भूकंपाने हादरला नागपूर जिल्हा; सौम्य धक्क्यामुळे ! – Earthquake Tremors In Maharashtra
Earthquake Tremors In Maharashtra
Earthquake Tremors In Nagpur
Earthquake Tremors In Maharashtra : महाराष्ट्रातील नागपुरात शुक्रवारी दुपारी २.५ रिश्टर स्केलचा हादरा जाणवला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुपारी 3.11 वाजता नागपूर विभागात पाच किलोमीटर खोलीवर तो धडकला, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने त्यांच्या वेबसाइटवर सांगितले. हा भूकंप खूपच किरकोळ होता आणि त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे तज्ञांनी सांगितले.
शहरासह नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी दुपारच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.५ इतकी नोंदविण्यात आली. या घटनेची दिवसभर चर्चा होती. चंद्रपूरचे हवामानतज्ज्ञ व पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी बसले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पारशिवनी तालुक्यातील सिंगोरी आणि हिंगणा येथील झिल्पी तलावाजवळही भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती आहे. तशी नोंद नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रात झाली आहे. धक्का सौम्य असल्यामुळे कुणालाच जाणवला नाही. त्यामुळे कोणतेही आर्थिक नुकसान किंवा जीवितहानी झाली नाही. भूकंपाची खोली अडीच किमी होती. स्थानिक भूगर्भातील हालचालींमुळे धक्का बसू शकतो, असेही प्रा. चोपणे यांनी सांगितले. नागपूर व विदर्भात नेहमीच अधूनमधून असे सौम्य धक्के बसत असतात. गेल्या २६ मार्च रोजीही नागपूर जिल्ह्यातील हिंगणा व कामठी तालुक्यांना २.८ रिश्टर स्केल इतका धक्का बसला होता. उल्लेखनीय म्हणजे, नागपूर व आजूबाजूचा परिसर भूकंपप्रवण भागांत मोडत नाही. त्यामुळे या भागात सहसा मोठा भूकंप होत नाही. तीन रिश्टर स्केलच्या खालील भूकंप सौम्य स्वरूपाचा मानला जातो.
Earthquake Tremors In Maharashtra Nagpur, Akola Distrcit
Earthquake Tremors In Maharashtra: Mild earthquake tremors were felt in Nagpur, Akola and Buldhana districts throughout the day on Tuesday. This earthquake has been recorded by the Central Seismological Department. But since these shocks were very mild, it was not noticed much. According to the information received from the website of the National Seismology Department, the first tremor hit Nagpur district at 2:53:39 PM. Its center was at Mohgaon in Hingana taluka. It was a very mild earthquake measuring 2.8 on the Richter scale and had a depth of 10 kilometers. Immediately after that, the second shock occurred at 3 hours 2 minutes 58 seconds. Its center was at Khedi, a village between Parshivani and Mauda talukas. The magnitude was 2.8 on the Richter scale. After this, at 6 pm, 18 minutes and 27 seconds, the third shock occurred in Akola district. Its center was 10 km from Malkapur, its magnitude was 2.9 on the Richter scale and its depth was 10 km. Since these shocks are mild in nature, hardly anyone is aware of them.
Mild Earthquake In Hingana
हिंगणा तालुक्यातील मोहगाव
मंगळवारी दिवसभर नागपूर, अकोला व बुलढाणा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत राहिले. केंद्रीय भूकंप विज्ञान विभागाद्वारे या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. मात्र हे धक्के अतिशय सौम्य असल्याने याची जाणीव फारशी झाली नाही. राष्ट्रीय भूकंप विज्ञान विभागाच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार पहिला हादरा नागपूर जिल्ह्यात दुपारी २ वाजून ५३ मिनिटे ३९ सेकंदाला बसला. याचे केंद्र हिंगणा तालुक्यातील मोहगाव येथे होते. रिश्टर स्केलवर २.८ एवढ्या अतिशय सौम्य क्षमतेचा हा धक्का होता व त्याची खोली १० किलोमीटर होती. त्यानंतर लगेच ३ वाजून २ मिनिटे ५८ सेकंदावर दूसरा धक्का बसला. पारशिवनी व मौदा तालुक्याच्या मध्ये खेडी या गावी त्याचे केंद्र होते. रिश्टर स्केलवर क्षमता २.८ होती. यानंतर सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटे व २७ सेकंदाला अकोला जिल्ह्यात तिसरा धक्का बसला. त्याचे केंद्र मलकापूरवरून १० किमी अंतरावर होते, त्याची क्षमता रिश्टर स्केलवर २.९ होती व खोली १० किमी होती. हे धक्के सौम्य स्वरूपाचे असल्याने त्याची जाणीव फारशी कुणाला झाली नाही.
बाळापूर, शेगावातही सौम्य धक्के
नागपूरपाठोपाठ अकोला भूकंपाचे धक्के जिल्ह्यातही बसल्यानंतर बाळापूर तालुक्यात अंत्री मलकापूर येथे, तर बुलढाणा जिल्ह्यात शेगाव येथेही भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंद झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात अंत्री भागात मंगळवारी सायंकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. गेल्या आठवड्यात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये भूकंप झाला होता. त्यानंतर आज अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे बसले आहेत.
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना जिल्ह्यात आज भूकंपाची घटना समोर आली. गेल्या आठवड्यात मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आदी जिल्ह्यांमध्ये भूकंप झाला होता. त्याच दिवशी अकोला जिल्ह्यात देखील भूकंप जाणवल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. मात्र, त्याची कुठलीही नोंद झाली नव्हती. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ६.२७ वाजता जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता २.९ रिश्टर स्केल नोंदवली गेली, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. या घटनेमुळे गावकरी चांगलेच हादरून गेले आहेत.
Table of Contents
Comments are closed.