MCVC, द्विलक्षी अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय
25% cut down for MCVC, two purpose courses
25% cut down for MCVC, two purpose courses : राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या धर्तीवर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे. येत्या शैक्षणिक २०२०-२०२१ या वर्षाकरिता ही नियमावली लागू होणार आहे. २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यासाठी सहा विभागस्तरावर समिती नेमण्यात आली आहे.
कोरोना संसर्गामुळे साधारणत: जूनपासून नव्या शैक्षणिक सत्राला आरंभ होणे आवश्यक होते. मात्र, लॉकडाऊन आॅगस्टपर्यंत कायम आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये कधी सुरू होतील, हे निश्चित नाही. परंतु, शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याबाबत संचालक दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी ११ आॅगस्ट रोजी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयांच्या सहसंचालकांना कळविले आहे. २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यासाठी विभागस्तरावर स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
विभागनिहाय असे होतील २५ टक्के अभ्यासक्रम कमी
- मुंबई – उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम वाणिज्य गटातील सर्व अभ्यासक्रम
- पुणे – उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम अर्धवैद्यकीय गट व पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम व्ही १, व्ही २, व्ही ३ व व्ही ४
- नाशिक – उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम तांत्रिक गटातील सर्व अभ्यासक्रम
सोर्स : लोकमत