तरुणांनो खुशखबर! एक लाख एक हजार पदांची मेगाभरती

Mega Recruitment of One Lac One Thousand Posts

फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या 72 हजार पदांच्या मेगाभरतीत आणखी 29 हजार पदांची वाढ होणार आहे. दोन लाख रिक्‍त पदांपैकी 50 टक्‍के पदांच्या भरतीचा निर्णय वित्त विभागाने घेतला. त्यानुसार शासकीय विभागांमधील रिक्‍त पदांची माहिती नव्याने संकलित करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागातर्फे युध्दपातळीवर सुरु आहे. मात्र, भरती प्रक्रियेसाठी खासगी एजन्सी नियुक्‍ती झाल्यानंतरच मेगाभरतीला सुरुवात होईल, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अडीच महिन्यांत मेगाभरतीला सुरवात होणार

महापरीक्षा पोर्टल बंद केल्यानंतर आता महाआयटीच्या नियंत्रणात खासगी एजन्सीद्वारे मेगाभरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. पारदर्शक भरतीसाठी आयटी कंपन्यांमधील पदांची भरती करणाऱ्या सक्षम अशा संस्थेची नियुक्‍ती केली जाईल, असे महाआयटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी, शासनाच्या आठ विभागांसाठी महापरीक्षा पोर्टलकडे नोंदणी केलेल्या 34 लाख 83 हजार विद्यार्थ्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाला सुपूर्द केला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मेगाभरतीत आता आरोग्य, शिक्षण, महसूल, गृह, कृषी, पशुसंवर्धन विभागांमधील पदांची वाढ झाली आहे. वर्ग- एक व वर्ग- दोनच्या अधिकाऱ्यांची भरती एमपीएससीमार्फत तर वर्ग- तीन व चारच्या पदांची भरती खासगी एजन्सीद्वारे भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अडीच महिन्यांत मेगाभरतीला सुरवात होणार असून दिवाळीपूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे नियोजन आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ठळक बाबी… 

  • महाआयटीतर्फे खासगी एजन्सी नियुक्‍तीसह भरती प्रक्रियेचे झाले नियोजन 
  • महापरीक्षा पोर्टलकडील विद्यार्थ्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाला देण्याची तयारी पूर्ण 
  • भरती प्रक्रिया करणाऱ्या खासगी एजन्सीची क्षमता अन्‌ तांत्रिक समितीसाठी तज्ज्ञांची समिती 
  • एकूण रिक्‍त पदांच्या 50 टक्‍के जागा भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय 
  • मेगाभरतीनंतर राज्य सरकारला तिजोरीतून द्यावे लागणार दरवर्षी दहा हजार कोटी 

सोर्स : सकाळ


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Sandhya vijay Bhondve says

    Kadhi chalu honar bharti

  2. A. R. Raut. says

    सरजी, वनविभागाची भरती नाही का ? Please reply

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड