आता लिपिकांच्या पदोन्नतीचा मार्ग झाला सोपा! | ZP Sangli Recruitment 2026

ZP Sangli Bharti 2025

जिल्हा परिषदेच्या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांमधील सहाय्यक प्रशासन अधिकारी आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी या दोन पदांचे एकत्रिकरण नाकारून नव्या पदाला सहाय्यक प्रशासन अधिकारी पदाची वेतनश्रेणी दिली जाणार आहे. पदोन्नतीचे टप्पे कमी केल्याने जिल्हा परिषद लिपिकांना पुढील पदाची वेतनश्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमवेत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेची मंत्रालयात बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय झाला. पदोन्नतीचे टप्पे कमी केल्याने कर्मचाऱ्यांना पुढील वेतनश्रेणी मिळेल. याकामी आमदार देशमुख यांनी मंत्री गोरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. लिपिकांच्या पदोन्नतीचे टप्पे कमी केल्याने सरकारी तिजोरीवर नगण्य भार पडणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर निर्णयाची फाईल वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचे निर्देश मंत्री गोरे यांनी दिले. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

बैठकीला ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उपसचिव सीमा जाधव, नितीन पवार आदी उपस्थित होते. संघटनेचे राज्य अध्यक्ष सागर बाबर, कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी, सरचिटणीस अरुण जोर्वेकर, उपाध्यक्ष संजय चव्हाण, जिल्हाध्यक्ष विशाल पाटील, प्रमोद निरगुडे, महेश गावंदरे, दिलीप गारळे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

 


 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषदेच्या ९ संवर्गातील सुमारे २८५ जणांची नियुक्ती विविध कारणास्तव थांवली आहे. संबंधित उमेदवारांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नियुक्तीचे पत्र देण्यासाठी झेडपीच्या प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र आचारसंहितेमध्ये ही प्रक्रिया थांबली. मात्र शनिवारी निकाल लागणार आहे. त्यामुळे आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसांत नियुक्ती देण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. आरोग्य सेवक, सेविका, अभियंता, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका अशा एकूण १७ संवर्गातील सुमारे ७५४ जगांसाठी भरती प्रक्रिया काही महिन्यांपासून राबविण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा परीक्षेचा निकाल लागला. त्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी सुरू झाली. विविध संवर्गातील सुमारे २८९ उमेदवारांना नियुक्तीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. नियुक्तीचे पत्र मिळाल्यानंतर बहुसंख्य उमेदवार कामावर हजर झाले. मात्र काही संवर्गातील उमेदवारांना नियुक्तीचे आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात धाकधूक वाढली आहे. ‘आम्हाला नियुक्तीचे पत्र कधी मिळणार’, ‘आमच्या नियुक्तीचे काय झाले’, अशी सातत्याने विचारणा करीत उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये धडका मारत होते. मात्र आचारसंहितेचे कारण ऐकून निराश होऊन निघून गेले. आज, शनिवारी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

त्यामुळे आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर पुढील १५ दिवसात तातडीने नुियक्ती देण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. काही संवर्गात कागदपत्रांची कमतरता होती, तर आरोग्य सेविका या पदाबाबत मार्गदर्शन घेणे आवश्यक होते. त्यामुळे नियुक्ती थांबली होती. प्रशासनाने शासनाकडे मागविलेले मार्गदर्शन मिळाले. मात्र आरोग्याच्या नियुक्तीबाबत अजूनही काही प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर नियुक्ती देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुढील पंधरा ते वीस दिवसांत नियुक्ती पत्र मिळण्याचे संकेत आहेत.

 

संवर्ग निहाय नियुक्ती न मिळालेल्या उमेदवारांची संख्या अशी : कनिष्ठ सहायक (लिपिक) ३, पशुधन पर्यवेक्षक ३, औषध निर्माण अधिकारी २, कनिष्ठ अभियंता बांधकाम २, स्थापत्य अभियांत्रिकी ३, आरोग्य सेवक (पुरुष) ४० टक्के ८, आरोग्य सेवक (पुरुष) ५० टक्के १५९, आरोग्य सेवक (महिला) ८९, ग्रामसेवक १६, एकूण २८५.

This is an Old Advertiesment. New Information will be Updated Soon.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड