राखिवते संबंधीची माहिती न दिल्याुळे शिक्षक भरतीच रद्द! श्रेणी ३ च्या सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्याची भरती यापुढे..
GOA SHIKSHAK BHARTI
गोवा कर्मचारी भरती आयोगाने सहाय्यक शिक्षक पदांसाठी जारी केलेली भरतीची प्रक्रिया रद्द केली आहे. राखिवतेसंबंधीची माहिती शिक्षण खात्याकडून सादर न करण्यात आल्यामुळे ही भरती रद्द केल्याचे आयोगाने म्हटले आहे. श्रेणी ३ च्या सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्याची भरती यापुढे कर्मचारी भरती आयोगामार्फत केली जाण्याची घोषणा सरकारने केली होती. शिक्षण खात्यासह इतर खात्यांकडून त्यासाठी आयोगाकडे प्रस्ताव पाठविले होते. आयोगाकडून नोकरभरतीसाठी जाहिरातीही प्रसिद्ध करणे सुरू झाले होते.
निवडणूक आचार संहिता लागू होण्यापूर्वी आयोगाकडून ज्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्यात ३३ सहाय्यक शिक्षकांच्या भरतीसाठीचीही जाहीरात होती. इंग्रजी, हिंदी। कोंकणी। मराठी।संस्कृत या विषयासाठी तसेच गणित, रसायन शास्त्र आणि भौतिक शास्त्र या विषासाठी ही भरती होती. त्यानुसार अनेक उमेदवारानी अर्जही केले होते. मात्र ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेत राखिवतेसंबंधी काहीच माहिती शिक्षण खात्याकडून कर्मचारी भरती आयोगाला देण्यात आले नसल्यामुळे भरती प्रक्रिया पुढे नेण्यास आयोगाने असमर्थता दर्शविली आहे. भरती प्रक्रिया रद्द करण्याचे कारणही आयोगाने हेच सांगितले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Comments are closed.