जिल्हा परिषदेत तब्बल २ हजार १२० पदे रिक्त, नवीन पदभरती प्रक्रिया! | ZP Ratnagiri Bharti 2026

Zilla Parishad Ratnagiri Bharti 2026

ZP Ratnagiri Bharti 2026 –  मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेचा कारभार सध्या अतिरिक्त पदावरच सुरू आहे. रिक्त पदांच्या वाढत्या संख्येमुळे पूर्णपणे कामकाज विस्कळीत झाले आहे. जिल्हा परिषदेत तब्बल २ हजार २१० जागा रिक्त आहेत. वरिष्ठ पातळीवरील वर्ग १ आणि वर्ग २ च्या मंजूर २८५ पदांपैकी ९० जांगवर अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. वर्ग १ ची ४२, वर्ग रच्या मंजूर २८५ पैकी ९० जागांवर अद्याप कोणाचेही नियुक्ती झालेली नाही. यामध्ये वर्ग १ ची ४२ आणि वर्ग २ ची ४८ ची पदे रिक्त आहेत. परिणामी मुख्य विभागांना पूर्णवेळ अधिकारी मिळत नाही. मागील काही वर्षापासून केवळ प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर जिल्हा परिषदेचा गाडा रेटला जात आहे. या गंभीर परिस्थितीचा सर्वाधिक विपरीत परिणाम शिक्षण आणि आरोग्य या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांवर दिसून येत आहे. प्राथमिक व माध्यमिक अशा दोन्ही विभागांचे मुख्य शिक्षणाधिकारी पद रिक्त असल्याचे जिल्ह्यातील शैक्षणिक व्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे. तर उपशिक्षणाधिकारी व प्राथमिक अधीक्षकांच्या जागाही रिकाम्याच आहे. शाळांवर देखरेख करण्यासाठी आवश्यक असणारे मंडणगड, खेड, चिपळूण, लांजा, गुहागर, दापोली आणि राजापूर या ७ तालुक्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भरले गेलेले नाही. ३५० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागतही जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी सहायक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण वैद्यकीय सेवांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

वरिष्ठ पातळीवरील ही बिकट परिस्थिती असतानाच तळागाळातील सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क असणाऱ्या वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचाऱ्यांची स्थिती तर अधिकच गंभीर आहे. या दोन्ही वर्गात मिळून एकूण ८ हजार ९२० पदे मंजूर आहेत, परंतु त्यातील तब्बल २ हजार १२० पर्ने रिकत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत संपूर्ण जिल्हा परिषदेत दोन हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. मागील १५ वर्षांपासून ही पढ़ें भरलेली नाहीत. सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर व उर्वरित २२२ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे ही पदे भरणे गरजेची आहे. शासनाने या गंभीर परिस्थती दखल घेऊन सर्व रिक्त जागांवर पूर्णवेळ नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी जिल्हाभरातून होत आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाची संपूर्ण धुरा वाहणाऱ्या जिल्हा परिषदेला सध्या तीव्र प्रशासकीय पोकळीचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यातील विकासकामांचे नियोजन आणि अंमलबजावणी करणाऱ्या वरिष्ठ पातळीपासून ते अगदी तळागाळातील कर्मचाऱ्यांपर्यंत हजारो पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषदेचा गाडा अत्यंत संथगतीने सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, वरिष्ठ दर्जाच्या वर्ग १ आणि २ च्या मंजूर २८५ पदांपैकी ९० पदे रिक्त आहेत. ज्यामध्ये वर्ग १ च्या ४२ आणि वर्ग २ च्या ४८ जागांचा समावेश आहे. यामुळे अनेक महत्त्वाच्या विभागांचा कारभार गेल्या काही वर्षांपासून केवळ प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर चालला आहे.

वरिष्ठ पातळीवरील ही बिकट परिस्थिती असतानाच तळागाळातील सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क असणाऱ्या वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचाऱ्यांची स्थिती तर अधिकच गंभीर आहे. या दोन्ही वर्गात मिळून एकूण ८ हजार ९२० पदे मंजूर आहेत; परंतु त्यातील तब्बल २ हजार १२० पदे रिक्त आहेत. म्हणजेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये तब्बल २ हजार २१० पदे रिकामी आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्या, सेवानिवृत्ती आणि पदोन्नती वेळेवर न होणे, ही यामागची मुख्य कारणे असून काही पदे तर २०१०० २०१५ पासून म्हणजेच गेल्या १० ते १५ वर्षांपासून भरलीच गेलेली नाहीत. या गोंधळाचा सर्वांत मोठा फटका शिक्षण आणि आरोग्य विभागाला बसत आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर आणि उर्वरित २२२ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. धोरणात्मक निर्णय घेणारे आणि ते प्रत्यक्ष उतरवणारे दोन्ही घटकच गायब असल्याने जिल्ह्याचा विकास खिळखिळा झाला आहे. शासनाने या गंभीर परिस्थितीची तत्काळ दखल घेऊन सर्व रिक्त जागांवर पूर्णवेळ नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी जिल्ह्यातून जोर धरत आहे.

अशी आहेत रिक्तपदे:

  • प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी
  • उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक अधीक्षक
  • सात तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी
  • जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी
  • सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी
  • कृषी विकास अधिकाऱ्यांची संख्या कमी
  • बांधकाम, पाणीपुरवठ्यातील नऊ अभियंत्ये
  • नऊ तालुक्यांचे बालविकास प्रकल्प अधिकारी


Previous Posts:

Zilla Parishad Ratnagiri Bharti 2026

ZP Ratnagiri Bharti 2026: Zilla Parishad Ratnagiri is going to conduct new recruitment for the posts of “Data Entry Operator”. There are total of 02 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Ratnagiri. Interested and eligible candidate can send their application form to the given address before the last date. The last date for submission of the applications is the 30th of  September 2025. For more details about ZP Ratnagiri Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत “डाटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२५ आहे. 

  • पदाचे नावडाटा एंट्री ऑपरेटर
  • पदसंख्या02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज शुल्क – Rs. 200/-
  • वयोमर्यादा – 18 – 35 वर्षे
  • नोकरी ठिकाणरत्नागिरी
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), जिल्हा परिषद रत्नागिरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषद भवन, रत्नागिरी ४१५६१२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख३० सप्टेंबर २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://www.zpratnagiri.org/

ZP Ratnagiri Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
डाटा एंट्री ऑपरेटर02

Educational Qualification For ZP Ratnagiri Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डाटा एंट्री ऑपरेटर
  • किमान इ. 12 वी पास
  • मराठी टंकलेखन 30 शब्द प्र. मि.
  • इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्र.मि.
  • MSCIT किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण

Salary Details For Application 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
डाटा एंट्री ऑपरेटरदरमहा रु. 25,000/-

How To Apply For ZP Ratnagiri Notification 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही.
  • अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

This is an Old Advertiesment. New Information will be Updated Soon.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For zpratnagiri.org Bharti 2026

📑शुद्धिपत्रक https://shorturl.at/x6MlG
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/jmPH5
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.zpratnagiri.org/

 

 


जिल्हा परिषदेला 386 नवे कंत्राटी शिक्षक मिळाले आहेत. मंगळवारी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यामुळे सध्यातरी ग्रामीण भागातील शाळांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. राज्यातील दोन जिल्हा परिषदांनी कंत्राटी शिक्षक भरती थांबवल्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेतील भरतीवर स्थगितीची टांगती तलवार होती; मात्र शासनाकडून प्रक्रिया स्थगितीचे कोणतेही आदेश न आल्यामुळे मंगळवारी 386 शिक्षकांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. यापूर्वी 105 जणांना नियुक्ती दिली गेली होती. 1 ते 10 पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांवर हे शिक्षक भरले गेले आहेत. त्यामुळे 1100 पैकी 40 टक्के पदांवर शिक्षक कार्यरत आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची पदे रिक्त राहिल्यामुळे ग्रामीण भागामधून तक्रारीचे सूर उमटत होते. राजकीय पक्षांनीही आंदोलनाचा इशारा देत सत्ताधार्‍यांची अडचण केली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन महायुती सरकारने कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर म्हणजेच एप्रिल 2024 मध्ये सुरू झाली. काही कालावधीतच विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे पुन्हा कंत्राटी शिक्षक भरती थांबली. या गोंधळात नवीन शैक्षणिक वर्षात अनेक शाळांमध्ये शिक्षकच नाहीत, असे चित्र पाहायला मिळत होते. यावर पर्याय म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने काही शाळांवर कामगिरीने शिक्षक नियुक्त केले. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होऊ लागला. याबाबत ग्रामीण भागात तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. यावर पर्याय म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने रखडलेली कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरवात केली. ZP Ratnagiri Bharti 2025

या नियुक्तीला राज्यभरातून विरोध होत असल्यामुळे पुन्हा त्यात अडथळा निर्माण झाला होता; मात्र शिक्षकांची रिक्त पदे लक्षात घेऊन जि. प. प्रशासनाने तातडीने थांबलेली प्रक्रिया वेगाने सुरू केली. पहिल्या टप्प्यात 105 जणांना नियुक्ती दिली असून, दुसर्‍या टप्प्यात 386 जणांना पत्र दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कायम रिक्त पदे असलेल्या शाळांवर कंत्राटी शिक्षक भरले गेलेले असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

 


ZP Ratnagiri Bharti 2026: Zilla Parishad Ratnagiri is going to conduct new recruitment for the posts of “Advocate”. There are total of 31 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Ratnagiri. Interested and eligible candidate can send their application form to the given address before the last date. The last date for submission of the applications is the 11th of September 2024. For more details about ZP Ratnagiri Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत “वकील” पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे.

 

  • पदाचे नाववकील
  • पदसंख्या31 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणरत्नागिरी
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), जिल्हा परिषद रत्नागिरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषद भवन, रत्नागिरी ४१५६१२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख11 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.zpratnagiri.org/

How To Apply For ZP Ratnagiri Recruitment 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही.
  • अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
  • सविस्तर जाहिरात अटी, शर्ती तथा अर्जासह  zpratnagiri.org वर उपलब्ध आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For zpratnagiri.org Bharti 2026

???? PDF जाहिरातhttps://shorturl.at/jmPH5
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.zpratnagiri.org/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड