ZP Gadchiroli Bharti 2026
सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी, बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केला आहे. नागरिकांनी अशा अप्रमाणित जाहिरातींवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रकारची आर्थिक व्यवहार अथवा वैयक्तिक माहिती संबंधित व्यक्तींना देऊ नये, असे आवाहन केले आहे.
मागील काही दिवसांपासून मीडिया विविध सोशल प्लॅटफॉर्मवर जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित केली जात आहे. या जाहिरातीत गडचिरोली, अहेरी, आरमोरी, भामरागड, चामोर्शी, एटापल्ली, कोरची, कुरखेडा, मुलचेरा, सिरोंचा, देसाईगंज, धानोरा यांसह विविध तालुक्यांतील शाळांमध्ये प्रतिमहा २२ हजार रुपये वेतनावर भरती केली जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सदर जाहिरात जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी प्रसिद्ध केलेली नसून तिचा जिल्हा परिषदेशी कोणताही संबंध नाही. संबंधित जाहिरात तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली असून ती नागरिकांची दिशाभूल करणारी आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेमार्फत कोणतीही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्यास त्यासंदर्भातील अधिकृत जाहिरात केवळ जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि मान्यताप्राप्त दैनिक वृत्तपत्रांमधूनच प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे नागरिकांनी केवळ अधिकृत माध्यमांवरील माहितीवरच विश्वास ठेवावा.
जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व नागरिक, बेरोजगार युवक-युवती तसेच पालकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित भरती जाहिरातींची सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये. कोणत्याही संशयास्पद जाहिरातीबाबत संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून खात्री करावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Previous Posts:
ZP Gadchiroli Bharti 2026
ZP Gadchiroli Bharti 2026: Zilla Parishad Gadchiroli invites applications for the posts of “Medical Officer”. There is a total of various Vacancies to fill with the given posts. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on the 16th of March 2026. For more details about ZP Gadchiroli Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. जिल्हा परिषद गडचिरोली भरती 2026 करीता मुलाखतीची तारीख १६ मार्च २०२६ आहे.
जिल्हा परिषद गडचिरोली भरती २०२६
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गडचिरोली
- वयोमर्यादा –
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद,गडचिरोली.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ मार्च २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://www.zpgadchiroli.in/
Educational Qualification For ZP Gadchiroli Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| वैद्यकीय अधिकारी | १. एम.बी.बी.एस २. बी.ए.एम.एस |
Salary Details For ZP Gadchiroli Notification 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| वैद्यकीय अधिकारी | अ) एम.बी.बी.एस पदाकरिता आदिवासी दुर्गम भागात रु. ८०,०००/- व इतर भागात रु. ७५,०००/- एवढे मानधन राहील. क) बी.ए.एम.एस पदाकरिता आदिवासी दुर्गम भागात रु. ४५,०००/- व इतर भागात रु.४०,०००/- एवढे मानधन राहील. |
Selection Process For ZP Gadchiroli Application 2026
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती १६ मार्च २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For zpgadchiroli.in Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/dfgsy |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.zpgadchiroli.in/ |
ZP Gadchiroli Bharti 2026
ZP Gadchiroli Bharti 2025 – उच्च प्रतीच्या लोहखनिजामुळे जगाचा नकाशावर आलेल्या गडचिरोली जिल्ह्यात विविध सरकारी विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दोन हजारहून अधिक पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांचा पालक जिल्हा असूनही मागील अनेक वर्षापासून ही पदे रिक्त असल्याने जिल्ह्याच्या विकासात खोडा निर्माण झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागील दोनहून अधिक वर्षापासून गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये फडणवीसांनी गडचिरोलीला क्रमांक एकचा जिल्हा बनवू अशी घोषणा केली आहे. त्यापार्श्वभूमीवर लोहखनिजावर आधारित मोठे मोठ्या उद्योगांची मुहूर्तमेढ रोवण्यात येत आहे. रेल्वे, विमानतळ उभारणीसह समृद्धी महामार्गाचा विस्तार गडचिरोलीपर्यंत होणार आहे. एवढ्या सगळ्या विकासात्मक हालचालींमध्ये जिल्ह्यातील मूळ प्रश्नांचा मात्र मुख्यमंत्र्यांना विसर पडल्याचे चित्र आहे. आजघडीला जिल्ह्यातील विविध सरकारी विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांची आकडेवारी बघितल्यास एकूण मंजूर ७३१९ पदांपैकी १५९९ पदे रिक्त आहेत. यात वर्ग १ व २ ची १६१, वर्ग ३ ची सर्वाधिक १४५० पदे रिक्त आहेत. यामध्ये शिक्षक व लिपिक यांची संख्या अधिक आहेत. पशु विकास अधिकाऱ्यांची ५३ पदे, तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही जबाबदारी बहुतांश कंत्राटी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. महसूल विभागात १६२२ पैकी २५० पदे रिक्त आहेत. यात उपजिल्हाधिकारी १, तहसीलदार ३, नायब तहसीलदार ११ आणि सर्वाधिक महसूल सहाय्यक ६५ इतकी पदे रिक्त आहेत. पोलीस विभागातही काही प्रमाणात पदे रिक्त आहेत. मागील अनेक महिन्यांपासून रिक्त पदांची ही स्थिती कायम असल्याने अनेक कामांची गती मंदावली आहे. यात विकास कामांचाही समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. विशेष करून आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत गडचिरोली जिल्हा हा अतिसंवेदनशील मानला जातो. त्यामुळे याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे. परंतु तसे होताना दिसत नसल्याने विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.
एकीकडे जिल्ह्याचा औद्योगिक विकास होत असताना रस्त्यांची अवस्था मात्र अत्यंत वाईट झाल्याने नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. दरवर्षी शेकडो कोटी खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून रस्ते बांधणी केला जाते. परंतु पहिल्याच पावसात यातील बहुतांश रस्ते उखडत असल्याने त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रश्नांना घेऊन येथील अधिकारी गंभीर नसल्याने जिल्ह्यातील अनेक भागात रस्त्यांचा प्रश्न जैसे थे आहे. दुसरीकडे जिल्हा मुख्यालयातील जिल्हा रुग्णालयात सोयीसुविधाअभावी रुग्णांची प्रचंड हेडसांड होत असल्याचे चित्र आहे. हे प्रश्न सोडविण्यात प्रशासन पूर्णपणे अपेक्षित ठरत असल्याने, या संदर्भातही मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















