विविध शासकीय कार्यालयामध्ये मंजूर पदांपैकी तब्बल 465 पदे रिक्त!!
Vacancies in Government Offices
Vacancies in Government Offices
Vacancies in Government Offices : There are 1517 sanctioned posts in various government offices in the taluka out of which 465 posts are vacant. Every year a large number of government officials and employees are retiring. As a result, there is a huge shortage of officers and staff in almost all government offices from Gram Panchayats to Municipal Councils, Tehsils, Panchayat Samiti, Police Stations. Further details are as follows:-
various government offices in Nandgaon
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तालुकक्यातील विविध शासकीय कार्यालयामध्ये (various government offices in Nandgaon)1517 मंजूर पदे असून त्यापैकी तब्बल 465 पदे रिक्त आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
गेल्या काही वर्षांपासून नोकर भरती ( Recruitment ) करण्यात आलेली नसताना दुसरीकडे मात्र दरवर्षी मोठ्या संख्येने शासकीय अधिकारी, कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींपासून नगरपरिषद, तहसील, पंचायत समिती, पोलीस स्टेशन अशा जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी-कर्मचार्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण झाली आहे.
शासकीय कार्यालयांमधील अधिकारी-कर्मचार्यांच्या अपुर्या संख्येमुळे कामाचा ताण वाढला असल्याने कोणतेही काम वेळेत होत नाही. त्याचा नाहक त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. यास्तव शासनाने जनहिताचा विचार करून रिक्त पदे भरावीत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याची, त्यांना शासनाच्या सर्व सोयी-सुविधां आणि योजनांचा लाभ देण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणा व कार्यालयांवर असते. सध्या मनमाडसह नांदगांव तालुक्यातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत कर्मचार्यांची संख्या कमी पडत असल्याचे चित्र सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये निर्माण झाले आहे.
On the one hand, due to the growing population, the workload has increased and on the other hand, a large number of vacancies, in which some employees are coming and going from Nashik and other cities, so they do not reach the office on time. Besides, due to holidays given on Saturdays and Sundays and other religious festivals, no work of public office is done on time.
प्रत्येक शासकीय कार्यालयात आधीपासूनच मंजूर असलेली कर्मचारी संख्या कमी असून त्यात मंजूर पदांपैकी निम्मे पदे रिक्त आहेत. यामुळे तहसील कार्यालयातून मिळणार्या शैक्षणिक दाखल्यांसह विविध कामासाठी लागणारे दाखले दिलेल्या मुदतीत मिळत नाहीत. भूमिअभिलेख कार्यालय असो की सरकारी दवाखाने किंवा नगरपरिषद; सर्वच ठिकाणी अधिकारी-कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे कामांना गती मिळत नसून नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. जे अधिकारी-कर्मचारी आहेत ते देखील मनमानी पध्दतीने काम करीत असल्याने किरकोळ कामासाठीही आता लोकप्रतिनिधींपर्यंत जाण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे. काही विभागाचे कर्मचारी हे भरतीच्या दिवसापासून प्रतिनियुक्तीवर नाशिक येथे काम करतात.
Table of Contents