मोटर अपघात दावा न्यायाधिकरण अंतर्गत १२४ पदांची भरती करण्याचे आदेश! – Mumbai Motor Accident Claims Tribunal Bharti 2025
Mumbai Motor Accident Claims Tribunal Bharti 2025
मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातील रिक्त पदे भरण्याचे आदेश देऊन वर्षाहून अधिक काळ लोटला तरी रिक्त पदे भरली नसल्याची उच्च न्यायालयाने सोमवारी गंभीर दखल घेतली. ही पदे भरण्यासाठी वर्षभरात काय प्रयत्न केले? अशी विचारणा करून प्रतिज्ञापत्राद्वारे त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. महाराष्ट्र राज्यात मोटार वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील वाढत्या मोटार वाहनांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. तथापि त्या प्रमाणात बळी पडलेल्या अपघातग्रस्तांना न्याय देण्याच्या दृष्टीने मोटार अपघातांची न्यायाधिकरणे स्थापन न झाल्यामुळे नुकसान भरपाईच्या खटल्यांचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. राज्यात सध्या मुंबईत ८, नागपूर येथे ४, पुणे येथे १ व ठाणे येथे १ अशी एकूण १४ मोटार अपघात दावा न्यायाधिकरणे कार्यरत आहेत. अपघातांचे व दाव्यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे वाढत्या कामकाजासाठी उपलब्ध कर्मचारी वर्ग कमी पडत आहे. त्यामुळे न्यायाधिकरणांचे दैनंदिन न्यायालयीन व प्रशासकीय कामकाज सुरळीत चालण्यासाठी सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनास प्राप्त झालेला आहे. त्यास अनुसरुन प्रशासकीय सोयीच्या दृष्टीकोनातून मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, मुंबई व राज्य परिवहन अपील न्यायाधिकरण, महाराष्ट्र राज्य, मुंबई या कार्यालयाच्या सद्य:स्थितीतील पदांची फेररचना करून सुधारित आकृतीबंधास मान्यता देणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
न्यायाधिकरणापुढील दाव्यांमध्ये जलदगतीने निर्णय घेणे आवश्यक आहे. परंतु, न्यायाधिकरणात पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत. तोपर्यंत मोटार अपघातातील पीडितांना जलद गतीने न्याय मिळणार नाही, असेही मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश देताना सरकारला सुनावले. मोटार वाहन कायद्यानुसार, प्रलंबित दाव्यांवर विशिष्ट काळात निर्णय घेण्याची तरतुद आहे. सरकारने १३ फेब्रुवारी २०२३ रोजी रिक्त पदांबाबत प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यानंतर रिक्त पदे भरण्यासाठी काय प्रयत्न केले हे स्पष्ट केले गेले नाही. त्यानंतर, रिक्त पदे भरण्याबाबत नव्याने आदेश दिले गेले. त्यामुळे, आदेशाच्या पूर्ततेसाठी वर्षभरात काय प्रयत्न केले? अशी विचारणा करून त्याची माहिती न्यायालयात सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले. मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातील रिक्त पदांचा मुद्दा न्यायाधिकरणातील वकील संघटनेने जनहित याचिकेच्या माध्यमातून २०२२ मध्ये उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला होता. तसेच, न्यायाधिकरणातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे आदेश राज्य सरकारला देण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन न्यायालयाने राज्य सरकारला रिक्त पदे भरण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Comments are closed.