NSFDC Loan Scheme Online Application Form

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्जासाठी येथून अर्ज करा


NSFDC Loan Scheme Online Application Form

NSFDC Loan Scheme Online Application Form details are given here. NSFDC Cover various scheme like Mahila Samrudhi Yojna, Mahila Kisan Yojana, Term Loan, Micro Credit Finance and Educational Loan etc. NSFDC was established to finance for the socio economic development of persons belonging to the scheduled castes families having annual family income up to Rs. 3.00 lakh including their skill upgradation. NSFDC provides loan for income generating scheme to target group through its Channalising Agencies namely State Scheduled Castes Development Corporations (SCDCs), Public Sector Banks (PSBs), Regional Rural Banks (RRBs) and other Institutions. See the all scheme details below on this page which is covered under the NSFDC. Keep visit on our website for the further updates.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यात ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ योजनेकरिता ९ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहर-उपनगरचे जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ योजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरीत करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला, मार्कशीट, दोन फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ. सह दोन प्रतींमध्ये आपले पूर्ण पत्त्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या), मुंबई – गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रुम नं. ३३, बांद्रा (पू), मुंबई-४०००५१ या पत्त्यावर ९ जुलैपर्यंत अर्ज करावेत.

Annabhau Sathe vikas mahamandal Karj Yojana

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्जासाठी येथून अर्ज करा

आर्थिकदृष्टया मागास घटकातील युवकांना उद्योजकतेसाठी अर्थसहाय्य : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

राज्यातील आर्थिकदृष्टया मागास घटकातील उद्योजक बनु इच्छिणाऱ्या तसेच तशी क्षमता असणाऱ्या बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य पुरविण्यासाठी शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळाच्यातर्फे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. या योजनांची माहिती देणारा लेख…

  • वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (IR-1)- या योजनेची मर्यादा १० लाखाहून १५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. महामंडळामार्फत रु. ४.५ लाखाच्या व्याज मर्यादेत परतावा करण्यात येतो. व्याज परतावा कालावधी जास्तीत-जास्त ७ वर्ष व व्याजाचा दर जास्तीत जास्त द.सा.द.शे. १२% असेल. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांनी बँकेमार्फत कर्ज घेतलेले असावे. व ते कर्ज फक्त व्यवसायिक तथा उद्योगाच्या दृष्टीने मंजूर झालेले असावे. (दिनांक २० मे, २०२२ पूर्वीच्या LO.I. धारकांना नियमानुसार रु. १० लाखाच्या मर्यादेतील व्याज परतावा करण्यात येणार असून व्याजाकरीता रु. ३ लाखाची मर्यादा असेल.)
  • गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना (IR-2) – या योजनेअंतर्गत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येऊन, दोन व्यक्तींसाठी कमाल रु. २५ लाखाच्या मर्यादेवर, तीन व्यक्तींसाठी रु. ३५ लाखाच्या मर्यादेवर, चार व्यक्तींसाठी रु. ४५ लाखाच्या मर्यादेवर व पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास रु. ५० लाखापर्यंतच्या व्यवसाय/उद्योग कर्जावर ५ वर्षापर्यत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, जास्तीत जास्त १२ टक्के व्याज किंवा रु. १५ लाखाच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास, हफ्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. या योजनेमध्ये FPO गटांनी त्यांच्या शेतीपूरक व्यवसायाकरीता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील देखील व्याज परतावा नियमानुसार महामंडळ करेल.

How to Apply for www.udyog.mahaswayam.gov.in

महामंडळाच्या योजनांची संपूर्ण यंत्रणा व कार्यपध्दती ही ऑनलाईन असून पूर्णपणे पारदर्शक आहे. सदरच्या योजना या लाभार्थीभिमुख असून लाभार्थी जोपर्यंत सर्व माहिती वेब प्रणालीवर (www.udyog.mahaswayam.gov.in.) अपलोड करीत नाही, तोपर्यंत पुढील कार्यवाही करता येत नाही.

  • महामंडळाच्या योजनांकरीता सामाईक अटी व शर्ती- उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य, या योजना प्रामुख्याने मराठा प्रवर्गाकरीता तथा ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र महामंडळ अस्तित्त्वात नाही, अशांकरीता आहेत.
  • योजनेकरीताची वयोमर्यादेची अट – स्त्री-पुरुषांकरीता कमाल ६० वर्षे असेल. लाभार्थ्याचे कौटूबिक वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखाच्या आत असावे. (रु. ८ लाखाच्या मर्यादित असल्याचे तहसिलदाराचे प्रमाणपत्र) किंवा वैयक्तीक I.T.R. (पती व पत्नीचे)] लाभार्थ्यांने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक/कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल. दिव्यांग व्यक्तीला योजने अंतर्गत लाभ घ्यावयाचा असल्यास तो मानसिकदृष्ट्या सक्षम असावा.
  • गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) मध्ये कमाल वयोमर्यादेचे बंधन नसेल. गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत भागीदारी संस्था, सहकारी संस्था, बचतगट, एल.एल.पी., कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट/संस्था लाभास पात्र असतील. महामंडळाच्या योजनांतर्गत फक्त व्यवसाय/ उद्योगाकरीता घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा करण्यात येईल व या योजनांची अंमलबजावणी तंतोतंत करण्यात येईल.
  • योजनांचा लाभासाठी कार्यपध्दती- पात्रता प्रमाणपत्र (LOI) करीता महत्वाची कागदपत्रे- आधार कार्ड (अपडेटेड मोबाईल क्रमांक व स्वत:च्या ई-मेल आयडी सह) रहिवासी पुरावा (रहिवासी दाखला/लाईट बिल/रेशनकार्ड/गॅस बिल/बैंक पास बुक) उत्पन्नाचा पुरावा (उत्पन्नाचा दाखला/आयटी रिटर्न (जर लग्न झाले असल्यास नवरा-बायकोचे व लग्न झाले नसल्यास स्वतः चे आयटी रिटर्न अनिवार्य) जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला एक पानी प्रकल्प अहवाल (याचा नमुना वेब प्रणालीवर उपलब्ध आहे.) पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्राप्त झाल्यानंतरच, LOI समवेत लाभार्थ्यांने त्याला करावयाचा असलेल्या व्यवसायाचा/उद्योगाचा प्रकल्प अहवाल (आवश्यक ते सर्व कागदपत्र च्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही बँकेमध्ये कर्ज प्रकरण दाखल करावे. कर्ज मंजूरीची पुर्ण प्रक्रीया बैंक करीत असते, यामध्ये महामंडळ कोणत्याही स्वरुपाचा हस्तक्षेप करीत नाही. कर्ज प्रकरण दाखल केल्यानंतर पोचपावती बँकेकडून घ्यावी. बँकेने कर्ज मंजुर केल्यानंतर कर्ज मंजूरीबाबतची आवश्यक सर्व माहिती संबंधिताने वेब प्रणालीवर सादर करावी. (उदा. जया खात्यामध्ये व्याज परतावा हवा आहे त्याचा तपशील, बँक कर्ज मंजुरी पत्र, बँकेमार्फत वितरीत करण्यात आलेल्या कर्जाचा पुरावा (बँक स्टेटमेंट), बैंक EMI वेळापत्रक (त्यावर वसुलीचा दिनांक असणे अनिवार्य), प्रकल्प अहवाल, हफ्ता भरल्याबाबतचा पुरावा (बैंक स्टेटमेंट सही व शिक्क्यानिशी) त्यानंतर बँकेमध्ये पुर्ण EMI हफ्ता विहित कालमर्यादित भरल्यानंतरच महामंडळाच्या वेब प्रणालीवर ऑनलाईन क्लेम दाखल करावा. दाखल केलेला क्लेम अचूक असला तरच संबंधिताला व्याज परताव्याचा लाभ देता येईल. यामध्ये हफ्ता भरल्याबाबतचा पुरावा म्हणून बँक स्टेटमेंट सही व शिक्क्यानिशी अपलोड करणे अनिवार्य असेल. लाभार्थ्याने दाखल केलेल्या क्लेमची पडताळणी महामंडळामार्फत करण्यात येऊन, लाभार्थ्यास अनुज्ञेय असलेली व्याज परताव्याची रक्कम संबंधिताच्या बँक खात्यात ऑनलाईन स्वरुपात वितरीत करण्यात येईल.
  • या योजनांच्या लाभाकरीता कोणत्याही सहकार्याची आवश्यकता असल्यास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांना संपर्क साधावा. जिल्हा समन्वयकांचा संपर्क वेब प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या योजनांच्या सहाय्याकरीता महामंडळाचे मुंबई मुख्यालय व जिल्हानिहाय जिल्हा समन्वयकांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्याही खाजगी व्यक्ती/संस्थेच्या प्रलोभनाला बळी पडू नये.
  • महामंडळाच्या कार्यालयाचा पत्ता-जी. टी. हॉस्पिटल, बी. टी. मार्ग, जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या मागे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनजवळ, मुंबई ४००००५
  • दूरध्वनी क्रमांक ०२२-२२६७०४०२,
  • इमेल[email protected]
  • वेबसाईट : www.udyog.mahaswayam.gov.in

annabhau

Annasaheb Patil Karj Yojana

Loan date extension

Annasaheb patil

Main objective of NSFDC Scheme

  • NSFDC’s main objective is to finance, facilitate and mobilize funds for the economic empowerment of persons belonging to the Scheduled Caste families having annual family income up to  Rs. 3.00 lakh.

Loan Scheme

how to get loan

Benefits of NSFDC Scheme to women

  • Out of funds notionally allocated on the basis of SC population, 40% of the total funds have been allocated for women both in physical and financial terms. Interest rebate ranging from 0.5% – 1% is offered to women beneficiaries in certain schemes.
  • There are two exclusive schemes for women beneficiaries i.e. Mahila Samriddhi Yojana and Mahila Kisan Yojana.

Procedures to be followed while implementing NSFDC scheme

Various schemes are implemented under Mahatma Phule Backward Classes Development Corporation under NSFDC, New Delhi scheme. The details are as follows.

Sr. No. Scheme Loan Limit (In INR.) Contribution Rate of Interest
MPBCDC NSFDC Applicant
1 Term Loan 30,00,000/- 20% 75% 5% Upto Rs. 5.00 Lac IR is 6% and Above Rs. 5.00 Lacs IR will be 8%
2 Micro Credit Finance Rs.50,000/- 10,000/- Subsidy Rs. 40,000/- 5%
3 Mahila Samrudhi Rs.50,000/- Rs.10,000/- Subsidy Rs. 40,000/- 4%
4 Mahila Kisan Yojana Rs.50,000/- 10,000/- Subsidy Rs. 40,000/- 5%
5 Educational Loan
For domestic higher education Rs.10,00,000/- 90% 10% For Men RoI will be 4% and For Women’s RoI will be 3.5%
For higher education abroad Rs 20,00,000/- 90% 10%
A Documents required for loan approval.
1 Caste Certificate
2 Income Proof
3 Resident proof (ration card, voter ID card, Aadhaar card, PAN card, electric bill etc.)
4 Documents related to the business such as price list of goods, proof of place of business if required, clerk’s license, other business related documents such as vehicle license, clerk’s license, permit, batch number etc.
5 Project report as required (above Rs. 2.00 lakhs)
6 Bonafide Certificates and Educational Documents (for Higher Educational Loans)
B After fulfilling the required documents, the following action is taken by the concerned district office.
1 The residence of the applicant as well as the place of business is verified.
2 Subsequent loan cases are scrutinized and approved by the District Beneficiary Selection Committee set up under the chairmanship of the Collector.
3 Loan cases approved in the District Beneficiary Selection Committee are recommended for approval to the Regional Office of the Corporation through the concerned District Office.
4 Except for micro-supply and Mahila Samrudhi schemes, loan proposals for other schemes are sent to the head office for approval.
5 The LOI application is made to NSFDC, New Delhi as per the loan proposal received from the Regional Office.
6 Upon receipt of LOI from NSFDC, New Delhi, the loan proposal is approved accordingly.
7 After approval, through the concerned district office, the applicant has to submit the required documents related to the distribution of seed capital and NSFDC loan from the applicant (e.g., medical documents, guarantor, guarantor’s salary deduction guarantee-pay certificate, property holder if the property holder is the guarantor, property report, guarantor, The election card of the guarantor, the identity card issued by the department as well as the check dated answer of the applicant in connection with the recovery of the loan, affidavit of loan disbursement etc.) are fulfilled.
8 Funding proposals are then submitted to the Regional Office by the concerned office and funds are requested to the Headquarters through the Regional Office.
9 NSFDC New Delhi seeks funding after receiving a funding proposal from the Regional Office.
10 Following the receipt of funds from NSFDC, New Delhi, the disbursement of funds is done through the Head Office as per the demand letter received from the Regional Office.

एनएसएफडीसी योजना राबविताना अवलंबविण्याची कार्यपद्धती

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत एनएसएफडीसी, नवी दिल्ली योजनेअंतर्गत विविध योजना राबविल्या जातात.त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

NSFDC Loan Scheme Online Application Form given below :

अ. क्र. योजना कर्ज मर्यादा (रुपये) सहभाग व्याजदर
म.फु.मा.वि.म. एनएसएफडीसी अर्जदार
1 मुदती कर्ज 30,00,000/- 20% 75% 5% रु. 5.00 लाखा पर्यंत 6% व रु. 5.00 लाखाच्या पुढे 8%
2 सुक्ष्मपत पुरवठा 50,000/- 10,000/- अनुदान रु. 40,000/- 5%
3 महिला समृद्धी 50,000/- 10,000/- अनुदान रु. 40,000/- 4%
4 महिला किसान योजना 50,000/- 10,000/- अनुदान रु. 40,000/- 5%
5 शैक्षणिक कर्ज
देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी 10,00,000/- 90% 10% पुरुषांसाठी 4% व महिलांसाठी 3.5%
देशाबाहेर उच्च शिक्षणासाठी 20,00,000/- 90% 10%
कर्ज मंजूरीकरिता आवश्यक कागदपत्रे
1 जातीचा दाखला
2 उत्पन्नाचा दाखला
3 रहिवाशी पुरावा (रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रीक बिल इत्यादी)
4 व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे जसे की, मालाचे किंमतीपत्रक, आवश्यक असल्यास व्यवसायाच्या जागेचा पुरावा, गुमास्ता लायसन्स, व्यवसायानुरुप इतर कागदपत्रे वाहनाकरिता लायसन्स, गुमास्ता लायसन्स, परमिट, बॅच नंबर इत्यादी
5 आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल (रु. 2.00 लाखाच्या वर)
6 बोनाफाईड सर्टीफिकेट व शैक्षणिक कागदपत्र (उच्च शैक्षणिक कर्जाकरिता)
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येते
1 अर्जदाराच्या राहत्या घराची तसेच व्यवसायाच्या जागेची पडताळणी केली जाते.
2 तद्नंतर प्राप्त कर्ज प्रकरणे मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा लाभार्थी निवड समितीमार्फत प्रकरणांची छाननी करुन मान्यता प्रदान केली जाते.
3 जिल्हा लाभार्थी निवड समितीमध्ये मंजूर झालेली कर्ज प्रकरणे संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे मंजूरीस्तव शिफारस करण्यात येतात.
4 सुक्ष्मपत पुरवठा व महिला समृद्धी योजना वगळता इतर योजनांचे कर्ज प्रस्ताव मंजूरीकरिता मुख्य कार्यालयास पाठविणेत येतात.
5 प्रादेशिक कार्यालयाकडून प्राप्त झालेले कर्ज प्रस्तावास अनुसरुन एलओआय मागणी एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांचेकडे करणेत येते.
6 एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांचेकडून एलओआय प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे कर्ज प्रस्तावास मंजूरी देण्याची कार्यवाही करण्यात येते.
7 मंजूरी दिल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत अर्जदाराकडून महामंडळाचे बीज भांडवल व एनएसएफडीसी कर्ज वितरणाच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे (जसे, वैद्यानिक दस्ताऐवज, जामीनदार, जामिनदाराचे वेतन कपात हमीपत्र-वेतन प्रमाणपत्र, मालमत्ता धारक जामिनदार असल्यास संपत्तीची नोंद असलेले दस्ताऐवज, जामिनदार पडताळणी अहवाल, जामिनदारांचे इलेक्शन कार्ड, विभागाने निर्गमित केलेले ओळखपत्र तसेच कर्ज वसुलीच्या अनुषंगाने अर्जदाराचे उत्तर दिनांकित धनादेश, कर्ज वितरणाचे शपथपत्र इत्यादी) पूर्तता करुन घेतली जाते.
8 यानंतर निधी मागणी प्रस्ताव संबंधित कार्यालयाकडून प्रादेशिक कार्यालयास सादर केले जातात व प्रादेशिक कार्यालयामार्फत मुख्यालयास निधी मागणी केली जाते.
9 प्रादेशिक कार्यालयाकडून निधी मागणी प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर एनएसएफडीसी नवी दिल्ली यांना निधी मागणी करणेत येते.
10 एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांचेकडून निधी प्राप्त झाल्यानंतर प्रादेशिक कार्यालयाकडून प्राप्त निधी मागणी पत्रास अनुसरुन कर्ज वितरणाची कार्यवाही मुख्यालयामार्फत करणेत येते.


5 Comments
    Test22
  1. Anil Janardhan dandge says

    Mala plot var home lon karyche ahe plz margdarshan kara

  2. Test22
  3. Manju Jadhav says

    Mala business sathi loan hawa aahe

  4. Test22
  5. MahaBhartiYojana says

    NSFDC Loan Scheme Online Application Form

  6. Test22
  7. सिद्धार्थ यशवंत says

    कधी एनएसडीसी च ऑनलाईन लोण फॉर्म येनर आहेत या मोंथ मध्ये कारण मला नसएफडीसी च एज्युकेशन लोन क्रीच आहे सो प्लस सांगा

  8. Test22
  9. Manisha tidake says

    Ata kuthl loan ahe amaravati sathi samajkalyan ch te sanga

Leave A Reply

Your email address will not be published.