जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सोलापूर येथे “वैद्यकीय अधिकारी” रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित!! | ZP Solapur Bharti 2024
ZP Solapur Bharti 2024 - zpsolapur.gov.in
Zilla Parishad Solapur Bharti 2024
ZP Solapur Bharti 2024: The official advertisement for District Surgeon’s Office, Solapur from the interested and eligible candidates to fill various vacant posts of “Ophthalmologist, Gynaecologist, Paediatrician, Physiologist, Osteopathologist, and MBBS”. There are various vacancies available to fill with the post. The job location for this recruitment is Solapur. Interested and eligible candidates may attend the walk-in-interview on 15th of March 2024. For more details about ZP Solapur Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सोलापूर अंतर्गत “नेत्ररोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिओलॉजिस्ट, ऑस्टियोपॅथॉलॉजिस्ट आणि एमबीबीएस” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 मार्च 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – नेत्ररोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिओलॉजिस्ट, ऑस्टियोपॅथॉलॉजिस्ट आणि एमबीबीएस
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सोलापूर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय सोलापूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2024
- अधिकृत वेबसाईट – https://solapur.gov.in/
Selection Process For ZP Solapur Application 2024
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख 15 मार्च 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For solapur.gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/ceky6 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://solapur.gov.in/ |
ZP Solapur Bharti 2024
पंचायत समिती ही ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या मध्ये दुवा म्हणून काम करते.तालुक्यातील प्रशासन विभागात येणाऱ्या शिक्षण विभाग,आरोग्य विभाग,पशुवैद्यकीय विभाग,बांधकाम विभाग व गावचा गाडा हाकणारी ग्रामपंचाय विभागाचे प्रमुख कारभार तालुका पंचायत समित्यांमधून चालते.पण मंगळवेढा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिक्षण, आरोग्य,पशुवैद्यकीय,बांधकाम आणि ग्रामपंचायत प्रशासनातील रिक्त पदांमुळे तालुक्यातील प्रशासकीय विभाग दुबळा झाल्याचे वास्तव आहे.विविध विभागावातील 213 कर्मचाऱ्यांची भरती अपूर्ण आहे.
तसेच या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
शिवाजी पाटील,गटविकास अधीकारी मंगळवेढा- मंगळवेढा पंचायत समिती अखत्यारीतील शिक्षण विभाग,आरोग्य विभाग,पशुवैद्यकीय विभाग,ग्रामपंचायत विभाग व बांधकाम विभागावातील 213 पदे रिक्त आहेत.शिक्षण व आरोग्य विभागातील जादा पदे रिक्त आहेत.याबाबत वरिष्ठ विभागाला वेळो वेळी माहिती कळीवली आहे.शासकीय नियमानुसार जागा भरल्या जातील.
दरम्यान चालू वर्ष निवडणुकांचे वर्ष असणार आहे.लोकसभा त्यापाठोपाठ विधानसभा,नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे वर्ष जाणार आहे.त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कार्यरत त्या त्या विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण जाणवणार आहे. शिक्षण,आरोग्य व ग्रामपंचायत विभागात अपुरे कर्मचारी-तालुक्यातील शिक्षण विभागातील 139 जागा अपुऱ्या आहेत.त्यापाठोपाठ आरोग्य विभागातील 39 आणि ग्रामपंचायती मधील 8 जागा रिक्त आहेत.शिवाय तालुका पंचायत समिती मधील महत्वाच्या 23 जागा रिक्त आहेत.त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सेवा देताना हेळसांड होताना दिसत आहे. रिक्त जागांची वाळवी – शहर व 81 गावच्या प्रशासन व्यवस्थेचा बोजा वाहणाऱ्या तालुक्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागाला रिक्त पदांची वाळवी लागली आहे.त्यातच अतिरिक्त कामाचा ताण,वैयक्तिक कामे,आरोग्य विषयक तक्रारी यांचे कारण पुढे करून कार्यरत कर्मचाऱ्यांच्या रजेमुळेही प्रशासकीय विभागातील कार्यालये व कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या शोभेच्या बाहुल्या बनून उभ्या असतात.याचा नाहक त्रास नागरिकांना सेवा प्रदान करताना होत आहे.त्यामुळे तालुक्यातील सर्वच प्रशासकीय विभागातील रिक्त पदे भरली जावीत अशी मागणी नागरीक करत आहेत.
जिल्हा परिषद सोलापुर निकाल जाहीर, चेक करा – ZP Solapur Result 2023
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील जवळपास ५५० लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना ‘यशदा’मधील प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. १ ते १२ जानेवारी या काळात प्रशिक्षण संपल्यानंतर काही दिवसांत जानेवारीअखेर सर्वांचीच लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी संबंधित विभागप्रमुख व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून (बीडीओ) प्रश्न मागवून त्यातून एक प्रश्नपत्रिका तयार केली जाणार आहे.
लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना त्यांची क्षमता विकसित करण्याची संधी मिळावी, प्रशासकीय कामकाज करताना त्यांना कोणत्याही अडचणी येवू नयेत म्हणून सर्वांनाच १ ते १२ जानेवारी दरम्यान प्रशिक्षण दिले जाणार आहे. यशदा, पुणे येथील तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून सर्व लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू आहे. एकदा प्रशिक्षण दिल्यानंतर पुन्हा गरज भासल्यास आणखी एकदा प्रशिक्षण देण्याचीही प्रशासनाची तयारी आहे. प्रशिक्षणानंतर काही दिवस कर्मचाऱ्यांना परीक्षेच्या अभ्यासासाठी काही दिवसांचा वेळ दिला जाणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेतील प्रत्येक विभागप्रुखांकडून व पंचायत समित्यांमधील गटविकास अधिकाऱ्यांकडून परीक्षेसंदर्भातील प्रश्न मागवून घेतले जाणार आहेत. त्याचा प्रश्नसंच तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे व सामान्य प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांची प्रश्नपत्रिका तयार केली जाईल. त्यानुसार परीक्षा पार पडेल असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
लेटरकमर कर्मचाऱ्यांवर आता बिनपगारीची कारवाई
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना वेळेत ड्यूटीवर येणे आणि सुट्टीनंतर कार्यालयातून बाहेर पडणे बंधनकारक आहे. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत कोठे जेवण करायचे यासंदर्भात त्यांच्यावर कोणतेही बंधन नाही. परंतु, विलंबाने ड्यूटीवर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद ठेवण्यासाठी प्रत्येक विभागात स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात आली आहे. सलग तीनवेळा विलंबाने येणाऱ्या कर्मचाऱ्याची एक दिवसाची बिनपगारी रजा नोंद केली जाते. आता प्रशासकीय बाब म्हणून स्वत: सीईओ विलंबाने येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवत आहेत. त्यामुळे बहुतेक कर्मचारी वेळेत ड्यूटीवर येत असल्याचे चित्र आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक
नगर येथील घरकूल प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येतील, असे सांगितले जात आहे. पंतप्रधानांचा दौरा झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडेल. सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर याठिकाणी प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर काही दिवसांतच परीक्षा होईल, तत्पूर्वी सर्वांना वेळापत्रक दिले जाणार आहे. परीक्षेच्या निकालानंतर कोणता कर्मचारी कोणत्या विभागात नेमला जाणार हे निश्चित होईल, असेही सांगितले जात आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये आता ७०० शिक्षकांची भरती होणार आहे. मागासवर्गीय कक्षाकडून जिल्हा परिषद शाळांची बिंदुनामावली अंतिम झाल्यानंतर भरती प्रक्रियेला वेग आला आहे. आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा पार पडल्यानंतर ‘पवित्र’ पोर्टलवर रिक्त पदांची माहिती अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची संधी मिळणार असून अंतिम टप्प्यात मेरिट यादीनुसार ही भरती होईल. सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात दोन हजार ७९५ शाळा आहेत. या शाळांमध्ये साडेआठ हजारांपर्यंत शिक्षक आहेत, पण पटसंख्येच्या तुलनेत अद्याप शिक्षकांची संख्या कमीच आहे. जवळपास सात वर्षांपासून शिक्षक भरती झाली नसल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थी जास्त अन् शिक्षक कमी अशी स्थिती आहे. या परीक्षेसाठी असलेला अभ्यासक्रमही निश्चित केला आहे.
आता राज्य सरकारने ३२ हजार शिक्षक भरती जाहीर केली आणि सर्व जिल्हा परिषदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाने तपासून अंतिम केली. त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये ६२० पदे तर उर्दु माध्यमांच्या शाळांमध्ये ५८ आणि कन्नड माध्यमांच्या शाळांमध्येही जवळपास ३० पदांची भरती होणार आहे. पण, आंतरजिल्हा बदलीमुळे परजिल्ह्यातील काही शिक्षक सोलापूर जिल्ह्यात येणार आहेत. त्यामुळे हा आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पार पडल्यानंतर उर्वरित जागांवर नवीन शिक्षकांची भरती होईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, कोणत्या जिल्ह्यात किती व कोणत्या संवर्गाची पदे रिक्त आहेत ही माहिती आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र शिक्षकांना पोर्टलवर उपलब्ध झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा बदलीस पात्र शिक्षकांना अर्ज करण्यासाठी १२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Table of Contents
जिल्हा परिषद करणार ६४९ पदांची भरती
new update
ZP Solapur Bharti 2023 Application Forms & register online now. Recruitment 2023 Details
Arjun patil