Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

USPC IES परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात

UPSC IES Exam 2020

UPSC IES Exam 2020 : यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. ११ ऑगस्ट २०२० रोजी नोटिफिकेशन जारी झाले….

UPSC IES Exam 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय आर्थिक सेवा (IES) परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. भरतीसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा १६ ऑक्टोबर २०२० पासून सुरू होणार आहे. यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज १ सप्टेंबर पर्यंत करता येऊ शकतील. ऑनलाइन अर्जांसंबंधी विस्तृत निर्देश आयोगाच्या अधिसूचनेत आहेत. ऑनलाइन अर्ज ८ सप्टेंबर २०२० ते १४ सप्टेंबर २०२० या कालावधीत मागे घेतले जाऊ शकतील.

अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर सूचना जारी करण्यात आली आहे. ही परीक्षा अहमदाबाद, जम्मू, बंगळुरू, कोलकाता, भोपाळ, लखनऊ, चंदीगड, मुंबई, चेन्नई, पटणा, कटक, प्रयागराज, दिल्ली, शिलाँग, दिसपूर, शिमला, हैदराबाद, तिरुवनंतपुरम आणि जयपूरमध्ये आयोजित केली जाणार आहे.

यूपीएससी आयईएस २०२० परीईक्षेच्या माध्यमातून १५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. upsconline.nic.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करता येतील. ऑनलाइन अर्ज कसा करायचा त्याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

UPSC IES Exam 2020: असा करा अर्ज –

  • सर्वात आधी UPSC चे अधिकृत संकेतस्थळा upsc.gov.in वर जा.
  • आता होम पेजवर what’s new मध्ये जाऊन ‘Exam Notification: Indian Economic Service Examination, 2020’ वर क्लिक करा.
  • यानंतर पार्ट १ रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि विचारलेली माहिती भरा.
  • आता पार्ट २ रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि फोटो, स्वाक्षरी अपलोड करा व शुल्क भरा आणि आपले परीक्षा केंद्र निवडा.
  • यानंतर I agree पर्यायावर क्लिक करा.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Aamina Azad shaikh says

    18 year me hi job lagegi Kya or upsc ke bare me knowledge.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड