सार्वजनिकरित्या विक्रीस असलेल्या अन्नपदार्थांची तपासणी करण्याची जबाबदारी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) वर आहे. मात्र, राज्यातील जनतेच्या आरोग्याची रक्षा करणाऱ्या FDA ला मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रातील FDA मध्ये एकूण १,२७२ मंजूर पदांपैकी फक्त ७३० पदे भरलेली आहेत, तर उर्वरित ५४१ पदे रिक्त आहेत.

यामुळे प्रयोगशाळांची कमतरता निर्माण होऊन अन्न तपासणी अहवाल मिळण्यास उशीर होत आहे. तसेच, मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांमुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांच्या अभावाची समस्या गंभीर होत आहे. औषध प्रमाणीकरणाची जबाबदारीही FDA कडे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत, अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवळ हे २८ फेब्रुवारी रोजी नागपुरात त्यांच्या विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.
२० शहरांमध्ये FDA चे भाड्याच्या इमारतीत कार्यालये
राज्यात FDA ला अद्याप २० शहरांमध्ये भाड्याच्या इमारतींमध्ये कार्यालये चालवावी लागत आहेत. यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, अमरावती, भंडारा, वर्धा, जालना, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, नांदेड या शहरांचा समावेश आहे. नागपूर येथील अन्न व औषध प्रयोगशाळाही भाड्याच्या जागेत चालवली जात आहे.
गुटखा, तंबाखू उत्पादनांवरील बंदी कायम – मंत्री झिरवळ
अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, गुटखा, पानमसाला आणि तंबाखू उत्पादनांवरील बंदी उठवण्याचा कोणताही विचार नाही. कारण ही उत्पादने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराला कारणीभूत ठरतात. सरकारला महसूल मिळवण्यासाठी या बंदीला हटवायचे नाही.
अमरावती दौऱ्यात बोलताना त्यांनी मान्य केले की, प्रतिबंध असूनही राज्यात गुटख्याची विक्री सुरू आहे आणि त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस आणि FDA यांच्या संयुक्त कारवाईसाठी लवकरच नवीन धोरण तयार करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















