Mahavitaran Yojana – Smart Electricity Meter


Smart Electricity Meter : Pre-Paid Smart Meter

महावितरणची योजना – आता राज्यातील वीज मीटर होणार स्मार्ट!

Latest Mahavitaran Yojana for Consumers Details is here. Mahavitaran means MahaDiscom launch the New Pre-Paid Smart Electricity Meter yojana in Maharashtra state. The Urja Vibhag has resolved various complaints regarding meter reading of domestic electricity consumers and smart meters will be made available to domestic electricity consumers. The Minister of Energy directed to install smart electricity meters at the primary level in cities like Mumbai metropolitan area, Nagpur, Pune, Aurangabad. Given by Nitin Raut.

The Urja Mantry has advised all Union Ministries to order the institutions under their administrative control to install pre-paid smart meters. Priority will be given to installation of prepaid smart meters in all departments of central and state governments including urban, rural local bodies, government boards and corporations. Under this scheme, in a phased manner, provision of prepaid smart meters will be made for all electricity consumers except agricultural consumers. After installation of prepaid meters in central government offices, the policy will be implemented across the country. Read the more details of this yojana below on this page.

Features to Smart Electricity Meter Yojana

आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या स्मार्ट युगात आता महावितरण विभागही कात टाकत आहे. राज्यातील वीज यंत्रणा व मीटर आता स्मार्ट होणार आहे. महावितरणच्या सुधारीत वितरण क्षेत्र योजनेला राज्य शासनाने नुकतीच मंजूरी दिली आहे.  राज्याचा झपाट्याने होणारा औद्योगिक विकास आणि त्यामुळे होणारे शहरीकरण लक्षात घेता भविष्यात विजेच्या मागणीचे योग्य नियोजन व्हावे‚ ग्राहकांना अपघातविरहीत आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणद्वारे वीज यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी योजना राबविण्यात येणार आहे. यात ग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड मीटरिंग सोबतच वाणिज्यिक, औद्योगिक व शासकीय ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसविणे, वितरण रोहित्रे (Distribution Transformers) आणि वाहिन्यांना (Feeders) संवाद-योग्य (Communicable) आणि स्वयंचलित मीटरींग सुविधा (Automatic Metering Infrastructure) प्रणालीसाठी सुसंगत मीटरिंग करण्यात येणार आहे.

घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रीडिंग बाबतच्या विविध तक्रारींवर ऊर्जा विभागाने तोडगा काढला असून घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई महानगर परिसर, नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या महानगरात प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.

Prepaid Smart Electric Meter Yojana for Discoms

जितक्याचा रिचार्ज तितकीच वीज – प्रिपेड / स्मार्ट मिटर बसवल्यास ग्राहकाद्वारे जितक्या पैशाचे रिचार्ज केले जाईल तेवढी वीज त्यांना वापरण्यास मिळेल आणि त्यानंतर मीटर आपोआप बंद होईल. त्यामुळे कंपनीची सोय होणार आहे. स्मार्ट आणि प्रीपेड योजनेअंतर्गत कोणत्याही ग्राहकाकडून मीटर घेण्यासाठी चार्जेस (शुल्क) घेतले जाणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मात्र, या मीटरची रक्कम वार्षिक महसुलातून भागावली जाईल म्हणजे मीटरचा भुर्दंड ग्राहकांवर अप्रत्यक्षपणे पडणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा वीज वितरण कंपनीला सर्वाधिक फायदा होईल कारण वीज वापरण्याआधी पैसे आधीच दिल्याचे कंपन्यांना थकबाकीचा सामना करावा लागणार नाही.

आपल्या घरात तसंच शेती, उद्योग यांना जो वीजपुरवठा केला जातो, त्यासाठी दर महिन्याला शुल्क आकारलं जातं. आपल्या देशात असंख्य लोक असे आहेत, जे नियमितपणे वीजबिल भरत नाहीत. त्यामुळे देशातल्या वीजपुरवठा कंपन्यांवरचा (डिस्कॉम्स) आर्थिक बोजा वाढत असून, त्या डबघाईला आल्या आहेत. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सरकारने संपूर्ण देशात प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

Shri Vilasrao Deshmukh Abhay Yojna MSEDCL

Benefits of Smart Electricity Meter

हे आहेत स्मार्ट मीटरचे फायदे…

  1. वीज बिलापासून होणार सुटका.
  2. मोबाइलच्या सिम कार्ड वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रूपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध असतील. यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल. वीज वापरानुसारच बिल येईल तसेच प्री पेड मीटर मध्ये तर जितके पैसे जमा आहेत त्यानुसारच वीज वापरता येईल. परिणामी विजेची बचत होण्यास यामुळे फायदा होईल.
  3. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलातील त्रुटी दूर होतील. अचूक बिल येईल. मीटरमध्ये फेरफार करून कुणी वीज चोरीचा प्रयत्न करीत असेल तर त्याची कल्पना मुख्यालयाला लगेच येऊन ती रोखणे शक्य होईल. यामुळे वीजचोरीस आळा बसेल. तसेच विजेचा काटकसरीने वापर करण्याला प्रोत्साहन मिळेल.
  4. स्मार्ट मीटरमुळे दूरस्थ पद्धतीने माहितीची देवाणघेवाण आणि वीजभाराचे व्यवस्थापन अगदी कमीतकमी वेळेत करता येईल. याचा फायदा म्हणजे ग्रीडचे व्यवस्थापन स्मार्ट पद्धतीने करता येईल. दूरस्थ पद्धतीने मीटर चालू किंवा बंद करता येईल ज्यामुळे खर्चावर नियंत्रण येईल. तसेच दूरस्थ पद्धतीने मीटरमध्ये संचित झालेला डेटा मुख्यालयात परिक्षणासाठी घेता येईल.
  5. जीवनप्रकाश योजनेची व्याप्ती वाढवणार -अनुसूचित जाती व जमातीतील ग्राहकांना नाममात्र दरात वीज जोडणी देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देशही डॉ. राऊत यांनी आज या विषयावर झालेल्या बैठकीत दिले. गरजूंना नाममात्र अनामत रक्कम जमा करून वीज जोडणी देणारी ही योजना केवळ दोन समाजापुरती मर्यादित न राहता सर्वसमावेशक करायला हवी. यासाठी प्रस्ताव तयार करून सादर करा, असे निर्देश डॉ. राऊत यांनी सर्व संबंधितांना दिले.
  6. सर्व केंद्र सरकारी विभागांमध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर बसवल्याने वीज वितरण कंपन्यांची (DICOMs) आर्थिक स्थिती सुधारण्यासह ऊर्जा कार्यक्षमतेला चालना देण्यासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ मिळेल, इतकंच नव्हे तर राज्यांसाठी अशी प्रणाली निर्माण करण्यासाठी एक मॉडेल उपलब्ध होईल.

Smart prepaid meter apply here

smart meter apply here

How to apply for Smart Electricity Meter

smart meter bill



4 Comments
    Test22
  1. Nikita Waghmare says

    Labh hohil ka

  2. Test22
  3. Nikita Waghmare says

    Maharashtra labh

  4. Test22
  5. Mohanu dalsu kumre says

    Mohanu dalsu kumre yanc Navin vij durusti kadhi honar

  6. Test22
  7. Mohanu dalsu kumre says

    Mohanu dalsu kumre yanc Navin vij durusti kadhi honar . 9000 hajar rupey bharun 2 varsa hon gele

Leave A Reply

Your email address will not be published.