मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाकडे प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत, असं आहे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक | Mumbai University Admission Process
Mumbai University Degree Admission Process - mumoa.digitaluniversity.ac
Mumbai University Admission Process
ऑनलाईन प्रवेश अर्ज २०२४-२०२५ : खालील अभ्यासक्रमांसाठी मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाकडे प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
प्रवेश सुरू आहे
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
1. Pre Diploma Course हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम
२. Diploma हिंदुस्थानी शास्त्रीय गायन दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम
३. Diploma सुगम संगीत गायन दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम
४. Diploma हिंदुस्थानी शास्त्रीय वादन स्वरवाद्य सितार दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम
५. Diploma हिंदुस्थानी शास्त्रीय वादन तालवाद्य तबला दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम
६. PG Diploma in Proficiency in Playback Singing and Stage Performance दोन वर्षांचा पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासकम
७ Diploma हिंदुस्थानी शास्त्रीय वादन स्वरवाद्य हार्मोनियम दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम
पदविका अभ्यासकम ऑफलाईन
८. B. Mus. हिंदुस्थानी शास्त्रीय गायन तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम
९. B. Mus. हिंदुस्थानी शास्त्रीय वादन स्वरवाद्य (सितार) तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम
१०. B. Mus. हिंदुस्थानी शास्त्रीय वादन तालवाद्य (तबला) तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम
११. M. Mus. हिंदुस्थानी शास्त्रीय गायन दोन वर्षांचा पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रम
पदव्युत्तर / पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लिंक- https://muadmission.samarth.edu.in/test.php प्रवेश अर्ज १ जून, ते ३० जून, २०२४ पर्यंत उपलब्ध होतील.
संगीत विभागाचा पत्ता : संगीत विभाग, सांस्कृतिक भवन, दुसरा मजला, हंसमुग्रा मार्ग, मुंबई विद्यापीठ उत्तर गेटच्या समोर, सांताक्रूझ पू. मुंबई- ४०००५५ कार्यालयीन वेळात (11.00a.m. to 4.00p.m.) संपर्क साधावा
Email ID – [email protected]
(संपर्क : ९७०२०४८६६५, ८४२२८१८९९५)
Mumbai University Admission Process And Schedule
Mumbai University Admission Process: मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने एकेडॅमिक बँक ऑफ क्रेडिट आणि अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठामार्फत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत चारही विद्याशाखेतील विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ही सर्व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक आहे. https://muadmission.samarth.edu.in/ या संकेतस्थवळावर जाऊन विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. प्रवेश नोंदणी ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संकेतस्थळावर व्हिडिओ लिंक देण्यात आली आहे
पदवीच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया २५ मे २०२४ पासून
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया २५ मे २०२४ पासून सुरू करण्यात येणार आहे. या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत लवकरच जाहीर केले जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च, इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
असं आहे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
ऑनलाईन नाव नोंदणी आणि प्रवेशअर्ज सादर करणे- २२ मे ते १५ जून २०२४
विभागांमार्फत कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी – २० जून २०२४ ( संध्याकाळी ६ वाजेपर्यंत)
तात्पुरती गुणवत्ता यादी- २१ जून २०२४ ( संध्याकाळी ६ वाजता)
विद्यार्थी तक्रार – २५ जून २०२४ (दुपारी १ वाजेपर्यंत)
पहिली गुणवत्ता यादी – २६ जून २०२४ (संध्याकाळी ६ वाजता)
ऑनलाईन शुल्क भरणे – २७ जून ते ०१ जुलै २०२४ ( संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)
द्वितीय गुणवत्ता यादी- ०२ जुलै २०२४ (संध्याकाळी ६ वाजता)
Mumbai Vidyapeeth Admission 2024
Mumbai University Admission Process: The pre-admission online registration process of University of Mumbai will be started from May 27 for students who want to take admission in colleges and recognized educational institutes affiliated to University of Mumbai.
It is mandatory for the students who wish to take admission in the first year of the degree course to register online before admission with the University of Mumbai. For the academic year 2023-24, University of Mumbai offers first year BA, B.Sc, B.Com, BA.MMC, B.SW, BA (French Studies), BA (German Studies), Bachelor of Culinary Art, BA-MA ( Integrated Course in German Studies), BMS, BMS-MBA (Five Year Integrated Course), BCom (Financial Markets), and Other Various Courses.
राज्य मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. निकाल जाहीर होताच मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले. 27 मे पासून प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीला सुरुवात होणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Mumbai University Admission 2023 24
Pre-Admission Online Registration AY2023-24
शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी मुंबई विद्यापीठाने प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बीए.एमएमसी, बी.एसडब्ल्यू, बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीएमएस, बीएमएस-एमबीए ( पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) , बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम ( अकॉउन्टींग अँड फायनान्स), बीकॉम ( बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम ( फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम ( ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएस्सी ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पीटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी ( बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी ( मेरिटाईम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी ( एरॉनॉटिक्स), बीएस्सी ( डेटा सायन्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बी.व्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफ. वाय. बी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफवाय बी. लायब्ररी सायन्स, बी. म्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स) एफवाय.बीएस्सी ( बायोएनॅलिटिकल सायन्स- पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) यासह अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.
Schedule of Mumbai University Degree Admission Process 2023
कसे असणार मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक?
मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया 27 मे पासून सुरू करण्यात येणार आहे. या नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.
प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक :
- अर्ज विक्री – 27 मे ते 12 जून 2023 (दुपारी 1वाजेपर्यंत)
- प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – 27 मे ते 12 जून 2023 (दुपारी 1 वाजेपर्यंत
- अॅडमिशन फॉर्म सादर करण्याची तारीख – 27 मे ते 12जून 2023 (दुपारी 1 वाजेपर्यंत) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस एडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.
पहिली गुणवत्ता यादी – 19 जून 2023 ( सकाळी 11 वाजता)
- ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) –20 जून ते 27 जून 2023(दुपारी 3 वाजेपर्यंत )
द्वितीय गुणवत्ता यादी – 28 जून 2023 ( सायं. 7 वाजता)
- ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – 30 जून ते 5 जुलै 2023 ( दुपारी 3 वाजेपर्यंत)
तृतीय गुणवत्ता यादी – 6 जुलै 2023 ( सकाळी 11 वाजता )
- ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – 7 ते 10 जुलै 2023
पदवीच्या प्रथम वर्षासाठी होणारे सर्व प्रवेश आणि त्यांचे शैक्षणिक उपक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या तरतुदी आणि मार्गदर्शक तत्वानुसार होतील.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम https://mumoa.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी.
How To Apply For Mumbai University Degree Admission – ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- विद्यार्थ्यांने स्वतःबद्दलची माहिती भरुन नोंदणी करणे
- एकदा अचूक माहिती भरल्यावर दाखल केलेल्या मोबाईल क्रमांकावर युझर आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल.
- युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त होताच विद्यार्थ्यांने सर्वप्रथम स्वतःबदलची माहितीची खातरजमा करुन पासवर्ड बदलण्याची मूभा देण्यात आली आहे.
- विद्यार्थ्याला देण्यात आलेल्या युजरआयडी आणि पासवर्ड किवा बदलेल्या पासवर्डच्या मदतीने सर्वप्रथम स्वतःबद्दलची माहिती, शैक्षणिक गुणवत्ता, इ. माहिती भरावयाची आहे.
- त्यानंतर स्कॅन केलेला अद्ययावत फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे.
- Confirm Profile वर क्लिक करून माहितीची खातरजमा करता येईल.
- ऑनलाईन प्रवेश नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये नमुद केलेले शिक्षणक्रम विद्यार्थ्याने निवडायचे आहेत. सोबतच विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालये त्यांनी निवडायचे आहेत.
ऑनलाईन अर्ज भरताना खालील बाबींकडे लक्ष द्या
How do I get admission in mumbai university?
- प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी ही मल्टी कॉलेजेस, मल्टी कोर्स (प्रोग्राम) साठी करता येईल.
- विद्यार्थ्यांने शिक्षणक्रम निहाय नोंदणी अर्जाची प्रत काढून ती संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या विहित प्रक्रियेसाठी योग्य त्या दस्ताऐवजासह सादर करावयाची आहेत.
- विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिका सोबत ठेवाव्यात.
- विद्यार्थ्यांच्या शिक्षणक्रमांचे विषय अंतिम करण्याचे अधिकार महाविद्यालयांच्या प्राचार्यांना असतील याची नोंद घ्यावी.
- प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी ही नमूद केलेल्या कालावधीत होणे गरजेचे आहे.
- विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्जाची प्रत असल्याशिवाय महाविद्यालयात तो प्रवेश घेऊ शकणार नाही.
Click Here to Apply For Mumbai University Degree Admission 2023-24
Table of Contents