Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026
दहा-दहा वर्षे प्रामाणिकपणे सेवा करूनही नोकरीच्या स्थैर्यापासून वंचित राहिलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दीर्घकाळ अखंड सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या अपेक्षेकडे केवळ कंत्राटी नियुक्ती म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारसमोर नोंदवले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, दीर्घकालीन आणि अखंड सेवेमुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये नोकरीत कायम होण्याबाबतची एक वाजवी अपेक्षा निर्माण होते. सार्वजनिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी तरुण वयात नियुक्त झाल्यानंतर हे कर्मचारी अनेक वर्षे निष्ठेने सेवा बजावत असतात. दरम्यानच्या काळात त्यांच्यासाठी सरकारी नोकरीच्या ज्या संधी वयोमर्यादेमुळे उपलब्ध होत्या, त्या आता त्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या असण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत, दीर्घकाळ सेवा देऊनही या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा विचार न करणे हे घटनात्मक तत्त्वे आणि त्यांना मिळणाऱ्या संरक्षणाशी विसंगत ठरू शकते, असेही न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे दीर्घकालीन कंत्राटी नेमणुकीची पद्धत बंद करण्याची गरज असून, सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या तत्त्वांच्या आधारे पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाबाबत राज्यातील सर्व महानगरपालिकांना आवश्यक निर्देश देण्याचा विचार करावा, असे महत्त्वपूर्ण मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले.
वसई-विरार महानगरपालिकेतील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. वैद्यकीय, निम-वैद्यकीय आणि प्रशासकीय विभागांत दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या तब्बल ४७९ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांच्या नियमितीकरणाच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

महत्वाचा एक मोठा अपडेट समोर आला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभाराला गती देण्यासाठी तब्बल १२ वर्षांनंतर पालिकेचा नवा सुधारीत आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. या नवीन प्रस्तावानुसार पालिकेत तब्बल ९ हजार ९९६ नवीन पदे निर्माण करण्यात येणार असून, यामुळे पालिकेच्या एकूण पदांची संख्या आता थेट १२ हजार ८४८ वर इतकी होणार आहे. शुक्रवारी याबाबतचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. मात्र सद्यस्थितीत या प्रस्ताव स्थगित करण्यात आला आहे. वसई-विरार महापालिकेची स्थापना २००९ मध्ये झाली. यामध्ये ४ नगरपरिषदा आणि ५३ गावांचा समावेश असून पालिकेचे एकूण क्षेत्रफळ ३११ चौरस किलोमीटर इतके विस्तीर्ण आहे. यापूर्वी ९ सप्टेंबर २०१४ रोजी शासनाने पालिकेच्या विविध संवर्गातील २ हजार ८५२ पदांना मंजुरी दिली होती. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १२ लाख होती.
मात्र गेल्या काही वर्षात शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. या लोकसंख्येमुळे शहरातील नागरी व पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण पडत आहे. तर दुसरीकडे अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत होता. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, प्रशासकीय कामकाजाला गती देणे आणि नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडवणे पालिकेला कठीण जात होते.याच अनुषंगाने महापालिकेने जुन्या आकृतीबंधासह नवीन ९ हजार ९९६ पदांची निर्मिती असा एकूण १२ हजार ८४८ मनुष्यबळाचा प्रस्ताव शुक्रवारी महासभेपुढे चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. मात्र या प्रस्तावावर चर्चा न होता सद्यस्थितीत या प्रस्तावाला महापौर अजीव पाटील यांनी स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुढच्या महासभेत यावर चर्चा होणार आहे.
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026: Vasai Virar Municipal Corporation Palghar has going to recruit for the posts of “Additional Advocate and Senior Counsel”. There are 11 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Vasai Virar. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 17th of June 2026 to 25th of June 2026. For more details about VVMC Bharti 2026, VVMC Recruitment 2026, visit our website www.MahaBharti.in.
वसई विरार शहर महानगरपालिका पालघर अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण तज्ञ) (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजीस्ट) (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (चेष्ट स्पेशालिस्ट) (पूर्णवेळ)” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. वसई विरार शहर महानगरपालिका पालघर भरती 2026 करीता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १७ जून २०२६ ते २५ जून २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
वसई विरार शहर महानगरपालिका पालघर भरती 2026
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण तज्ञ) (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजीस्ट) (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (चेष्ट स्पेशालिस्ट) (पूर्णवेळ)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – वसई विरार, पालघर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, “ए” विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)
- मुलाखतीची तारीख – १७ जून २०२६ ते २५ जून २०२६ [(सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११.०० ते दुपारी ३.००]
- अधिकृत वेबसाईट – https://vvcmc.in/
VVMC Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) (पूर्णवेळ) | 03 |
| वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण तज्ञ) (पूर्णवेळ) | 04 |
| वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजीस्ट) (पूर्णवेळ) | 02 |
| वैद्यकीय अधिकारी (चेष्ट स्पेशालिस्ट) (पूर्णवेळ) | 02 |
Educational Qualification For VVMC Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) (पूर्णवेळ) | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (स्त्री व प्रसूतीरोगशास्त्र) किंवा एम.बी.बी.एस., डी.जी.ओ. किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण. ब) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभव. क) महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल / इंडियन मेडीकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र. |
| वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण तज्ञ) (पूर्णवेळ) | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (अॅनास्थेशिया) किंवा एम.बी.बी.एस. पदवी आणि डी.ए. (डिप्लोमा इन अनास्थेशिया) किंवा समकक्ष पदवी. ब) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभव. क) महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल / इंडियन मेडीकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र |
| वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजीस्ट) (पूर्णवेळ) | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (रेडिओ डायग्नोसिस) किंवा डी.एम.आर.डी. (क्ष-किरण शास्त्र) किंवा समकक्ष पदवी. ब) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभव. क) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / इंडियन मेडीकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र. |
| वैद्यकीय अधिकारी (चेष्ट स्पेशालिस्ट) (पूर्णवेळ) | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस., एम.डी. (चेष्ट मेडिसीन), डी.एन.बी. डिप्लोमा किंवा समकक्ष पदवी. ब) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभव. क) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / इंडियन मेडीकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र. |
Salary Details For VVMC Notification 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) (पूर्णवेळ) | रु.१,०४,७९३/- |
| वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण तज्ञ) (पूर्णवेळ) | रु.१,०४,७९३/- |
| वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजीस्ट) (पूर्णवेळ) | रु.१,०४,७९३/- |
| वैद्यकीय अधिकारी (चेष्ट स्पेशालिस्ट) (पूर्णवेळ) | रु.१,०४,७९३/- |
Selection Process For VVMC Application 2026
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख १७ जून २०२६ ते २५ जून २०२६ आहे.
- वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For vvcmc.in Bharti 2026 | |
| 📑PDF जाहिरात | https://shorturl.at/4tfYh |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://vvcmc.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















1 thought on “कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! दीर्घकाळाची सेवा आता कायम होणार? | Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2026”
New Post Updated.