खुशखबर! – गृहरक्षक दलात होमगार्ड पदभरती ऑगस्टमध्ये शक्य! – Nashik Home guard Bharti
Nashik Home guard Bharti
मित्रांनो, एक महत्वाचा अपडेट, होमगार्ड भरतीची अनेक उमेदवार वाट बघत आहेत. नाशिक विभागात ७०० पदे रिक्त आहेत, तर पूर्ण महाराष्ट्रात जवळपास ९५०० पदांची हि भरती अपेक्षित आहे. आगामी सण व उत्सव आणि निवडणुकांचा हंगाम पाहता राज्य पोलिस दलाच्या मदतीला गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) जवान धावून येतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये गृहरक्षक दलात भरती झालेली नाही. गृह विभागामार्फत येत्या ऑगस्ट महिन्यापासून गृहरक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. सुमारे नऊ हजार ७०० जागांसाठी नाशिक विभागात ही भरती होण्याची शक्यता आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
गृहरक्षकांच्या भरतीसाठी १५ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. उमेदवारांना रहिवाशी ठिकाण असलेल्या पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातच अर्ज करता येणार आहे. अर्ज नोंदणी करण्यापूर्वी जाहीर होणाऱ्या अंतिम अधिसूचनेत रिक्त जागांची माहिती दिली जाणार आहे. तसेच पूर्ण महाराष्ट्रात ९५०० पदांची हि भरती अपेक्षित आहे, याबद्दलची पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.
गृहरक्षकांचा यांना नियमित बंदोबस्त नसतो. परंतु सणउत्सव, निवडणूक अशा वेळी त्यांची नेमणूक पोलिसांसमवेत केली जाते. बंदोबस्त काळामध्ये प्रतिदिन ७०० रुपये आणि १०० रुपये उपहार भत्ता दिला जातो. तसेच, प्रशिक्षण काळात ३५ रुपये खिसाभत्ता आणि १०० रुपये भोजनभत्ता मिळतो. साप्ताहिक कवायतीसाठी ९० रुपये भत्ता दिला जातो तर, गृहरक्षक दलामध्ये तीन वर्षे सेवा पूर्ण केल्यास पोलिस, वन विभाग, अग्निशमन दलात पाच टक्के आरक्षणही मंजूर आहे.
पात्रता अन् निकष
- शैक्षणिक : किमान दहावी उत्तीर्ण
- वयोमर्यादा : २० ते ५० वर्षे
- पुरुषांसाठी उंची : १६२ सें.मी.
- महिलांसाठी उंची : १५० सें.मी.
Comments are closed.