खुशखबर! नगर जिल्हा बँक भरतीला सहकारची मंजुरी, लवकरच ७०० कर्मचार्यांची भरती! – Ahmednagar district bank recruitment @ adccbanknagar.org
Ahmednagar district bank Bharti 2023
Ahmednagar district bank recruitment 2023 – As per the latest updates received from Ahmednagar district bank, The bharti process of Ahmednagar district bank will begin soon under the Ahmednagar district bank bharti 2023. This recruitment process will be carried for around 700 vacancies. As you can see, this will be golden opportunity for candidates who are looking for Bank Jobs. More details, PDF advertisement will be available soon on adccbanknagar.org which is official website of bank, also we given more updates on MahaBharti, so keep visiting us.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत सत्तांतर झाल्यानंतर लगेचच राज्य सरकारच्या सहकार विभागाने नोकरभरती करण्यास मंजुरी दिली असून, सरकारने दिलेल्या दोन संस्थांमार्फतच ही भरती प्रक्रिया करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, या संस्था सरकारच्या नोकरभरतीमध्ये व्यस्त असल्याने जिल्हा बॅंकेच्या नोकरभरतीला किती कालावधी लागणार याबाबत प्रश्नचिन्हच उभे राहिले आहे. सुमारे 700 पदे भरण्यास ही परवानगी देण्यात आली आहे.
लिपिकांच्या 700 जागा भरण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र, या जागा भरण्यासाठी जिल्हा बॅंकेला नोकरभरती प्रक्रिया राबविणाऱ्या सरकार नियुक्त संस्थेकडून जिल्हा बॅंकेच्या नोकरभरतीच्या प्रक्रियेला सहमती दर्शविली नाही. त्यामुळे कर्मचारी भरतीला परवानगी मिळाली, मात्र भरतीप्रक्रिया केव्हा सुरू होणार हा प्रश्न अधांतरी आहे. जिल्हा सहकारी बॅंकेच्या शाखांचे जिल्ह्यात व्यापक जाळे आहे. 288 शाखा व 11 विस्तार केंद्र अशा एकूण 299 शाखा आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर जाळे असलेली ही एकमेव बॅंक आहे. मात्र, बॅंकेला कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर ताणही आलेला आहे. त्यावर पर्याय म्हणून सुमारे अडीचशे कंत्राटी लिपिकांची भरती बॅंकेने केली आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गेल्या फेब्रुवारीदरम्यान बॅंकेने नोकरभरतीचा प्रस्ताव सहकार विभागाकडे सादर केला होता. त्यास आता सहकार आयुक्तांनी परवानगी दिली आहे. नोकरभरतीसाठी शासनमान्य यादीवरील संस्थेमार्फतच प्रक्रिया राबवण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत. मात्र, ही यादी अद्याप तयार नाही. त्यामुळे “टीसीएस’ व “आयबीपीएस’ या दोन कंपन्यांमार्फत भरतीप्रक्रिया राबवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, या दोन कंपन्या राज्य सरकारच्या विविध विभागांतील भरती प्रक्रियेत सध्या व्यस्त आहेत.
“आयबीपीएस’ कंपनीमार्फत सध्या जिल्हा परिषदेची भरतीप्रक्रिया सुरू आहे. या भरतीमधील परीक्षा गेल्या एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून सुरूच आहेत. या दोन्ही कंपन्यांनी जिल्हा बॅंकेला सध्या आम्ही व्यस्त आहोत, असे कळवले असल्याचे समजले. त्यामुळे नोकरभरतीला परवानगी मिळाली, मात्र भरतीप्रक्रिया राबवण्यासाठी संस्था मिळेना अशी बॅंकेची सध्याची परिस्थिती असल्याचे समजले. बॅंकेची यापूर्वीची नोकरभरती वादग्रस्त ठरली होती. हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. बॅंकेच्या संचालकांवरही आक्षेप घेतले गेले होते. त्यामुळे नव्याने होणाऱ्या भरतीप्रक्रियेकडे सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष राहणार आहे. यापूर्वीच्या नोकरभरतीमध्ये थेट संचालकांवर आरोप झाले होते. याबाबत सहकार खात्याने चौकशी केल्यानंतर पदे भरण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी अद्यापही काही पदे अद्यापही भरली गेली नाही. तो वाद अद्यापि वादग्रस्त आहे.
अहमदनगर जिल्हा बँकेवर दोनदा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला चेअरमनपदाची संधी मिळाली. जिल्हा बँकेत राजकारण विरहित कामकाज होईल, लवकरच रिक्त जागांवरही भरती होईल, असे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माजी मंत्री भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी सांगितले. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार कर्डिले यांनी मंगळवारी स्वीकारला. कर्डिले म्हणाले, या आधुनिक तंत्राच्या युगामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये नॅशनलाईज बँकेचे आव्हान उभे आहेत. ई-बँकिंग सेवा ठेवीदार, कर्जदार व खातेदारांना देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे.
बँकेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी लवकरच सातशे कर्मचार्यांची भरती होणार आहे. त्यानंतर उर्वरित पाचशे कर्मचार्यांचीही भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातील उमेदवारांना संधी देण्याचे काम केले जाईल. राहुरी सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल.संचालक मंडळाने माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला चेअरमनपदाची संधी दिली. या माध्यमातून शेतकरी, कारखानदार, व्यवसायिक व बचत गट यांना मदत केली जाईल. आज सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पुण्यतिथीनिमित्त पदभार स्वीकारला आहे. याच बरोबर बँकेचे संचालक, माजी संचालक, जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक यांचा सत्कार करण्यात आला आहे. बँकेची राजकारण विरहित सुरू असलेली परंपरा सुरू राहील.