गोवा राज्य मानव संसाधन विकास महामंडळात (GHRDC) सध्या ४ हजार कर्मचारी कार्यरत असून, २०२७ पर्यंत ही संख्या ८ हजारांपर्यंत नेण्याचा संकल्प आहे. या अंतर्गत अजून ४ हजार पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे. सध्या, राज्यातील एकही अल्पशिक्षित युवक किंवा युवती बेरोजगार राहू नये, यासाठी सरकार आणि महामंडळ प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

साखळी येथील रवींद्र भवनमध्ये आयोजित महामंडळाच्या वार्षिक दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी महामंडळाचे अध्यक्ष आमदार रूडॉल्फ फर्नांडिस, उपाध्यक्ष दीपक नाईक, डिचोली नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, व्यवस्थापकीय संचालक गुरुदास देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, हे महामंडळ अवघ्या ४०० कामगारांपासून सुरू झाले होते. मात्र, आज यामध्ये हजारो युवकांना सुरक्षित रोजगार मिळत आहे. दोन वर्षांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकार नोकरीत कायम करणार असून, त्यांना विविध सुविधा देण्यात येणार आहेत.
महत्त्वपूर्ण घोषणा:
१. महिलांना आता सहा महिन्यांची प्रसूती रजा दिली जाणार.
2. तीन वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिस, वन किंवा अग्निशामक दलात १०% आरक्षण.
3. पुढील महिन्यापासून सेवाकर सरकार भरणार, त्यामुळे वेतनात ३ ते ५ हजारांची वाढ.
4. आधी वजा करण्यात आलेले पैसे कर्मचाऱ्यांना परत मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न.
5. आखातातील नोकरीसाठी दोन वर्षांची विशेष रजा, त्यानंतर पुन्हा नोकरीत रूजू होण्याची संधी.
6. सेवेत कायम झाल्यानंतर दुप्पट पगारवाढ.
7. कामगारांसाठी कायमस्वरूपी मैदान उपलब्ध करून देणार.
या कार्यक्रमात विशेष कामगिरी करणाऱ्या ५० कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महामंडळातील कर्मचाऱ्यांनी समई नृत्य, स्वागत गीत आणि लोकनृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















