संभाजी नगर मध्ये नोकऱ्याच नोकऱ्या, औद्योगिक शहर वसणार- MIDC Sambhaji Nagar Bharti 2025
MIDC Sambhaji Nagar Bharti 2025
मित्रांनो, आत्ताच प्राप्त नवीन माहिती नुसार भारताच्या विकासाला चालना देण्यासाठी देशात 12 ठिकाणी औद्योगिक वसाहती उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल. त्यासाठी केंद्र सरकारने मोठी योजना हाती घेतली आहे. बजेटमध्ये निर्मला सीतरमण यांनी इन्फ्रा सेक्टरवर अधिक लक्ष केंद्रीत केले होते. अनेक नवीन महामार्ग, एक्सप्रेसवे तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. काही राज्यांमध्ये विकासाचा चेहरा मोहरा बदलण्याचा चंग बांधण्यात येत आहे. आता 12 नवीन शहरांना औद्योगिक हब तयार करण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यात राज्यातील छत्रपती संभाजीनगरचा समावेश करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने देशातंर्गत उत्पादन वाढवण्यासाठी ग्रेएर नोएडा, धोलेरा सह विविध राज्यात 12 नवीन औद्योगिक शहरे स्थापन करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये दोन आणि बिहारमध्ये एकाचा समावेश आहे. या नवीन औद्योगिक शहरांमुळे त्या त्या राज्यात रोजगार निर्मिती होईल. अनेकांच्या हाताला काम मिळेल. इतर राज्यांवरील परप्रांतीयांचा भार कमी होईल.
महाराष्ट्र राज्यात नाशिक, संभाजी नगर (अहमदनगर) जिल्ह्यासह चार जिल्ह्यात नवीन एमआयडीसी (New MIDC in Sambhaji Nagar Ahmadnagar) स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करावेत तसेच राज्यात यापुढे नवीन ‘एमआयडीसी’ उभारण्यासाठी किमान १०० एकर जमिनीची उपलब्धता करुन द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. याशिवाय पुणे जिल्ह्यातील डुंबरवाडी (ता. जुन्नर) येथे राज्यासह केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग पार्क उभारण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अजित पवार यांनी काल मंत्रालयात एमआयडीसीच्या संदर्भात आढावा घेतला. यावेळी बोलताना पवार यांनी नव्या एमआयडीसी स्थापन करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या राज्याच्या विकासात उद्योगांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. राज्याच्या उत्पन्न वाढीसाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना चालना देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा), अहमदनगर जिल्ह्यातील लिंगदेव, अकोले, नाशिक जिल्ह्यातील कळवण-सुरगाणा एमआयडीसी बरोबरच जांबुटके (ता. दिंडोरी) येथील आदिवासी औद्योगिक समूह विकास योजना तसेच अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे एमआयडीसीफ उभारण्यासाठीचे सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करा. एमआयडीसीच्या उभारणीसाठी किमान 100 एकर जमिनीची उपलब्धता असणे आवश्यक आहे. किमान 100 एकर जमीन उपलब्ध असेल तरच सर्वसोयींनीयुक्त एमआयडीसी उभी राहू शकते. त्यामुळे यापुढे एमआयडीसी मंजूर करताना किमान शंभर एकर जमिनीची उपलब्धता असणे आवश्यक आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यातील उंबरवाडी (ता. जुन्नर) येथे केंद्र फूड प्रोसेसिंग पार्क उभारण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. फूड प्रोसेसिंग पार्क उभारण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी स्थानिक आमदारांच्या सोबत जागेची पहाणी करावी, असे पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर बारामती एमआयडीसी मधील प्रलंबित कामे, चाकण एमआयडीसीतील शेतकर्यांच्या प्रश्नाविषयीही बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, आमदार किरण लहामटे, देवेंद्र भुयार, दिलीप मोहिते-पाटील, अतुल बेनके (व्हिसीद्वारे), आमदार नितीन पवार (व्हिसीद्वारे), नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा यांच्यासह संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व्हिसीद्वारे उपस्थित होते.
MIDC Sambhaji Nagar Bharti 2023 – The five-year plan of the district is being worked out in collaboration with NITI Aayog and the World Bank to increase investment in information and technology, defence, pharma and drone industries in the next five years under MIDC Sambhaji Nagar Bharti 2023. In this regard, the Guardian Secretary of the district and principal secretary of the industries department. Harshdeep Kamble v. C. Reviewed by. He directed the administration to work according to the new framework. Kamble was in the city all day on Friday.
वसाहतींमध्ये येणाऱ्या पाच वर्षांत माहिती व तंत्रज्ञान, डिफेन्स, फार्मा, ड्रोन इंडस्ट्रीत गुंतवणूक वाढावी, यासाठी नीती आयोग आणि जागतिक बँकेच्या सहयोगातून जिल्ह्याची पंचवार्षिक आराखडा ठरविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्याचे पालक सचिव तथा उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी व्ही. सी. द्वारे आढावा घेतला. नवीन फ्रेमवर्कनुसार प्रशासनाने काम करावे, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. कांबळे शुक्रवारी दिवसभर शहरात होते. औद्योगिक संस्थांनी आयोजित केलेल्या कामांसह बिडकीन इंडस्ट्रीयल पार्कला त्यांनी भेट दिली.
२०४७ पर्यंतचा आराखडा ठरविण्याचे काम मध्यंतरी सुरू होते. परंतु, शासनाने पाच वर्ष मर्यादेचे मॉडेल आणले आहे. पाच वर्षांत किमान महत्त्वाच्या बाबींवर लक्ष देऊन त्यातून आऊटपुट निघावे, त्यासाठी हा बदल केला आहे. त्याआधारे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील उपलब्ध साधनसंपत्ती, उद्योग, मनुष्यबळ, दळणवळण, पर्यटन, वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून एक अहवाल तयार करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले. ३० नोव्हेंबरपर्यंत हा आराखडा सादर करावा लागेल.
जिल्ह्यातील दोन पर्यटनस्थळे जागतिक नकाशावर आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने दळणवळण सुविधा वाढल्या आहेत. समृद्धी महामार्ग, छत्रपती संभाजीनगर व शिर्डी या दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांची सुविधा आहे. गुंतवणुकीसाठी डीएमआयसी, बिडकीन इंडस्ट्रीयल पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. त्याचा विचार रणनीती आखताना होणार आहे.