मूल्यमापन चाचणीचे गुण वेळेत नोंदवा ! ५ डिसेंबरनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही । Vidya Pradhikaran Latest Update
Vidya Pradhikaran Latest Update
Vidya Pradhikaran Latest Update: राज्यात २२ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन चाचणी १ शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत राज्यातील फक्त ४० टक्के शाळांनी विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंदणी केली आहे. राज्यातील नोंदणी न झालेल्या ६० टक्के शाळांमधील शिक्षकांना अपेक्षा होती की यासाठी काही दिवसांची मुदतवाढ मिळेल. परंतु, राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने शिक्षकांना मूल्यमापन चाचणीचे गुण वेळेत नोंदविण्याचे आवाहन केले असून, ५ डिसेंबरनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाच्या संचालकांनी संकलित मूल्यमापन चाचणी १ चे गुण चॅटबॉटवर नोंदविण्यासाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीत शंभर टक्के शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरणे अनिवार्य आहे. यानंतर गुणांची नोंद करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकनांतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व २ चे आयोजन करण्यात येत आहे. यापैकी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी या विषयांची संकलित मूल्यमापन चाचणी १ घेण्यात आली. ही चाचणी शिक्षकांना तपासण्याचे सांगितले होते. मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
या कामासाठी प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, पालिका यांनी आपल्या एका अधिकाऱ्याकडे जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. या समन्वयकांनी शिक्षकांना चॅटबॉटवर चाचणी १ चे गुण कसे भरावेत, याबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत नोंदणी न केलेल्या शाळांना वेळेत मूल्यमापन चाचणीच्या गुणांची नोंदणी करणे बंधनकारक राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App