https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

खुशखबर! राज्य कर्मचाऱ्यांसाठी ३% महागाई भत्ता वाढ! – 3% DA Hike for State Employees!

3% DA Hike for State Employees!

राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना ३ टक्के महागाई भत्त्यात वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के करण्यात आला असून, १ जुलै २०२४ पासून हा दर लागू होईल.

3% DA Hike for State Employees!

७ महिन्यांची थकबाकी फेब्रुवारीच्या वेतनात
राज्य वित्त विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, जुलै २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीतील वाढीव भत्ता फेब्रुवारी २०२५च्या वेतनात रोखीने मिळणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

१७ लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा
केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी याचा लाभ घेऊ शकतील.
उदाहरणार्थ, ४०,००० रुपये मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्याला ३% वाढीनंतर दरमहा १,२०० रुपये अधिक मिळतील.

कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
मार्चमध्ये होळीपूर्वीच वाढीव महागाई भत्त्याची घोषणा झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यापूर्वी महागाई भत्ता जाहीर न केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती, मात्र आता हा निर्णय झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

मुख्य ठळक मुद्दे:

  • महागाई भत्ता ५०% वरून ५३%
  • फेब्रुवारी २०२५च्या वेतनात ७ महिन्यांची थकबाकी
  • राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा
  • १ जुलै २०२४ पासून अंमलबजावणी

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड