मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय !! उमेदवाराला निवड प्रक्रियेत मिळालेले गुण मागण्याचा हक्क | BHC Mumbai Bharti 2024
Bombay High Court Online (e-mail) Application 2024
Bombay High Court On Recruitment
सरकारी नोकर भरती प्रक्रिया ही पारदर्शक असायलाच हवी, नोकर भरतीत सहभागी झालेल्या उमेदवाराला निवड प्रक्रियेत मिळालेले गुण मागण्याचा हक्क आहे. ही वैयक्तिक माहिती नसून ती प्रदर्शित केल्याने कोणत्याही प्रकारच्या गोपनियतेचा भंग होत नाही. माहितीच्या अधिकारात ती माहिती दिली पाहिजे, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणेने याचिकाकर्त्याला माहिती देण्याचे निर्देश दिले. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरती अधिकृत व्हॉट्सअँप चॅनल या लिंक वरून लगेच जॉईन करा.
पुणे जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिक पदासाठी २०१८ साली ओंकार कळमणकर यांनी परीक्षा दिली. लेखी परीक्षेत व टायपिंग परीक्षेत पास झाल्यानंतर मुलाखतीत त्यांची निवड झाली नाही. त्यामुळे त्यांनी आरटीआय अंतर्गत गुणांसंदर्भात माहिती मागवली. ही माहिती देण्यास नकार देण्यात आला. या निर्णया विरोधात ओंकार कळमणकर यांच्यावतीने अॅड. उदय वारुंजीकर, अॅड. सुमित काटे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. महेश सोनक व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने याचिकेची दखल घेत सरकारी नोकर भरती ही पारदर्शक होण्याची गरज आहे. त्यात उमेदवाराला मिळालेल्या गुणांची माहिती करून घेण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट करत याचिकाकर्त्यांला माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
न्यायालय म्हणते
- सार्वजनिक भरती प्रक्रिया पारदर्शक असायला हवी. अशा निवडप्रक्रियेत उमेदवारांना मिळालेले गुण ही वैयक्तिक माहिती मानली जाऊ शकत नाही.
- माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदींनी केवळ अशा वैयक्तिक माहितीला सूट दिली आहे, ज्याच्या प्रकटीकरणाचा कोणत्याही सार्वजनिक क्रियाकलाप किंवा हिताशी संबंध नाही.
मित्रांनो, जर आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्या निकालांचे मराठीमध्ये भाषांतर करण्यासाठी बाह्य यंत्रणेद्वारे ४२ पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यासोबतच या पदांसाठीच्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला. तेव्हा लवकरच हि नवीन भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. तेव्हा आपण अर्ज करण्यास तयार रहा, हि नवीन जाहिरात आम्ही लवकरच प्रकाशित करू. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरती अधिकृत व्हॉट्सअँप चॅनल या लिंक वरून लगेच जॉईन करा.
सर्वोच्च न्यायालयाच्या एआय असिस्टंट लिगल ट्रान्सलेशन ॲडव्हायजरी कमिटीच्या निर्देशानुसार सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्या निकालांचे मराठीत भाषांतर करण्याचा उपक्रम उच्च न्यायालयाने हाती घेतला आहे. यानुसार अपील शाखेच्या आस्थापनेवर विविध संवर्गातील एकूण ४२ पदे सेवाभावी यंत्रणेद्वारे एक वर्षाच्या कालावधीकरता भरण्याची विनंती उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने शासनाकडे केली होती.
BHC Mumbai Bharti 2024: BHC (Bombay High Court) is going to conducted new recruitment for the posts of “Senior Civil Judge”. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidate can send their application form to the given address before the last date. The last date for submission of the applications is the 22nd of May 2024. For more details about BHC Mumbai Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार जनरल, मुंबई उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई, 400 032
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मे 2024
- अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/
BHC Mumbai Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश | 01 |
How To Apply For BHC Mumbai Notification 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.
- नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For bombayhighcourt.nic.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/flqPV |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://bombayhighcourt.nic.in/ |
Table of Contents
Comments are closed.