.
Comments are closed.