‘टेट’ परीक्षेदरम्यान गोंधळ, उमेदवारांना सर्व्हर डाउनचा मनस्ताप! | Maha TET Exam 2025 Update News

Maha TET Exam 2025 Updates

Maharashtra Teacher Eligibility Test 2025 Exam 

बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यावरून शिक्षण विभागाची नाचक्की होत असतानाच बुधवारी महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षेदरम्यान परीक्षार्थीना सर्व्हर डाउनचा मनस्ताप सहन करावा लागला. सर्व्हर डाउनमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रश्नपत्रिका सोडविण्यात पुरेसा वेळही मिळाला नाही. यामुळे हिंगणा एमआयडीसी येथील ‘आयओएन डिजिटल झोन आयडीझेड-२’ येथील परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन बुधवारी हिंगणा येथील ‘आयओएन डिजिटल झोन आयडीड़ोड २’ मध्ये करण्यात आले होते. या परीक्षेसाठी विदर्भातील विविध जिल्ह्यातील परीक्षार्थी आले होते. परंतु, अखेरच्या टप्प्यात सर्व्हर डाउन झाल्यामुळे संगणक बंद पडले आणि विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न सोडविता आली नाही. यामुळे संतप्त उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार देऊन ही परीक्षा रद्द करण्याची आयबीपीएसकडे करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी उमेदवार संबंधित केंद्रावर सकाळी ७ पासून हजर झाले होते. सकाळी ८ वाजता उमेदवारांना केंद्रात प्रवेश देण्यात आला. ९ ते ११ या वेळात परीक्षा सुरू असताना अखेरच्या १० मिनिटात या केंद्राचे सर्व्हर डाउन होऊन संगणक बंद पडले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 


‘महाज्योती’ तर्फे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षेसाठी पूर्वप्रशिक्षण दिले जाणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे काही उमेदावारांना योजनेसाठी अर्ज करता आला नाही. त्यामुळे योजनेसाठी सुरू असलेल्या अर्जप्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय ‘महाज्योती’ने घेतला आहे. त्यानुसार, आता विद्यार्थ्यांना ३० एप्रिलपर्यंत अर्ज करता येईल. महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे (महाज्योती) तर्फे इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २०२५-२६ या आर्थिक वर्षात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा पूर्वतयारीसाठी ऑनालइन प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी रविवारी (दि.२०) अर्जमुदत संपली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे अर्ज करता न आलेल्या काही उमेदवारांकडून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, उच्च प्राथमिक (इयत्ता बारावी) ची गुणपत्रिका, पदवीचे प्रमाणपत्र, टेट किंवा सीटेट उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, दिव्यांग प्रमाणपत्र (दिव्यांग असल्यास), अनाथ असल्यास दाखला.

योजनेच्या लाभासाठी पात्रता

  • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत विद्यार्थ्यांचे वय ४० हून जास्त नसावे
  • निवड झालेल्या विद्यर्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होईल.

 

येथे करा अर्ज :

  • www.mahajyoti.org.in
  • अधिक माहितीसाठी :
  • ई-मेल: mahajyotihelp [email protected]
  • संपर्क क्रमांक : ०७१२ २८७०१२०, ०७१२-२८७०१२१

 


महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर २०२४ चे आयोजन दिनांक १०/११/२०२४ रोजी करण्यात आले आहे. सदर दिवशी होणाऱ्या पेपरचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे.

 

MahaTET Exam Dates 2024

Maha Tet Exam 2024 Apply : Maha TET Exam 2024 PDF regarding Maharashtra Teacher Eligibility Test 2024 MahaTET 2024 has been released. The Maharashtra State Examination Council has announced this circular on 9 September 2024. In this circular, the schedule of Teacher Eligibility Test i.e. TET Exam has been given. According to this schedule Maharashtra Teacher Eligibility Exam will be conducted on 10 November 2024. The Maharashtra State Examination Council has informed that since there are two papers, one in the morning session and one in the afternoon session have been planned. Know more about Maha TET Exam 2024, Maha Tet Exam 2024 Apply at below.

Maha TET Corrigendum

Maha TET Corrigendum

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 MahaTET 2024 संदर्भात PDF परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. आता यासाठी ऑनलाईन अर्जाची लिंक सुद्धा उपलब्ध झाली आहे. खाली आम्ही नवीन अर्जाची अलिंक आणि लॉगिन लिंक दिलेली आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी हे परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET परीक्षेचे वेळापत्रक देण्यात आलेले आहे. या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे. दोन पेपर असल्याने सकाळच्या सत्रात एक आणि दुपारच्या सत्रात एक असे परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनी दिली आहे.

 

१ ) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः बैठक-२०२१/प्र.क्र./१५३/टीएनटी-१ दि.३०जून २०२२ अन्वये राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व त्यांचे कुटुंबिय यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये १५ टक्के गुणांची सवलत देण्यात आले नुसार ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये नवीन टॅब उपलब्ध करुन देण्यात आला आहे. २) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन परिपत्रक क्र. दिव्यांग-२०२१/प्र.क्र.५४/दि.क.२ दिनांकः-१३ सप्टेंबर २०२२ अन्वये Mental behavior / Mental illness (मानसिक वर्तन/ मानसिक आजार) / Multipal disability (बहुविकलांग) हा टॅब ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये उपलब्ध करुन दिला आहे.

३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. आरटीई २०१३/प्र.क्र.९१/प्राशि-१ दिनांक २३ ऑगस्ट २०१३ अन्वये राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करील ती धारण करणाऱ्या किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षेला बसण्याची मुभा राहील. या मुद्या नुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ या परीक्षेसाठी सदर उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आवेदनपत्रामध्ये नवीन विकल्प दिला आहे.

महाराष्ट्र राज्यात इ. 1ली ते 5वी व इ.6 वी ते इ.8वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्ती होण्यासाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ या बातमीत देण्यात आला आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 9 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

Maha TET Schedule
Maha TET Exam 2024 Important Dates

 

ऑनलाईन अर्ज करा 

Maha TET Helpline Number

MahaTET Helpline number is given below. Candidates can contact the given number for technical helps. For more updates keep visiting us.

Helpline No. : 9028472681 /9028472682 /9028472683

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Asmita Sorgivkar says

    वयोमर्यादा काय असणार TET साठी

  2. Savita kurrewar says

    Mhatet form kadhi nignar 2024?

  3. Nikita Ghanekar says

    Maha TET exam 2024 from कधी निघणार आहेत? Maha TET २०१३ चा result पाहायचा असेल तर तो कुठून download करावा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड