MSKVY – Mukhyamantri Solar Krushi Vahini Yojana

Chief Minister Solar Agriculture Channel Scheme मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना


MSKVY Mukhyamantri Solar Krushi Vahini Yojana

Mukhyamantri Solar Krushi Vahini Yojana Details and Online Apply Method and Link are given here. Considering the increasing demand of electricity in the state, the state government has emphasized on solar power generation. An ambitious Mukhyamantri Solar Krishi Vahini Yojana has been launched to provide daytime electricity to agriculture. Private land can be taken on lease for this scheme and as compensation, farmers will be given a lease of 75 thousand rupees per hectare per year. In order to provide daytime electricity to agricultural dwellers, the Government of Maharashtra has aimed to provide daytime electricity to farmers by installing decentralized solar power plants with a capacity of 2 MW to 10 MW within a radius of 5 km from the agricultural distribution substation. Read the complete details given below and apply online from given lin.

Chief Minister Solar Agriculture Channel Scheme

पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

राज्यातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्य शासनाने सौर ऊर्जा निर्मितीवर भर दिला आहे. शेतीला दिवसा वीज पुरविण्यासाठी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी खासगी जमीन भाडेपट्ट्याने घेता येणार असून त्याचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरला दरवर्षी 75 हजार रुपये भाडेपट्टा देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना माहिती

 1. शेतीला दिवसा वीज पुरविण्यासाठी महावितरणतर्फे विद्युत वाहिन्यांचे सौर उर्जीकरण केले जाणार असून यासाठी मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरु करण्यात आली आहे.
 2. या अंतर्गत शेतकरी, ग्रामपंचायत, कारखाने यांच्याकडून जमीन भाड्याने घेण्याची तरतूद आहे.
 3. याठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
 4. या प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या खासगी जमिनींना दरवर्षी प्रतिहेक्टरी 75 हजार रुपये भाडेपट्टा देण्यात येणार आहे.
 5. याबाबतचा पुनरुच्चार राज्याच्या नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
 6. त्यामुळे शेतकऱ्यांना पडीक जमिनीतूनही वार्षिक हेक्टरी 75 हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे.

सौर कृषि वाहिनी योजनेची ठळक वैशिष्ठे

 1. सोलर वीज प्रकल्प उभारणीसाठी महावितरणच्या ३३/११ केव्ही उपकेंद्रांची यादी उपलब्ध क्षमतेसहित पोर्टलवर उपलब्ध
 2. शेतकऱ्यांना त्यांच्याकडील अतिरिक्त जमीन असल्यास सदर प्रकल्पासाठी भाडेतत्वावर देण्याची सुविधा
 3. महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार सरकारी जागेसाठी ३० वर्षासाठी रु. १/- भाडे राहील.
 4. खाजगी जमीन भाडेतत्वावर दिल्यास वार्षिक प्रती एकर रु. ३०,०००/- भाडे राहील.

सौर कृषि वाहिनी योजनेची उद्दिष्टे

 1. सोलर वीज प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे.
 2. शेतीप्रधान क्षेत्रांमध्ये असलेल्या उपकेन्द्राच्या ५ किमी परीक्षेत्रामध्ये २ ते १० मेगावॉट क्षमतेचे सोलर वीज प्रकल्प उभारणे.

What is Mukhyamantri Solar Krishi Vahini Yojana (MSKVY)?

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना (MSKVY) काय आहे?

 1. कृषि (AG) ग्राहकांना दिवसाची वीज पुरवण्याच्या साठी, महाराष्ट्र शासनाने, जी.आर. १४.०६.२०१७ आणि १७. ०३. २०१८ नुसार कृषि भारीत वितरण उपकेंद्रा पासुन ५ किलोमीटरच्या परिसरामध्ये २ मेगावॅट ते १० मेगावॅट क्षमतेसह विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करून शेतकऱ्यांना दिवसाची वीज देण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे.
 2. विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प महावितरणच्या विद्यमान ३३/११ केव्ही उपकेंद्रांशी थेट जोडले जातील, त्यामुळे वहन आणि वितरण हानी तसेच पारेषण व्यवस्था वरील खर्चा मध्ये बचत होईल. या उपकेंद्रांजवळील असे प्रकल्प शक्यतो शेतकरी विकसित करू शकतात, त्यांना सौर किंवा इतर अक्षय ऊर्जा-आधारित उर्जा प्रकाल्पासाठी त्यांच्या नापीक आणि अकृषिक जमिनीचा वापर करून उत्पन्न वाढवण्याची संधी मिळेल.
 3. २ मेगावॅट ते १० मेगावॅट सौर प्रकल्प उभारण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महावितरणने ऑनलाईन लँड पोर्टल सक्रिय केले आहे. शेतकरी किंवा तत्सम व्यक्ती विकेंद्रित सौर प्रकल्प उभारण्यासाठी आपली जमीन देऊ शकतो. माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांनी २७.०१.२०२१ रोजी कृषि धोरणांतर्गत सार्वजनिक वापरासाठी लँड पोर्टलचे उद्घाटन केले. सरकारी ठरावाच्या अनुषंगाने, महावितरण ने देऊ केलेला भाडेपट्टा, शासकीय जमिनीसाठी नाममात्र रु. १/ – आणि खाजगी जमिनींसाठी ३० वर्षांसाठी, रु. ३०,००० प्रति एकर प्रति वर्ष (वार्षिक दरवाढ 3 %).

Selection process under MSKVY

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना अंतर्गत विकासक/बोलीदार/सहभागी/सौर ऊर्जा उत्पादका साठी निवडीचे निकष काय आहेत?

 1. निविदेमध्ये सौर ऊर्जा उत्पादकाला एकाच उपकेंद्राकरिता एकापेक्षा अधिक बोली करता येणार नाही.
 2. आरएफएस (RfS) दस्तऐवजाची किंमत रु.२५०००/ – (अधिक लागू जीएसटी).
 3. प्रक्रिया शुल्क – रु. १०,००० प्रति मे.वॅ. आणि GST लागू .
 4. अर्नेस्ट मनी डिपॉझिट (ईएमडी) – रु. १ लाख / मे.वॅ. प्रति प्रकल्प
 5. ३१.०३.२०२१ रोजीचे निव्वळ मूल्य – रु. ०. ५२ कोटी प्रति मे.वॅ.
 6. आर्थिक ताळे बंद किंवा प्रकल्प वित्तपुरवठा व्यवस्था- LoA जारी केल्यापासून सौर उर्जा १२ महिन्याच्या आत कार्यान्वित करणे बंधन कारक राहील.

Benefits of Mukhyamantri Solar Krushi Vahini Yojana

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेचे फायदे काय आहेत?

 1. कृषि ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा.
 2. शेतकऱ्यांच्या नापीक आणि अकृषिक जमिनीचा वापर सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी करून त्यांच्या उत्पन्नात वाढ.
 3. कृषि ग्राहकांच्या अनुदानाचा भार कमी करणे.
 4. पारेषण व्यवस्थेवरील खर्चाची बचत करणे.
 5. विकेंद्रित सौर प्रकल्पाद्वारे वहन आणि वितरण हानीमध्ये बचत.

अर्जदार विकासक असल्यास

 • आपणास विकासक (Developer) म्हणून नोंदणी करावयाची असल्यास, महावितरणच्या नूतनीकरण ऊर्जा विभागाने प्रकाशित केलेल्या निविदा प्रक्रियेत भाग घ्यावा लागेल.
 • निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी कृपया ई-निविदा पोर्टलवर कंत्राटदार / विकासक म्हणून नोंदणी करा, ही नोंदणी निशुल्क आहे.

How to apply to Mukhyamantri Solar Krushi Vahini Yojana

अर्जदाराने अर्जासोबत प्रक्रिया शुल्क रु १०,०००/- + १८% ( वस्तू व सेवा कर ) अर्जाच्या पुढील कार्यवाहीसाठी भरावे For Govt and Grampanchayat Land all documents are made optional

अर्जदारास सूचना

1. प्रत्येक अर्जदाराने प्रथम नोंदणी करावी लागेल.
2. नोंदणी केल्यानंतर अर्जदाराने जमीन भाडेपट्टीसाठी अर्ज करण्यासाठी योग्य युजर-आयडी / पासवर्डने लॉग इन करावे लागेल.
3. अर्जदाराने एका जागेसाठी एकच अर्ज करावा लागेल
कोण अर्ज करू शकते ?
1. अर्जदार हे स्वतः शेतकरी ,शेतकऱ्याचा गट
2. कॉपरेटिव्ह सोसायटी ,वॉटर युसर असोसिएशन
3. साखर कारखाने , जल उपसा केंद्र ,
4. ग्रामपंचायत ,उद्योग आणि इतर संस्था यापैकी कोणीही असू शकतात .
जागेची पात्रता
1. जागेचे क्षेत्रफळ कमीत कमी ३ एकर ते जास्तीत जास्त ५० एकर असावे.
2. महावितरण च्या ३३/११ K .V उपकेंद्राजवळील जमिनीला प्राधान्य देण्यात येईल ( ५ कि .मी च्या आतील).

Online Apply to Mukhyamantri Solar Krushi Vahini Yojana
Online Registration

Important Yojana of Mahavitaran

 1. Mahavitaran Krushi Pump Anudan
 2. Mahavitaran Yojana – Smart Electricity Meter
 3. Shri Vilasrao Deshmukh Abhay Yojana
 4. Dr. Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana
 5. Pradhan Mantri Solar Panel Yojana
 6. Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana Apply Online
 7. PM-KUSUM Scheme


3 Comments
  Test22
 1. MahaBhartiYojana says

  MSKVY – Mukhyamantri Solar Krushi Vahini Yojana

 2. Test22
 3. Vilas Kashinath more says

  हि सुविधा गोंडेगाव तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक येथे आहे का? असेल तर लिंक शेअर करावी.

 4. Test22
 5. Bhaskar Babarao Gawande says

  अकोट तालुक्यात ही योजना आहे का प्रती हेक्टरी किती रक्कम शेतकऱ्याला मिळेल.अर्ज कुठे करावा

Leave A Reply

Your email address will not be published.