‘देशभरात द्यावी लागणार एकच परीक्षा; आता ‘नीट’ नव्हे, ‘नेक्स्ट | National Exit Test Registration Process

National Exit Test Registration Process

National Exit Test Registration Process

National Exit Test Registration Process: Until now, students of AIIMS, PGI, JIPMER and NIMHNS, including private institutions, had to appear for separate NEET exams; But instead of this, the medical authorities informed that now everyone will have to give a single ‘next’ exam. After MBBS, one has to appear for National Exit Exam, not PG, but ‘Next’. Moreover, doctors returning to India with medical education from abroad will now have to appear for the ‘Next’ exam instead of the MCI screening exam.

एमबीबीएसनंतर पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी आता नीट पीजी नाही, तर ‘नेक्स्ट’ अर्थात नॅशनल एक्झिट एक्झाम द्यावी लागणार आहे. शिवाय, विदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात परतणाऱ्या डॉक्टरांनाही आता एमसीआय स्क्रीनिंग परीक्षेऐवजी ‘नेक्स्ट’ परीक्षा द्यावी लागणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शासकीय वैद्यकीय शिक्षण

आतापर्यंत खासगी आणि संस्थांसह एम्स, पीजीआय, जेआयपीएमइआर आणि एनआयएमएचएनएस च्या विद्यार्थ्यांना वेगवेगळी नीट परीक्षा द्यावी लागत होती; मात्र या ऐवजी आता सर्वांना एकच ‘नेक्स्ट’ परीक्षा द्यावी लागणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पीजी नीटऐवजी नेक्स्ट परीक्षा द्यावी लागणार आहे. या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यशाळा पार पडली असून प्राध्यापकांसह २०० विद्यार्थ्यांचीही उपस्थिती होती.
-डॉ. मीनाक्षी गजभीये, अधीष्ठाता, जीएमसी, अकोला

दोन टप्प्यांत असणार ‘नेक्स्ट’ – ‘NExT’ will be in two phases

■ एमबीबीएस पदवीच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘नेक्स्ट’ परीक्षा द्यावी लागणार आहे. एमबीबीएसच्या पहिल्या भागात ‘नेक्स्ट-१’ मध्ये थेअरी, तर प्रशिक्षणादरम्यान नेक्स्ट-२’ मध्ये प्रात्यक्षिक घेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
■ भारतभरात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह विदेशातून वैद्यकीय पदवी घेऊन भारतात प्रॅक्टिस सुरु करू इच्छिणाऱ्या सर्वांना ‘नेक्स्ट’ ही एकच परीक्षा द्यावी लागेल.

... तरच तिथे नोंदणी शक्य – NExt Registration 2024

प्राप्त माहितीनुसार, नेक्स्ट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच विद्यार्थ्यांची आरएमसी किंवा एनएमसीमध्ये नोंदणी करणे शक्य असणार आहे. तसेच एफएमजीच्या विद्यार्थ्यांनाही यानंतर तात्पुरती नोंदणी करता येईल. संपूर्ण भारतात नेक्स्ट परीक्षेतील गुणांच्या आधारच सरकारी नोकरीस पात्र ठरतील. याच गुणांच्या आधारे स्कॉलरशिप आणि फेलोशिपमध्येही निवड होणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड