Pre-Matric Scholarship 2023 scholarships.gov.in

Pre-Matric Scholarship Scheme for Minority


Pre-Matric Scholarship Scheme for Minority

अल्पसंख्याकांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सविस्तर माहिती

Pre-Matric Scholarship 2023 scholarships.gov.in Details is here – The Pre-Matric Scholarship Scheme is a scheme sponsored by the Ministry of Minority Affairs, Government of India. The Pre-Matric Scholarships are given to minority students studying in 1st to 10th standard. The scheme is implemented in the state through the Director, Department of School Education, Directorate of Minority and Adult Education, Pune. Under this scheme in government or private school etc. To be eligible under this scheme, the annual income of the parents of the students is Rs. Must be less than 1.00 lakhs and students must have obtained more than 50% marks in the previous year. Complete details like how to apply for Pre-Matric Scholarship 2021 given here. Pre Matric Scholarship Scheme 2021 2022 for Class 1 to 10 complete details see below:

Savitribai Phule Scholarship Scheme

प्री – मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना ही अल्पसंख्याक कार्य मंत्रालय, भारत सरकारद्वारे पुरस्कृत योजना आहे. सदर योजना राज्यात शालेय शिक्षण विभागातंर्गत संचालक, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येते. या योजनेंतर्गत शासकीय वा खाजगी शाळेत इ. १ ली ते १० वी मध्ये शिकत असलेल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. सदर योजनेंतर्गत पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. १.०० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक असून, मागील वर्षात विद्यार्थ्यांनी ५०% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.

Pre-Matric Scholarship 2023 apply date extended

Pre-matric Scholarship date extended

Scholarship

पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना

Objective of Pre Matric Scholarship Scheme 2023- 2024 for Class 1 to 10

  • The scholarship at pre-matric level will encourage parents from minority communities to send their school going children to school, lighten their financial burden on school education and sustain their efforts to support their children to complete school education.
  • The scheme will form the foundation for their educational attainment and provide a level playing field in the competitive employment arena.
  • Empowerment through education, which is one of the objectives of this scheme, has the potential to lead to upliftment of the socio economic conditions of the minority communities.
  • पीएम स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज सुरु

Important Guidelines of Pre-Matric Scholarship Scheme 2023

How to apply for Pre-Matric Scholarship Scheme 2023

सदर शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

Pre-Matric Scholarship Schedule

Online Apply Link

मॅट्रिकपूर्व विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

  1. समाज कल्याण विभागामार्फत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्याचे समाजकल्याण अधिकारी यांनी केले आहे.
  2. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी उत्पन्न व अर्ज अट नाही अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थिनी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या शिष्यवृत्तीसाठी पाचवी ते सातवी या वर्गाकरिता 600 रूपये तर इयत्ती आठवी व दहावीकरिता रूपये १०००/- रूपये वार्षिक लाभ देण्यात येतो. इयत्ता 9 वी व 10 वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी लाभार्थ्याचे उत्पन्न दोन लाखाच्या आत असणे आवश्यक आहे अनुसूचित जातीचे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यांना २२५० रूपये वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते. अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी जातीची अट नाही, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. इयत्ता पहिली ते दहावी करिता वार्षिक ३००० रूपये शिष्यवृत्ती देण्यात येते.
  3. मॅट्रिकपूर्व शिक्षण फी व परिक्षा फी करिता उत्पन्नाची अट नाही, तीन अपत्यपर्यंत या योजनेतंर्गत फी देता येते, वेळोवेळी विहीत केलेल्या दराप्रमाणे अनूसूचीत जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गमधील १० वीच्या विद्यार्थ्यांना रूपये 385/- इतकी वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते. माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थांना गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी ५०% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यानी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. अनुसूचित जातीमधील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक 500/- रूपये, अनुसूचीत जातीच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक 1000/-, विमुक्त जाती भटक्या जाती विशेष मागास प्रवर्ग साठी 200/-रूपये तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग साठी रूपये ४०० वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते.
  4. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मागासवर्गीय विद्यार्थांना शिक्षण शुल्क व परीक्षा फी करिता दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचे शिधा पत्रिका, विना अनुदानित संस्थामध्ये शिक्षण घेणा-या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या घटकातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. इयत्ता पहिली ते चौथीसाठी १००/-रूपये इयत्ता पाचवी ते सातवी १५०/-रूपये, इयत्ता आठवी ते दहावी २०० रूपये वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते.
  5. इयत्ता 5 वी-7 वीत शिकणा-या इतर मागास प्रवर्गाच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी उत्पन्नाची अट नाही मुलींचे आधार संलग्न बँक खाते आवश्यक इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थीनीसाठी वार्षिक ६०० रूपये वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते.इयत्ता 8-10 वीत शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गाच्या विद्यार्थीनींना सावित्रिबाई फुले शिष्यवृत्ती योजना उत्पन्न अट नाही मुलींचे आधार संलग्न बॅक खाते आवश्यक आहेत. या योजनेसाठी इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यींनीना वार्षिक १००० रूपये शिष्यवृत्ती देण्यात येते.
  6. इयत्ता 1 ली ते 10 वीत शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी २ लाख उत्पन्न मर्यादा व ६० उपस्थिती आवश्यक आहेत विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेवू शकतात इ.1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना शंभर रूपये प्रमाणे वर्षभर ही शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच इयत्ताही नववी ते दहावीसाठी रूपये १५० प्रमाणे १५०० रूपये वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते.
  7. इयत्ता 1 ली ते 10 वीत शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी अडीच लाख रूपये उत्पन्न मर्यादा आहे. इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १५०० वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते अशी माहिती समाजकल्याण विभाग मुंबई शहर व उपनगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


2 Comments
    Test22
  1. Mayuri sarjerao kamble says

    No

  2. Test22
  3. MahaBhartiYojana says

    Pre-Matric Scholarship 2023 scholarships.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.