बंगाली माध्यम शाळेतील रिक्त पदांचा प्रश्न मार्गी – Maharashtra Bengali School Bharti 2023

Bengali School Bharti 2023

Maharashtra Bengali School Bharti 2023 – Bengali Medium Schools of Bengali medium are functioning in the district and the posts of Bengali medium teachers are sanctioned in them. But since the last many years, the students were suffering educational losses due to non-recruitment of teachers. Regarding this serious matter, MLA Dr. Devrao Holi as well as Chief Executive Officer of Zilla Parishad Kumar Ashirwad jointly followed up consistently at the government level. Finally, the government has taken notice of this and directed to fill the vacancies in Bengali medium schools. Due to this directive of the government, the issue of vacancies in Bangami medium school, which has been pending for the last 14 years, has been resolved.

 

Bengali Medium जिल्ह्यात बंगाली माध्यमांच्या शाळा कार्यान्वीत असून यामध्ये बंगाली माध्यम शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र मागील ब-याच वर्षापासून शिक्षकांची पदभरती न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. ही गंभीर बाबीसंदर्भात आमदार डॉ. देवराव होळी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शासन स्तरावर संयुक्तरित्या सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने याची दखल घेत बंगाली माध्यम शाळेतील रिक्त पदे भरण्याचे निर्देश दिले आहे. शासनाच्या या निर्देशामुळे मागील 14 वर्षापासून प्रलंबित असलेल्या बंगामी माध्यम शाळेतील रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

 

जिल्ह्यात एकूण 46 बंगाली माध्यमांच्या Bengali Medium शाळा असून यात तब्बल 116 बंगाली माध्यम शिक्षकांचे पदे मंजूर आहेत. मात्र मागील अनेक वर्षापासून पदभरती न झाल्याने बंगाली माध्यम शिक्षकांचे पदे रिक्त आहत. या शाळांवर इतर माध्यमांचे शिक्षक अध्यापन करु शकणार नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता बंगाली समाजाचे प्रतिनिधी, उमेदवार यांनी आ. देवराव होळी व प्रशासनास सदर शाळांतील रिक्त पदे भरण्यासबंधाने कार्यवाही करण्याची मागणी मागील 14 वर्षापासून लावून धरली होती. याअंतर्गत आ. होळी यांनी वेळोवेळी शासन स्तरावर मागणी करुन कार्यवाही संबंधाने शासनास निवेदन सादर केले. तसेच जिप मुख्य कार्यकारी अधिकारी आशीर्वाद यांचेशी वस्तुस्थितीबाबत चर्चा करुन शासनाकडे पाठपुरावा करण्यास सुचना केली. यास सीईओ यांनी सकारात्मकता दर्शवित वळोवेळी शासन स्तरावर वेळोवेळी पत्र व्यवहार केला होता. अखेर आ. होळी व सीईओ यांच्या संयुक्त सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनाने बंगाली माध्यम शाळांतील रिक्त पदे भरण्याचे निर्देश दिले आहे.

 

रिक्त पद भरतीची प्रक्रिया सुरुBengali Medium शासनाच्या निर्देशान्वये जिप सीईओ कुमार आशीर्वाद यांनी सर्व प्रशासकीय, तांत्रीक बाबी तपासून सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिप उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर शेलार व शिक्षणाधिकारी (प्राथ.) विवेक नाकाडे यांनी तातडीने प्रकरणात कार्यवाही करुन 5 मे 2023 ला जाहिरात प्रकाशित करीत अर्ज मागाविले. याअंतर्गत पद भरतीची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती जिप प्रशासनाने दिली आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड