SRA चे शेकडो रखडलेले प्रकल्प लवकरच होणार सुरू, मुंबईकरांसाठी घराचे स्वप्न सत्यात उतरणार !! SRA Mumbai New Projects
SRA Mumbai New Projects
SRA Mumbai New Projects
SRA Mumbai New Projects: According to a senior SRA official, some financial institutions have shown interest in more than one project. Piramaya Capital Housing Finance has shown interest in 16 projects and IIFL in 10 projects. After obtaining the necessary permissions, the responsibility of completing the incomplete project will be entrusted to the financial institutions in the next few days. Construction of 47 projects of the Slum Redevelopment Authority (SRA), stalled for years due to lack of interest from builders, is likely to start soon. Know More update about Mumbai Slum Redevelopment Authority Project 2024 at below
बिल्डर्सनी कामात रस न दाखविल्याने वर्षानुवर्षे ठप्प असलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण एसआरए (SRA) च्या 47 प्रोजेक्टचे बांधकाम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. एसआरएचे अपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी (SRA Incomplited Projects To Complete) 16 वित्तीय संस्थांनी इंटरेस्ट दाखविला आहे. वित्तीय संस्थांच्या इंटरेस्टवर विचार करताना एसआरएनेही लोकांच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी वित्तीय संस्थांनाच प्रोजेक्टची जबाबदारी सोपविण्याची तयारी सुरू केली आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
एसआरएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, काही वित्तीय संस्थांना एकाहून अधिक प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट दाखविला आहे. पिरामय कॅपिटल हाऊसिंग फायनान्सने 16 प्रोजेक्ट आणि आयआयएफएलने 10 प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट दाखविला आहे. आवश्यक त्या परवानग्या प्राप्त झाल्यानंतर येत्या काही दिवसांत अपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण करण्याची जबाबदारी वित्तीय संस्थांकडे सोपविण्यात येणार आहे.
एसआरएचे शेकडो प्रकल्प रखडले
SRA प्रोजेक्टसाठी घरे रिकामी करूनही काम सुरू न केल्याने किंवा प्रोजेक्टचे काम अर्धवट सोडल्याने शेकडो एसआरए प्रोजेक्ट रखडले आहेत. अशा स्थितीत गेल्या वर्षी प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवणाऱ्या वित्तीय संस्थांच्या माध्यमातून अपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या योजनेवर एसआरए काम करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक बांधकाम व्यावसायिकांनी एसआरए प्रोजेक्टच्या नावाखाली वित्तीय संस्थांकडून कोट्यवधी रुपयांची कर्जे घेतली आहेत, मात्र पैसे घेऊनही शेकडो प्रोजेक्ट अद्याप सुरू झालेले नाहीत, तर अनेक प्रोजेक्टची कामे अर्ध्यावरच थांबली आहेत.
संस्थांना मिळणार अडकलेला पैसा
इमारत तयार होत नसल्याने वित्तसंस्थांचे पैसेही अडकले आहेत. अभय योजनेच्या माध्यमातून सरकार त्यांचे रखडलेले प्रोजेक्ट पुन्हा रुळावर आणण्यासाठी वित्तीय संस्थांकडून त्यांचे अडकलेले पैसे परत मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रोजेक्ट पूर्ण झाल्याने संस्थांना त्यांचे अडकलेले पैसेही मिळणार आहेत. ही योजना लागू करण्यासाठी, एसआरएने (SRA) गेल्या वर्षीच वित्तीय संस्थांकडून एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) मागितले होते. एसआरएच्या प्रस्तावात वित्तीय संस्थांनी रस दाखवला होता. संस्थांकडून चांगले संकेत मिळाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून आराखड्याचे काम सुरू असून, ते आता अंतिम टप्प्यात आले आहे.
असे होणार काम
अपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी एसआरएने आता सह-विकासकांची जबाबदारी वित्तीय संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत स्थानिक नागरिकांना घरे तयार केल्यानंतर अतिरिक्त घरे विकण्याचा अधिकार संस्थांना असेल. आर्थिक संस्था घरे विकून त्यांचे अडकलेले पैसे वसूल करू शकतील.
Comments are closed.