कुडाळात पोलिसपाटील, कोतवाल भरती | Kudal Police Patil Bharti 2023

Kudal Police Patil Bharti 2023

Kudal Police Patil Bharti 2023 : Out of 77 police posts in the taluka, 20 are vacant !! In Kudal Taluka,Sindhudurg District Of Maharashtra there is 20 Police Patil posts and 18 kotwal posts in the taluka will be filled soon. The process for this has been started through the District Magistrate’s Office and Kudal Tehsildar. Tehsildar Amol Pathak informed that the reservation process for the recruitment of this post is going on and the next process will be done soon. Know More about Kudal Police Patil Bharti 2023 at below :

तालुक्यातील २० पोलिसपाटील पदे व १८ कोतवाल पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. यासाठीची प्रक्रिया प्रांताधिकारी कार्यालय व कुडाळ तहसीलदार यांच्यामार्फत सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत या पद भरतीसाठी आरक्षण प्रकिया सुरू असून, पुढील प्रक्रिया लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार अमोल पाठक यांनी दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कोतवाल भरतीवर अनिश्चितीतेचे सावट, उमेदवार संभ्रमात! – Kotwal Bharti 2023

तालुक्यातील ७७ पैकी २० पोलिसपाटील पदे रिक्त झाली आहेत. यामध्ये पांग्रड, आवळेगाव, निरुखे व झाराप, सोनवडे तर्फ हवेली, केरवडे तर्फ माणगाव व पिंगुळी कांदुळी, बाव, चाफेली या गावांमध्ये उमेदवार प्राप्त नाही, मोरे, नेरुर तर्फ नारुर, वालावल, गोठोस, माणगाव, कुसबे, भरणी, कुपवडे, साळगाव, बांबुळी तर्फ हवेली येथील पोलिसपाटील कर्मचारी निवृत्त झाल्याने हे पद रिक्त आहे. तर १८ कोतवाल पदे रिक्त असून, यामध्ये कुडाळ, मडगाव, नेरुर तर्फ हवेली, घोटगे, वालावल, माणगाव, वसोली, पडवे, झाराप, बांबर्डे तर्फ कळसुली, बाव, नेरुर कर्याद नारुर, हिर्लोक, गोठोस, जांभवडे, पाट, तुळसुली तर्फ माणगाव व बिबवणे या गावांचा समावेश आहे.

पोलिस पाटील पदाची परीक्षा पुढे ढकलली | Police Patil Bharti 2023

पद भरतीसाठी आरक्षण प्रकिया सुरू

या पद भरतीसाठी आरक्षण प्रकिया सुरू केली आहे. यानुसार २५ जुलैला सर्व तलाठी, ग्रामपंचायत व तहसीलदार कार्यालय येथे लोकसंख्या तपशील प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर २५ ते २७ जुलैपर्यंत लोकसंख्येवर कोणाचे आक्षेप असल्यास ते लेखी स्वरुपात कुडाळ तहसील येथे स्वीकारण्यात आले.

काही महिन्यांत ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण करून ही पदभरती करण्यात येणार

३१ जुलैपर्यंत लेखी हरकतींवर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच आरक्षण व पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्या त्या गावांतील लोकसंख्येनुसार आरक्षण घोषित करण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यांत ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण करून ही पदभरती करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार पाठक यांनी दिली.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड