प्रवेशासाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची एफवायची पहिली यादी १३ जूनला | FY Admission Merit List 2024
FY Admission Merit List 2024
FY Admission First Merit List 2024
FY Admission Merit List 2024: The university has started the admission registration from Saturday for the FY admissions for the 12th students now after the result. The first merit list of the students who have filled the application for admission will be announced on June 13. In accordance with the implementation of the National Education Policy, University of Mumbai will be able to conduct pre-admission online registration process for students who wish to take admission in the first year of 3 and 4 year degree courses for the academic year 2024-2025 in colleges affiliated to the University of Mumbai, autonomous colleges and recognized educational institutions.
बारावीच्या विद्यार्थ्यांना आता निकालानंतर एफवाय प्रवेशासाठी विद्यापीठाकडून शनिवारपासून प्रवेशाची नोंदणी सुरु करण्यात आली आहे. प्रवेशासाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची येत्या १३ जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजा- वणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया करता येणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी https://muadmissionug.sa- marth.edu.in/ या संकेतस्थळावर जाऊन करता येणार आहे. हे संकेतस्थळ शनिवारी संध्याकाळी ५ नंतर उपलब्ध होणार आहे.
पदवीच्या प्रथम वर्षासाठी होणारे सर्व प्रवेश आणि त्यांचे शैक्षणिक उपक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालयांनी निर्गमीत केलेल्या या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयांनी राबवावी. तसेच प्रवेश क्षमतेनुसार, आरक्षणाचे नियम व तरतूद आणि अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार पूर्ण करावी असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी महाविद्यालयांना आवाहन केले आहे.
मुंबई विद्यापीठातील अभ्यासक्रम… एफवायचे
प्रथम वर्ष बी. ए. बी.एस्सी, बी. कॉम, बीए, एमएमसी, बी. एसडब्ल्यू, बीए (फिल्म टेलेव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन), बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीएएमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन पाली) बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम (अकॉउन्टींग अँड फायनान्स), बीकॉम (बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम (इन्ट- हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज), बीएस्सी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), वीएस्सी (बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायोटेक्नॉलॉजी), बीएससी (मेरिटाईम), बीएस्सी (नॉटिकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी (एरोनॉटिक्स), बीएस्सी (डेटा सायन्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बी. व्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफ. वाय. बी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफवाय बी. लायब्ररी सायन्स, बी. म्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स) एफवाय. बीएस्सी (बायोएनॅलिटिकल सायन्स पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम)
असे आहेत प्रवेशाचे वेळापत्रक
• अर्ज विक्री (संबधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाईन/ऑफलाईन) २५ मे ते १० जून रोजी (दुपारी १.०० वाजेपर्यंत)
• प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया २५ मे ते १० जून
• ऑनलाईन अर्ज -२५ मे ते १० जून (१.०० वाजेपर्यंत)
(प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस एडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा ( प्रवेश या कालावधीत)
• पहिली मेरीट लिस्ट-१३ जून
(संध्याकाळी ५.०० वाजता)
• ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ३ वर्षीय
• पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स/ऑनर्स विथ रिसर्च, पाच वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
• एआयसीटी अंतर्गत बीएमएस अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलने पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर राबवली जाणार आहे.
-१४ जून ते २० जून (दुपारी ३.०० वाजेपर्यंत)
• द्वितीय मेरीट लिस्ट-२१ जून (संध्याकाळी ५.०० वाजता)
• ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे २२ जून ते २७ जून (दुपारी ३.०० वाजेपर्यंत)
• तृतीय मेरीट लिस्ट-२८ जून संध्याकाळी ५.०० वाजता)
• ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे २९ जून ते ०३ जुलै (दुपारी ३.०० वाजेपर्यंत)
• कर्मेसमेंट ऑफ क्लासेस / ओरिएंटेशन- ४ जुलै
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.