इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी जाहीर! तब्बल 92 हजार नव्या नोकऱ्या उपलब्ध! | 92K Jobs in Electronics Sector!

92K Jobs in Electronics Sector!

सध्या भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक घटक प्रोत्साहन योजनेला (Electronic Component Incentive Scheme) अंतिम रूप दिले असून, यामुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. यासाठी खास सरकारने 23 हजार कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले असून, यामुळे येत्या 6 वर्षांत 92 हजार नव्या नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सहाजिकच या क्षेत्रात पुढील काही दिवसात हजारो नवीन साधी उपलब्ध होणार आहे. चला तर बघू या संदर्भातपूर्ण माहिती!  

92K Jobs in Electronics Sector!

 

इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचा विस्तार आणि रोजगार संधी
इलेक्ट्रॉनिक क्षेत्राच्या वाढीसाठी आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सरकारने हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. PLI योजनेनंतर ही दुसरी मोठी योजना असून, डिस्प्ले मॉड्यूल, कॅमेरा मॉड्यूल, प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंब्ली, लिथियम सेल एन्क्लोजर, रेसिस्टर, कॅपेसिटर आणि फेराइट्स यांसारख्या इलेक्ट्रॉनिक घटकांच्या निर्मितीसाठी गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे भारतातील उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल आणि हजारो लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सरकारचा मोठा आर्थिक प्लॅन
ही योजना यशस्वी करण्यासाठी सरकार दरवर्षी ₹2300 ते ₹4200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या योजनेंतर्गत सहभागी होणाऱ्या कंपन्यांना निर्धारित वेळेत उत्पादन आणि रोजगार उद्दिष्टे पूर्ण करणे बंधनकारक असेल. यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढून आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

PLI योजनेनंतर रोजगारासाठी आणखी मोठा प्रयत्न
PLI योजनेच्या यशानंतर ही योजना आणखी एक मोठे पाऊल ठरणार आहे. सध्या भारतात Apple आणि Samsung यांसारख्या मोठ्या टेक कंपन्या कार्यरत आहेत, मात्र देशांतर्गत मूल्यवर्धन केवळ 15-20% इतके आहे. ही टक्केवारी 30-40% पर्यंत वाढवण्याचा सरकारचा मानस आहे, जेणेकरून उत्पादनाची मोठी क्षमता भारतात विकसित होईल आणि नव्या नोकऱ्यांच्या संधी निर्माण होतील.

तीन प्रकारचे प्रोत्साहन – अधिक उत्पादन, अधिक फायदा
या योजनेअंतर्गत कंपन्यांना तीन प्रकारे प्रोत्साहन देण्यात येणार आहे:

  • ऑपरेशनल खर्चासाठी मदत – उत्पादन वाढवण्यासाठी थेट सहकार्य.
  • भांडवली खर्चावर आधारलेले प्रोत्साहन – कंपन्यांना आवश्यक भांडवल उपलब्ध करून देणे.
  • नेट इन्क्रीमेंटल सेलच्या आधारे मदत – उत्पादन वाढीच्या आधारावर अतिरिक्त लाभ.

देशात नोकऱ्यांची भरभराट – ही संधी दवडू नका!
ही योजना केवळ रोजगारनिर्मितीपुरती मर्यादित नसून, भारतातील इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षमतेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा सरकारचा दृष्टीकोन आहे. यामुळे स्थानिक कंपन्यांना मोठा फायदा होणार असून, सहाय्यक उद्योग आणि लघु उद्योजकांसाठीही नवे मार्ग खुलणार आहेत.

तंत्रज्ञानाच्या युगात नोकऱ्यांसाठी नवी संधी – तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार राहा!


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड