काणकोण येथील नवीन फिल्मसिटीत ५ हजार नोकरीच्या संध्या! – Goa Film City Jobs

Goa Film City Jobs

Goa Film City Jobs – The talk of a film city in Goa has been going on for the last few days. There was a response from several places after it emerged that a site for FilmCity was underway. The project will create around 5,000 jobs, he said.  Goa Film City Jobs will be a adding that 10 lakh square metres of land has been earmarked in Kankon. FilmCity was the concept of former Chief Minister late Manohar Parrikar.

 

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून फिल्म सिटीबाबतची चर्चा सुरू आहे. फिल्मसिटीसाठी जागेचा शोध सुरू असल्याचे समोर आल्यानंतर अनेक ठिकाणांहून याला प्रतिसाद मिळाला. या प्रकल्पातून सुमारे 5,000 रोजगार उपलब्ध होतील, असे सांगत काणकोणमधील 10 लाख चौरस मीटर जागा निश्चित्त केल्याचे सांगितले. फिल्मसिटी ही माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांची संकल्पना होती. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या काणकोण येथे फिल्मसिटी व्हावी, त्यासाठी आवश्यक त्या सोयी पुरविण्याबाबत कटिबद्धता व्यक्त केली होती. त्यानंतर आता समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी या प्रकल्पातून सुमारे 5,000 रोजगार उपलब्ध होतील, असे सांगत काणकोणमधील 10 लाख चौरस मीटर जागा निश्चित्त केल्याचे सांगितले. फळदेसाई म्हणाले की, फिल्मसिटी उभारल्यानंतर पहिल्या पाच वर्षातच किमान 5000 नोकऱ्या उपलब्ध होतील. त्याचा पर्यटन क्षेत्रावर आणि इतर संबंधित क्षेत्रांवरही सकारात्मक परिणाम होईल. सरतेशेवटी त्याचा फायदा राज्यालाच होणार आहे. या प्रकल्पासाठी काणकोण येथील भगवती पठाराजवळ सुमारे 10 लाख चौरस मीटर जागा निश्चित्त केली आहे. ही जागा कोमुनिदादची आहे. फिल्मसिटी ही माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांची संकल्पना होती. काणकोणमधील स्थानिकांनाही फिल्मसिटीची उत्सुकता आहे.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अनेक लोकांनी या प्रकल्पासाठी जमीन देण्याची ऑफर दिली, त्यातील एक प्रस्ताव काणकोणचाही होता, असे ते म्हणाले. दरम्यान, यापुर्वी काही चित्रपट निर्मात्यांनी, फिल्म सिटीत रोजगार संधींसह ध्वनी मंच, धार्मिक स्थळे, तात्पुरते सेट, प्रशिक्षण संस्था आणि ओपन एअर थिएटर यासारख्या सुविधांची तरतूद सुनिश्चित करावी, असे म्हटले होते.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड