सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ऐक आनंदाची बातमी आहे. लवकरच येणाऱ्या 8वी वेतन आयोग: केंद्र सरकारचे कर्मचारी सध्या 8व्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत. हा आयोग लागू झाल्यास त्यांच्या वेतनात दरमहा सुमारे 19,000 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. चला तर माहिती करून घेऊया या बद्दल पूर्ण माहिती!!

गोल्डमन सॅक्सच्या माहितीनुसार, याचा लाभ सुमारे 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना मिळू शकतो. वेतन आयोग सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या वेतन, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी शिफारसी करतो, आणि हे सहसा दर 10 वर्षांनी केले जाते. महागाई, राहणीमानाचा खर्च आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन नवीन वेतनश्रेणी निश्चित केली जाते. या शिफारसी 2026 किंवा 2027 पर्यंत लागू होऊ शकतात.
वेतन आयोग ही भारत सरकारने स्थापन केलेली संस्था आहे, जी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेचा आढावा घेते आणि आवश्यक सुधारणा सुचवते. हे आयोग वेळोवेळी स्थापन केले जातात आणि देशाच्या आर्थिक स्थितीनुसार वेतनात सुधारणा करण्यासाठी शिफारसी करतात.
पगारात किती वाढ अपेक्षित?
सध्या, मध्यम स्तरावरील सरकारी कर्मचाऱ्याला दरमहा सरासरी 1 लाख रुपये (करापूर्वी) वेतन मिळते. अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार, वेतनात लक्षणीय वाढ होऊ शकते.
आठवा वेतन आयोग स्थापन करण्याबाबत सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, एप्रिल 2025 मध्ये त्याची स्थापना होऊ शकते, आणि शिफारसींची अंमलबजावणी 2026 किंवा 2027 मध्ये केली जाऊ शकते, अशी शक्यता आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















