बुलढाणा जिल्ह्यात मंजूर पदांपैकी 321 पदे रिक्त!! ZP Buldhana Bharti 2022

ZP Buldhana Bharti 2022

ZP Buldhana Bharti 2022 

ZP Buldhana Bharti 2022  : There are a total of 6342 Teacher posts sanctioned in the Buldhana District but 321 posts are still vacant. Further details are as follows:-

ZP Buldhana Teachers  Bharti 2022 

आधीच गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे, यावर्षी कोरोना अटोक्यात आल्याने शाळांवरील निर्बंध हटवण्यात आल्याने शाळा परत एकदा सुरू झाल्या आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पद असल्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

 • भारतात (India) दोन वर्षांपूर्वी कोरोनाने कहर केल्याने शाळा आॅनलाईन पध्दतीनेच सुरू होत्या.
 • मात्र, ग्रामीण भागामध्ये मोबाईल, लॅपटाॅल आणि इंटरनेट नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले.
 • आता कोरोनाचे (Corona) रूग्ण कमी झाल्याने सर्व निर्बंध हटवण्यात आल्याने पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या आहेत.
 • परंतू, बुलढाणा जिल्हात शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान (Damage) होतयं.
 • जिल्ह्यात 6342 शिक्षकांच्या मंजूर पदांपैकी 321 पद रिक्त आहेत.
 • यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असले तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसते आहे.

शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान

 • आधीच गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे, यावर्षी कोरोना अटोक्यात ल्याने शाळांवरील निर्बंध हटवण्यात आल्याने शाळा परत एकदा सुरू झाल्या आहेत.
 • मात्र जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पद असल्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, आणि त्यामुळेच अनेक गावांमध्ये शिक्षक मिळण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांकडून विविध आंदोलने केली जात आहेत.

ZP Buldhana Teachers Recruitment 2022 

बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1403 प्राथमिक तर 35 माध्यमिक शाळा

 • बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1403 प्राथमिक तर 35 माध्यमिक अशा एकूण 1438 शाळा आहेत.
 • ज्यामध्ये मराठी प्राथमिक शाळेवर 5609 तर उर्दू माध्यमावर 733 असे एकूण 6342 पदे मंजूर आहेत.
 • त्यापैकी मराठी आणि उर्दू मिळून 6021 शिक्षक कार्यरत असून 321 शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
 • सोबतच मराठी आणि उर्दू शाळेवरील मुख्याध्यापकांच्या 429 मंजूर पदांपैकी 168 पदे रिक्त आहेत.
 • रिक्त पदे भरण्यासंदर्भात पालकांकडून वारंवार शिक्षणाधिकारी कार्यालयासोबत संपर्क केला जातोय.
 • इतकेच नाही तर आंदोलनही केली जात आहेत.

ZP Buldhana Recruitment 2022

शाळेला शिक्षक मिळण्यासाठी ग्रामस्थाचे आंदोलन

 • शिक्षणाधिकारी स्तरावर शिक्षक नेमणुकीचे अधिकार नसल्याने शिक्षकांची नेमणूक ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाते.
 • बुलढाणा जिल्ह्यातील रिक्त पदांसंदर्भात वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयांकडे अहवाल पाठवण्यात आला आहे, ज्या पद्धतीने जिल्ह्याला शिक्षक उपलब्ध होतील तसे जिल्ह्यात शाळेतील रिक्त पदांनुसार शिक्षक उपलब्ध करून दिल्या जातील, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
 • मात्र, अजूनही जिल्हातील शाळेंमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात न आल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

ZP Buldhana Bharti 2022 

ZP Buldhana Bharti 2022  : There are a total of 83 Teacher posts are vacant in Tribal-dominated Sangrampur Taluka. For more details about ZP Buldhana Recruitment 2022, ZP Buldhana Teacher Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

जिल्हा प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. आदिवासीबहुल संग्रामपूर तालुक्यात तब्बल ८३ शिक्षकांची पदे रिक्त असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. परिणामी असंख्य गावांमध्ये शिक्षणाचा बोजवारा उडाला असून पालकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून दुर्लक्षित संग्रामपूर तालुक्यातील मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यास शिक्षण विभागाकडे वेळ नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होण्याचा धोका व्यक्त होत आहे.

ZP Buldhana Recruitment 2022 – Vacancy Details

 • तालुक्यातील ९१ मराठी, तर १२ उर्दू असे एकूण १०३ शाळांवर एकूण ४८४ शिक्षकांची पदे मंजूर आहेत.
 • यामध्ये मराठी शाळेवर ४०५, तर उर्दू शाळांवर ७१ मान्यतेनुसार मंजूर पदे आहेत.
 • यापैकी मराठी शाळेवर ६६, तर उर्दू शाळांवर ३० असे एकूण तब्बल २६ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
 • मराठी शाळांवर १३ अतिरिक्त शिक्षक असल्याने एकूण ८३ रिक्त पदे असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
 • त्यातच बदल्या करून शिक्षकांची संख्या कमी केल्याने शिक्षणाचा दर्ज खालवत आहे.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
 1. Vitthal M. Sapkale says

  Only government jobs

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड