युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत विद्यावेतन सुरु, सोबत मिळणार अनुभवाची जोड!
yuva karya prashikshan Yojana Payment
नोकरीसाठी जाईल त्या ठिकाणी विचारला जातो तो अनुभव. यामुळे अनेकजणांना नोकरीपासून वंचित रहावे लागते. परंतु सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत उमेदवारांना सहा महिन्यांसाठी सहा हजार रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन दिले जात आहे (yuva karya prashikshan Yojana Payment). या योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात तीन हजारांहून उमेदवारांची प्रशिक्षणार्थी भरती झाली आहे. सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अनुभवाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. यामुळे या उमेदवारांना सहा महिन्यांसाठी रोजगार मिळणार आहेच, त्यासोबत अनुभवाची शिदोरीही पाठीशी राहणार आहे. बहुतांश जणांना अनुभव नसल्याने नोकरी मिळवण्यासाठी अडचण येते. त्यामुळे बेरोजगारीत भर पडत असल्याचे चित्र आहे. तसेच शिक्षणानंतर युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यात नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली. राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येत आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात युवक-युवती शिक्षण घेऊन नोकरी-व्यवसायाच्या शोधात असतात.
या योजनेंतर्गत युवकांना सहा महिन्यांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागातील मंजूर पदांच्या पाच टक्के पदे कौशल्य विकास विभागाच्या महास्वयं पोर्टलवर तत्काळ नोंदवावीत, प्रशिक्षणार्थ्यांना कार्यालयात रुजू करून घ्यावे, या योजनेमुळे शासकीय आस्थापनांना शासकीय कामकाजासाठी मनुष्यबळ उपलब्ध होईल, यामुळे सर्व आस्थापनांनी ऑनलाइन नोंदणीला प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने शासकीय व खासगी आस्थापनांना यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार गेल्या महिन्यापासून आतापर्यंत शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये ता. १४ सप्टेंबरपर्यंत ४१०१ उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. त्यापैकी २९२० उमेदवारांना प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी रुजू करून घेण्यात आले आहे. या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची प्रक्रिया आहे. त्यानंतर संबंधित आस्थापनेकडून मुलाखतीला बोलवून घेऊन त्यानंतर त्या उमेदवाराला रुजू करून घेतले जात आहे. यापुढेही ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
उमेदवारांना मिळतेय असे विद्यावेतन
बारावी, आय.टी.आय, पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेल्यांना सहा महिने प्रशिक्षणासाह विद्यावेतन देण्यात येत आहे. यामध्ये बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सहा हजार रुपये, आय. टी. आय., पदविका शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना आठ हजार रुपये, पदवीचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना दहा हजार रुपये विद्यावेतन मिळत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उमेदवारांना प्रशिक्षणासाठी अटी
उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे. शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण/आय.टी.आय/पदविका/ पदवी/ पदव्युत्तर पदवी अशी असावी. उमेदवारांची आधार नोंदणी असावी. तसेच उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे. इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच पोर्टलवरील पदांसाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवार नोंदणीत पुणे विभागात कोल्हापूर प्रथम
शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये प्रशिक्षणासाठी ता. १४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील ४१०१ उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. तर २९२० उमेदवार आस्थापनांमध्ये रुजू झाले आहेत.या नोंदणीत कोल्हापूर जिल्हा हा पुणे विभागात सर्व प्रथम आला आहे.
उद्योजकांना २० टक्के उमेदवार घेता येणार
या योजनेंतर्गत ज्या खासगी उद्योजकांकडे १ ते १० मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यांना १ उमेदवार तर ज्यांच्याकडे ११ते २० मनुष्यबळ आहे, त्यांना २ पदे भरता येणार आहेत. २० पेक्षा अधिक मनुष्यबळ असणाऱ्या उद्योजकांना १० टक्के उमेदवार घेता येणार आहेत. तसेच सेवा क्षेत्रातील उद्योजकांना २० टक्के उमेदवार घेता येणार आहेत.
विविध माध्यमातून उमेदवारांची नोंदणी
रोजगार रथामार्फत एम.आय.डी.सी. व शैक्षणिक संस्थांना भेट देऊन उमेदवारांची नोंदणी केली जात आहे. त्याचबरोबर दुर्गम भागातील युवकांसाठी रोजगार रथामार्फत ‘रोजगार आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे. विविध आस्थापनांमध्ये जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय रोजगार मेळावे घेतले जात आहेत. तसेच औद्योगिक संघटनांची संमेलनेही घेतली जात आहेत.
….
Comments are closed.