मुंबई विद्यापीठ पदवी प्रवेशाची तिसरी प्रवेश यादी आज – Mumbai University Admission List 2024

Mumbai University Admission List 2024

Mumbai University Admission List 2024 – मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची तिसरी प्रवेश यादी शुक्रवार, २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे. तिसऱ्या प्रवेश फेरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांचे वर्ग ४ जुलैपासून सुरू होणार आहेत, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. यंदा मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी ही एकूण २ लाख ५० हजार ४५३ विद्यार्थ्यांनी केली आहे. या सर्व विद्याथ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ८ लाख ७० हजार ५९५ एवढे अर्ज सादर केले आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जामध्ये बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक १ लाख ८८ हजार ३९० अर्ज आले आहेत. तसेच, पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या पहिल्या प्रवेश यादीनुसार स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये (कट ऑफ) वाढ झाली आहे तर पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये किंचितशी घट दिसत आहे. दुसऱ्या प्रवेश यादीनुसार पहिल्या प्रवेश यादीच्या तुलनेत प्रवेश पात्रता गुणांमध्ये ३ ते ४ टक्क्यांची घट झाली होती. त्यामुळे, तिसऱ्या प्रवेश यादीतील प्रवेश पात्रता गुणांवर कितपत होतो आहे, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या संबंधित संकेतस्थळा वरून तिसरी प्रवेश यादी पाहता येईल. त्यानुसार २९ जून ते ३ जुलै, दुपारी ३ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करायचा आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न अनेक नामांकित महाविद्यांलयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये आता तिसरी यादी लागण्याची शक्यता कमीच आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड