Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांतील पदे रिक्त

Vacancies in government and semi-government offices

Vacancies in government and semi-government offices : मुंबईसह राज्यातील अनेक शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची अनेक पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे शासकीय कामावर बराच परिणाम होत असून ही रिक्त पदे लवकरात लवकर भरावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्य सरकारच्या विविध शासकीय आणि निमशासकीय विभागातील जवळपास दीड लाख पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. शासन फक्त कंत्राट पद्धतीने योजना राबविण्याचे काम करीत आहेत. त्याचा परिणाम म्हणजे शासनांच्या अनेक योजनांची योग्यरीत्या अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहेत. कोरोनाच्या काळात शासकीय कर्मचारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील इतर कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. यातदेखील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱयांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे रिक्त पदे भरताना या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणीही यावेळी महासंघाचे अध्यक्ष डॉ. गजानन देसाई यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

सोर्स : सामना


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. संजय says

    कुठल्या विभागात किती पद भरती आहे ती जिल्हयानुसार सांगा
    आणि कोणत्या नगरपालिकेत किती जागा आहे ते सांगा

  2. संजय says

    पदे रिक्त आहेत पण ती भरायची कधी

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड